HSC SSC EXAM Online Correction Of Students Name Mothers Name Date Of Birth Category In Admit Card
HSC SSC EXAM Online Correction Of Students Name Mothers Name Date Of Birth Category In Admit Card
Class 10th 12th Board Exam 2026 Students’ mark sheets and certificates ‘combined’
SSC HSC MARK LIST MARK SHEET CERTIFICATE MERGED ONE
DAHAVI BARAVI PARISHA GUNPATRAK V PRAMANPTRA SWATANTRA N DETA EKATRIT
महत्वाचे
क.रा. गे/परीक्षा-७/१३३७पुणे ४११००४ दिनांक २५ /०३/२०२६
प्रति, विभागीय सचिव, सर्व विभागीय मंडळे,
विषय- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना द्यावयाचे एकत्रित गुणपत्रक व प्रमाणपत्राबाबत
संदर्भ दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ चा कार्यकारी परिषद ठराव क्र.११४
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, संदर्भिय ठरावानुसार फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेपासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतंत्र न देता ती ‘एकत्रित’ (Consolidated) देण्यात येणार आहेत. तसेच एकत्रित गुणपत्रक व प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांचे नाव First Name, Father Name Surname या क्रमाने छपाई करण्यात येणार आहे.
यासंदर्भात फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या प्रवेशपत्रांवरील छायाचित्र अस्पष्ट असल्यास, त्यावर योग्य फोटो चिकटवून संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी स्वाक्षरी करण्याचे निर्देश यापूर्वी दिलेले आहेतच. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांचे फोटो दुरूस्त केले आहेत, त्यांची माहिती एकत्रित गुणपत्रक व प्रमाणपत्रावर अचूक छापण्यासाठी पुन्हा अपलोड करणे आवश्यक आहे. त्याकरिता मंडळाच्या संकेतस्थळावर ‘Photo Correction’ ही लिंक कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याव्दारे फोटो दुरूस्ती करण्यात यावी.
त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या नावाच्या बदललेल्या क्रमाबाबतही सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सदर बाब अवगत करावी. त्यामुळे सदर क्रमाच्या अनुषंगाने कोणत्याही विद्यार्थ्याच्या नावात First Name, Father Name व Surname त्रुटी उद्भवणार असल्यास त्याबाबतची दुरूस्ती विभागीय मंडळांमार्फत तातडीने करूग घेण्याबाबत आपल्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय, मुख्याध्यापक / प्राचार्य, विद्यार्थी तसेच सर्व संबंधित घटकांना लिखित स्वरूपात अवगत करून देण्याबाबतची पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.
(मा. अध्यक्ष, राज्य मंडळ यांच्या मान्यतेने)
(डॉ. दिपक माळी) सचिव राज्यमंडळ, पुणे-०४.
प्रत माहिती व कार्यवाहीसाठी व्यवस्थापक, गणकयंत्र विभाग, राज्य मंडळ, पुणे,
ALSO READ 👇
HSC SSC EXAM Online Correction Of Students Name Mothers Name Date Of Birth Category In Admit Card
Admit Card Corrections Link
Board Exam Hall Ticket Corrections Link
Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education.

BIRTH DATE IS WRONG
CORRECT BIRTH DATE IS 10.10.2006