BARTI is Conducting Costless Coaching for JEE NEET Entrance Exams for Students Apply Online Link

BARTI is Conducting Costless Coaching for JEE NEET Entrance Exams for Students Apply Online Link

IMG 20240614 190007 1
BARTI is Conducting Costless Coaching for JEE NEET Entrance Exams for Students Apply Online Link

BARTI is Conducting Costless Coaching for JEE NEET Entrance Exams for Students Apply Online Link

Dr. Babasaheb Ambedkar Institute of Research and Training, Pune is conducting free non-resident coaching for JEE and NEET entrance exams for Scheduled Caste candidates in Maharashtra through private coaching centres

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे

(महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था) मुख्यालय: २८ क्वीन्स गार्डन, कॅम्प, पुणे

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या पात्र उमेदवारांसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर व नागपूर या ठिकाणी जेईई (JEE) आणि नीट (NEET) प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज मागविणेबाबत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जेईई (JEE) आणि नीट (NEET) या प्रवेश परीक्षांचे निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण खाजगी प्रशिक्षण केंद्राच्या मार्फत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर व नागपूर या ठिकाणी प्रत्येकी JEE-१०० व NEET-१०० जागांकरिता प्रशिक्षण राबविण्यात येत आहे.

पात्रता:-

१. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

२. उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असावा.

३. उमेदवार शैक्षणिक वर्ष सन २०२४-२०२५ मध्ये इयत्ता ११ वी (विज्ञान) चे शिक्षण घेत असावा.
४.रु. ८ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न मर्यादा असलेला उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र असेल.

अर्ज करण्यासाठी QR scan करा

५. अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक.

६. उमेदवार दिव्यांग असल्यास ४०% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सादर करावी.

आरक्षण :-

  • महिला ३०%, दिव्यांग (PWD) ५%, अनाथ-१%, वंचित-५% (वाल्मिकी व तत्सम जाती-होलार, बेरड, मातंग, मांग, मादगी, इ. साठी), जागा आरक्षित असतील.

विद्यार्थी निवडीचे निकष :-

  • प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने इयत्ता १० वीच्या गुणांच्या आधारे गुणवत्तानिहाय उमेदवारांची निवड केली जाईल.

प्रशिक्षणाच्या अटी व शती :-

१. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३०/०६/२०२४

२. प्रशिक्षण कालावधी २४ महिन्यांचा राहील.

३. निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणा दरम्यान ७५ टक्के पेक्षा जास्त कालावधीसाठी उपस्थित राहिल्यास त्या विद्यार्थ्यांना दरमहा रु.६०००/- एवढे विद्यावेतन अदा करण्यात येईल.

४. निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना पुस्तक संचाकरीता प्रती विद्यार्थी रु.५०००/- एवढी एकरकमी रक्कम अदा करण्यात येईल.

५. सदर योजनेबाबत / प्रशिक्षणाबाबत काही वाद अथवा धोरणात्मक पेच प्रसंग निर्माण झाल्यास याबाबतचे अंतिम सर्व अधिकार मा. महासंचालक, बार्टी व शासनास राहतील.

  • इच्छुक व पात्र उमेदवारांनी दि. १३/०६/२०२४ पासून खालील लिंकवरुन ऑनलाईन नोंदणी करावी.

स्वाक्षरी

(सुनिल वारे)
महासंचालक,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे

परिपत्रकाची पीडीएफ कॉपी हवी असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा

Leave a Comment

error: Content is protected !!