Important Notice for EWS Candidates
Important Notice for EWS Candidates
Important Notice for Economically Weaker Section EWS Candidates
Submission of Economically Weaker Section (EWS) Certificate in Annexure A form shall remain mandatory.
क्र. संकिर्ण-१९२५/ईडब्ल्यूएस/सीईटी/कॅप/२०२५/१५२
दिनांक : ३०/०१/२०२५
आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) संवर्गातील उमेदवारांकरीता महत्वाची सूचना
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये राबविण्यात येणाऱ्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेकरीता (कॅप) EWS संवर्गातून प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी माहिती पुस्तिका तसेच महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक. राआधो ४०१९/प्र.क्र.३१/१६-अ दिनांक ३१ मे, २०२१ मध्ये नमुद परीशिष्ट अ (Annexure- A) नमुन्यात आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र सादर करणे बंधणकारक राहील. जे उमेदवार सदर प्रमाणपत्रा ऐवजी इतर कोणत्याही नमुन्यातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र सादर करतील अशा उमेदवारांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही याची सर्व उमेदवार/पालक/संस्थांनी नोंद घ्यावी.
सोबत :- महाराष्ट्र शासन नमुना “परीशिष्ट अ (Annexure- A)”
आयुक्त,
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई