इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक/बिगर व्यावसायिक) वसतिगृहातील प्रवेशासाठी निर्धारीत केलेल्या अटींमध्येसुधारणा करण्याबाबत
Improvement in hostel admission conditions for students

Improvement in hostel admission conditions for students

Improvement in hostel admission conditions for students

Amendment in hostel admission conditions for OBC VJNT SBC students

Regarding amendment in the conditions prescribed for admission to hostels for students pursuing higher education (professional/non-professional) belonging to Other Backward Classes, Scheduled Castes and Nomadic Tribes and Special Backward Classes.

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक/बिगर व्यावसायिक) वसतिगृहातील प्रवेशासाठी निर्धारीत केलेल्या अटींमध्ये
सुधारणा करण्याबाबत.

दिनांक ०४ डिसेंबर, २०२५.

वाचा : १. शासन निर्णय, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, क्र. वगृयो-२०२०/प्र.क्र.०१/योजना-५, दि.२९.११.२०२२

२. शासन निर्णय, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, क्र. वगृयो-२०२२/प्र.क्र.०१/योजना-५. दि.२८.०२.२०२३

३. शासन परिपत्रक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, क्र. वगृयो-२०२३/प्र.क्र.१२/योजना-५. दि.१३.०३.२०२३

४. शासन निर्णय, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, क. वगृयो-२०२०/प्र.क्र.०१/योजना-५.

दि.१९.१२.२०२३

प्रस्तावना :-

राज्यातील उच्च शिक्षण (व्यावसायिक / बिगर व्यावसायिक) घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेचे मुलांसाठी १ व मुलींसाठी १ या प्रमाणे ३६ जिल्हयाच्या ठिकाणी ७२ शासकीय वसतिगृहे, इमारत भाडयाने घेवून कार्यान्चित करण्यास दि.२९.११.२०२२. व दि.२८.०२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी शासन निर्णय दि.१९.१२.२०२३ अन्वये आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. तसेच, वसतिगृहात प्रवेशाकरीता अटी व शती लागू करण्यात आल्या आहेत. वसतिगृह प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या अडचर्णीच्या अनुषंगाने, अर्जप्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सदरहू योजनेच्या निर्धारीत केलेल्या अटींमध्ये सुधारणा करण्याची बाब विचाराधीन आहे.

शासन निर्णय :

राज्यातील उच्च शिक्षण (व्यावसायिक / बिगर व्यावसायिक) घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, वसतिगृहात प्रवेशाकरीता शासन निर्णय, दि.१९.१२.२०२३ अन्वये अटी व शर्ती लागू केल्या आहेत. वसतिगृह प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या अडचणींच्या अनुषंगाने, अर्जप्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी निर्धारीत केलेल्या अटींमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे:-

१) वसतिगृहामध्ये जागा रिक्त नसल्यास सदर योजनेंतर्गत सन २०२५-२०२६ पासून पुढे विहीत मुदतीत अर्ज करणाऱ्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देय राहील. तद्नंतर, या योजनेंतर्गत जागा रिक्त राहिल्यास पात्र विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये हे विचारात घेता, द्वितीय वर्षांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेंतर्गत प्रवेश देय राहील. तरीही जागा रिक्त राहिल्यास अनुक्रमे तृतीय व चतुर्थ वर्षांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देय राहील. तथापि, द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षात प्रवेश घेताना १२ वी परिक्षेच्या अंतिम निकालाचे गुण विचारात घ्यावे.

२) काही व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वर्ष हे १२ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीचे असते. यामुळे, अभ्यासक्रमाच्या मध्यावधी मध्ये या योजनेकरीता अर्ज केल्यास या योजनेंतर्गत लाभ देण्यात यावा. तसेच, व्यावसायिक/बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया उशिराने पार पडतात अशावेळी देखील विद्यार्थ्यांचा सदर योजनेकरीता अंतर्भाव करावा. (उदा. वैद्यकीय अभ्यासक्रम दीड वर्षांचा असल्याने, या शाखेतील विद्यार्थ्यांना मध्यावधीमध्ये प्रवेश देण्यात यावा)

३) सदर योजनेंतर्गत एकूण प्रवेश संख्येच्या ७०% जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व ३०% जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निश्चित केल्या आहेत. त्यामध्ये जिल्हयातील व्यावसायिक बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जागा रिक्त राहील्यास, सदर जागा आंतर परावर्तनाने भरण्याची कार्यवाही संबंधीत सहायक संचालक यांनी त्यांच्या स्तरावर करावी.

४) सदर योजनेकरीता संदर्भीय शासन निर्णय दि.१९.१२.२०२३ मधील इतर अटी व शर्ती या कायम राहतील.

२. सदरहू शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२५१२०४१५१११९३२३४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

शासन निर्णय पीडीएफ लिंक

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

Improvement in hostel admission conditions for students
इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक/बिगर व्यावसायिक) वसतिगृहातील प्रवेशासाठी निर्धारीत केलेल्या अटींमध्ये
सुधारणा करण्याबाबत
Improvement in hostel admission conditions for students

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
इतर मागास बहुजन कल्याण विभाग, शासन निर्णय, क्रमांक: वगृयो-२०२५/प्र.क्र.१८९/१४३९९०६/योजना-१ मुंबई

Leave a Comment

error: Content is protected !!