Implementation of Out of School Irregular Migrant Child Survey
Implementation of Out of School Irregular Migrant Child Survey
शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालक सर्वेक्षण अंमलबजावणी
विषयः – शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी दिनांक-०५ जुलै, २०२४ ते २० जुलै, २०२४ या कालावधीमध्ये सर्वेक्षण राबविण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी दिनांक-०५ जुलै, २०२४ ते २० जुलै, २०२४ या कालावधीमध्ये सर्वेक्षण हाती घेण्याच्या शासनाच्या सुचना असल्याने सदर सर्वेक्षण राबविण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने SOP व माहिती संकलनाचे formats तयार करून पुढील योग्य त्या त्वरीत कार्यवाहीसाठी सोबत जोडून पाठविली आहे. त्यानुसार सर्वेक्षणाच्या विहित पत्रकांमध्ये माहिती भरून विहित प्रमाणपत्रासह सचालनालयास सादर करावे. सदर प्रपत्रांमधील माहिती भरतांना केवळ (ISM V6) युनिकोड- “DVOT-SurekhMR” या Font चा वापर करून Font Size-11 मध्येच भरावयाची आहे. याची कटाक्षाने नोंद घ्यावी. याबाबत आपण तसेच आपल्या अधिनस्त सर्व शिक्षणाधिकारी यांनी यातील सुचनांचे तंतोतंत पालन करून सर्वेक्षण राबविण्यासाठी कार्यवाही करावी.
यापूर्वी देखील शासनाकडून शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांना बालकांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले होते. त्याच धर्तीवर या सर्वेक्षणाशी संबंधित शासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांची संपर्कात राहुन कार्यवाही करावयाची असून सदरचे काम पूर्णत्वास आणावयाचे आहे. शासनाच्या संबंधित विविध विभागांना याबाबत लिहिलेल्या पत्राची प्रत योग्य त्या कार्यवाहीस्तव सोबत जोडली आहे.
तरी याबाबत सर्व विभागिय शिक्षण उपसंचालक यांनी सदर SOP मधील सुचना लक्षात घेऊन आपल्या अधिनस्त सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व योजना) तसेच सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगरपरिषद मधील संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने आदेशित करावे. त्याचप्रमाणे सर्व शिक्षणाधिकारी यांना त्यांचे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, महिला व बाल विकास अधिकारी तसेच सर्वेक्षणा संबंधित इतरही सर्व विभागातील अधिकारी तसेच तालुका व ग्रामिण स्तरावरील कार्यालयांशी संपर्क करून या बाबत सर्व नागरी व ग्रामिण स्तरावरील बैठकींचे नियोजन करण्याचे आदेश द्यावेत.
या कामासाठी सर्व विभागिय शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षणाधिकारी यांनी त्याचे कार्यालयात Excel मधील तज्ञ असलेल्या एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी की ज्यामुळे सर्वेक्षणाच्या विहित पत्रकांमधील माहितीचे वैधतीकरण योग्य व जलद रित्या होईल व सर्वेक्षणाची माहिती शासनास विहित वेळेत सादर करणे शक्य होईल. या नियुक्त केलेल्या सर्व जिल्हा व विभाग स्तरावरील नोडल अधिकाऱ्याची यादी संबंधित विभागिय शिक्षण उपसंचालक यांनी सर्वेक्षण सुरू होताच संचालनालयास सादर करावी.
सहपत्रेः – वरील प्रमाणे
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक),
महाराष्ट्र राज्य,पुणे
प्रत माहितीस्तवः (१) मा. सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई, (२) मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे,
(३) मा, राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.
(४) मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे,
प्रत माहिती व योग्य त्या कार्यवाहीस्तव सादरः-
(१) मा. शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, पुणे,
(२) मा. संचालक, शिक्षण संचालनालय (योजना), पुणे,
(३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक)-सर्व.
(४) शिक्षण निरिक्षक, महानगरपालिका, न.पा./न.प. सर्व