Implementation Of Service Fortnight दिनांक २८ एप्रिल २०२५ ते दिनांक १२ मे २०२५ या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्याबाबत

Implementation Of Service Fortnight

IMG 20250424 125400
Implementation Of Service Fortnight

Implementation Of Service Fortnight

Regarding the implementation of the Seva Fortnight from April 28, 2025 to May 12, 2025…

दिनांक २८ एप्रिल, २०२५ ते दिनांक १२ मे, २०२५ या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्याबाबत…

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. GAD/९४/२०२४-GAD – Lokshahi Din मादामा कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई

दिनांक :- २३ एप्रिल, २०२५

प्रस्तावना :-

सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत व्हावीत याकरीता राज्य शासनाने सन २०१५ मध्ये “आपले सरकार सेवा पोर्टल” सुरु केले आहे. त्या माध्यमातून जनतेची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तथापि, सदर पोर्टलचा आढावा घेतला असता व मंत्रालय स्तरावर नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे अवलोकन केले असता संबंधित नागरिकांचे अर्ज/तक्रारी यांचा सक्षम प्राधिकाऱ्यांकडून विहित कालमर्यादेमध्ये निपटारा होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. राज्यामध्ये सन २०२२ व २०२३ या वर्षी सेवा पंधरवडा / महिना राबविण्यात आला होता.

राज्य शासनाच्या विविध क्षेत्रिय कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर माहिती प्राप्त करून देणे तसेच त्यांना राज्य शासनाच्या विविध योजनांचा योग्य लाभ घेता यावा, त्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने दिनांक २८ एप्रिल, २०२५ ते दिनांक १२ मे, २०२५ या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

    शासन परिपत्रक

१. सबब, दिनांक २८ एप्रिल, २०२५ ते दिनांक १२ मे, २०२५ या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या सेवा पंधरवडा कालावधीत खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या व दि. २५ एप्रिल, २०२५ रोजी प्रलंबित असलेल्या सर्व अर्जाचा मोहिम स्वरुपात निपटारा करणे अपेक्षित आहे,

१. आपले सरकार सेवा पोर्टल

२. महावितरण पोर्टल

३. डी.बी.टी. पोर्टल

४. नागरी सेवा केंद्र

५. सार्वजनिक तक्रार पोर्टल (पब्लिक ग्रिव्हियन्स पोर्टल)

६. विभागाच्या स्वतःच्या संकेतस्थळावरील प्रलंबित अर्ज

२. सेवा पंधरवडा यावर्षी खाली नमूद केलेल्या तक्यांमधील सेवांचा अंतर्भाव करण्यात येत आहे-

अ.क्र.

सेवा

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरण

प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे

पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण

मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे

नव्याने नळ जोडणी देणे

मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे

प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे

मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत सिंचन विहिरी करिता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे

अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मंजूर करणे (अपिल वगळून)

दिव्यांग प्रमाणपत्र देणे

१०

११

१२

नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे

१३

विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे

१४

आधार कार्ड सुविधा

१५

पॅन कार्ड सुविधा

१६

नवीन मतदार नोंदणी

१७

जन्म मृत्यु नोंद घेणे व प्रमाणपत्र देणे

१८

शिकाऊ चालक परवाना

१९

रोजगार मेळावा

२०

सखी किट वाटप

२१

महिला बचत गटास परवानगी देणे

२२

महिला बचत गटास प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देणे

२३

लसीकरण

२४

ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र

२५

प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे

३. सेवा पंधरवड्यामध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेशी निगडीत असणाऱ्या महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग, कृषि विभाग, आदिवासी विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, ऊर्जा विभाग या विभागांकडील तसेच सर्व शासकीय विभांगाकडील सेवाहक्क अधिनियमाअंतर्गत अधिसूचित केलेल्या सेवा विषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेमध्ये निपटारा करण्याकरीता कार्यपध्दती निश्चित करावी व अंमलबजावणीकरिता सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करुन देण्यात यावी. सर्व संबंधित खात्यांच्या जिल्हाप्रमुखांनी सेवा महिन्याची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरिता नियोजन करावे, तसेच प्रगतीविषयी क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडून दैनंदिन आढावा घ्यावा आणि क्षेत्रीय भेटी द्याव्यात. शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवड्याविषयी जनतेमध्ये यथोचित माहिती प्रसारीत करण्यात यावी. सेवा पंधरवडा कालावधीत मान्यवरांच्या भेटी, आयोजित शिबिरे, त्यामधील नागरिक-प्रशासनाचा सहभाग या विषयी स्थानिक प्रसार माध्यमांमधून प्रसिध्दी देण्यात यावी.

४. या कार्यक्रमाच्या प्रसिध्दीसाठी स्थानिक प्रसिध्दी माध्यमांचे सहकार्य घ्यावे. सेवा पंधरवडा कार्यक्रम अधिकाधिक आकर्षक आणि नाविन्यपुर्ण करण्याच्या दृष्टीने, सवे संबंधित अधिकाऱ्यानी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्या त्या भागातील गरजा, भौगोलिक परिस्थिती इत्यादी विचारात घेऊन त्याप्रमाणे आवश्यक कार्यवाही करावी.

५. प्रत्येक जिल्हाधिकारी/उप विभागीय अधिकारी/तहसिलदार कार्यालयांमध्ये हेल्पडेस्क किंवा हेल्पलाईन किंवा व्हॉट्सअॅपव्दारे मदत करण्याकरीता यंत्रणा/कक्ष तयार करून गरजू नागरिकांना मार्गदर्शन/शंकाचे निरसन करून त्यांची कामे पुर्ण करण्याकरीता आवश्यक ती व्यवस्था/कार्यवाही करण्यात यावी.

६. सेवा पंधरवडा समाप्तीनंतर दि. १३ मे, २०२५ रोजी सर्व सक्षम प्राधिकारी यांचेकडून दि.२५ एप्रिल, २०२५ अखेर प्रलंबित संदर्भापैकी निपटारा करण्यात आलेले संदर्भ व निपटारा न झालेल्या संदर्भाविषयी स्वयंस्पष्ट कारणांसह प्रमाणपत्र घेण्यात यावे. प्रत्येक शासकीय विभागाने सेवा पंधरवडा कालावधीत केलेल्या कामकाजाविषयीचा प्रमाणपत्रासह सेवानिहाय आणि विभाग निहाय प्रगती अहवाल सोबतच्या प्रपत्रामध्ये दि. २० मे, २०२५ पर्यंत संबंधित विभागीय आयुक्त यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित करुन शासनास सादर करावा.

७. सर्व विभागांच्या जनतेशी निगडीत असणाऱ्या सर्व सेवा विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्याबाबत तसेच सर्व विभागांच्या वैयक्तिक लाभाच्या सर्व योजनांचा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरीत करण्याबाबत सूचना देऊनही अद्याप कार्यवाही पूर्ण झाली नसल्याने, सदर कार्यवाहीदेखील दि. १२ मे, २०२५ पूर्वी पूर्ण करण्यात यावी.

८. या सूचनाचे तंतोतंत पालन होईल याची दक्षता सर्व विभागांनी व त्यांच्या अधिनस्त असलेल्या कार्यालयांनी घ्यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०४२३१८३७३९८९०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

👉 शासन निर्णय शासन परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा 👈

अवर सचिव, महाराष्ट्र शासन
Seva Pandharvada Amalbaajavani

Leave a Comment

error: Content is protected !!