Homoeopathic Registered Doctors Can Sell Allopathic Medicines

Homoeopathic Registered Doctors Can Sell Allopathic Medicines

IMG 20241226 203114
Homoeopathic Registered Doctors Can Sell Allopathic Medicines

Homoeopathic Registered Doctors Can Sell Allopathic Medicines

Retail Medicines dealers can sell the Medicines on prescription given by these doctors.

Permission of the Homoeopathic medical practitioners registered in the state under the D *ru*gs and Cosmetics Act, 1940 and the rules thereunder, to practice modern medicine (Heterogeneous therapy) in the state of Maharashtra after completing the modern medicine certificate course approved by the state government.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्याअंतर्गत नियम राज्यात नोंदणीकृत होमिओपॅथी वैदयक व्यावसायिकांना राज्य शासनाने मान्यता दिलेला आधुनिक वैदयकशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, सदर अर्हताधारक होमिओपॅथी व्यावसायिकांस महराष्ट्र राज्यामध्ये आधुनिक वैदयकशास्त्र वैदयक (विषमचिकित्सा) पद्धतीने व्यवसाय करण्यास परवानगी देणेबाबत.

FDA Maharashtra
Government of Maharashtra Commissioner

Your Service is our Duty

Food and D*r*ug Administration, Maharashtra State, S.No. 341,Bandra East Mumbai

जा.क्र. औवि/ सीसीएमपी/233-२४/१५

दिनांक : २६/१२/२०२४

-: परिपत्रक :-

विषय:- औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्याअंतर्गत नियम राज्यात नोंदणीकृत होमिओपॅथी वैदयक व्यावसायिकांना राज्य शासनाने मान्यता दिलेला आधुनिक वैदयकशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, सदर अर्हताधारक होमिओपॅथी व्यावसायिकांस महराष्ट्र राज्यामध्ये आधुनिक वैदयकशास्त्र वैदयक (विषमचिकित्सा) पद्धतीने व्यवसाय करण्यास परवानगी देणेबाबत.

संदर्भ :- १. प्रशासक, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी, फोर्ट, मुंबई यांचे पत्र क्र. महोप- अस्था – २०२४/१०५६८,
दि.०७.१०.२०२४

२. महाराष्ट्र शासन, वैदयकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय यांचा शासन निर्णय क्र. एमएचसी – २०१४/प्र.क्र.३०८/१४/शिक्षण २, दि. १३/०८/२०१४

प्रशासनातील सर्व विभागीय सह आयुक्त (औषधे), सहायक आयुक्त (औषधे) व औषध निरीक्षक यांना कळविण्यात येते की, औषधे व सौदर्य प्रसाधने कायदा १९४० त्याअंतर्गत नियम १९४५ मधील नियम २ (ee) नुसार Registered Medical Practitioner हे Define आहेत. Registered Medical Practitioner च्या Prescription वर औषध विक्री करणे अनिवार्य आहे. तसेच Registered Medical Practitioner यांना घाऊक औषध विक्रेते किंवा किरकोळ औषध विक्रेते Allopathic औषधांची विक्री करू शकतात.

महाराष्ट्र वैदयकीय परिषद अधिनियम १९६५ (सुधारित दि.१८ मे, २०१६) मधील कलम २ (ङ) अन्वये वैदयकीय व्यावयसायिक बाबत व्याख्या नमूद आहे. तसेच त्यामध्ये जो व्यावसायिक महाराष्ट्र समचिकित्सा वैदयक व्यवसाय अधिनियम १९६० मधील कलम १६ मधील खंड २ अन्वये नोंदणीकृत असेल व ज्याने राज्य शासनाने मान्यता दिलेला सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएमपी) उत्तीर्ण केला असल्यास त्यांचा यात समावेश करण्यात आलेला आहे.

यावरून सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएमपी) अर्हताप्राप्त वैदयकीय व्यावसायिक हा महाराष्ट्र वैदयकीय परिषद अधिनियम १९६५ अन्वये वैदयक व्यवसायीक” या व्याख्येत समाविष्ट असून त्याला आधुनिक चिकित्सा पद्धतीची औषधे वापरून वैदयकीय व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र वैदयकीय परिषद १९६५ अंतर्गत नमूद अनुसूचीमध्ये ती व्यक्ती या कायदयाअंतर्गत Registered Medical Practitioner म्हणून नोंदणी करण्यास पात्र अर्हता नूमद आहे. अनुसूचीच्या अनुक्रमांक २८ वर खालीलप्रमाणे नोंद आहे.

“Registered practitioner as defined in Clause (16) of section 2 of the Maharashtra Homocopathic Practitioner’s Act who have passed the Certificate Course in Modern Pharmacology approved by the State Government.”

सबब सदर अर्हताधारक हे औषध व सौदर्य प्रसाधने नियम १९४५ मधील नियम २(७०) (0) नुसार Registered Medical Practitioner ठरतात.
तरी सर्व किरकोळ व घाऊक औषध विक्रेते हे सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएमपी) पुर्ण करणाऱ्या Homoeopathic नोंदणीकृत डॉक्टरांना Allopathic औषधांची विक्री करू शकतात तसेच किरकोळ औषध विक्रेते हे या डॉक्टरांद्वारे देण्यात आलेले Prescription वर औषध विक्री करू शकतात.

तथापि सदर महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसायिक यांच्या Prescription वर औषधांची विक्री करण्यापूर्वी सदर Prescription यर त्यांचा रजिस्ट्रेशन क्रमांक व तसेच सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएमपी) हि अर्हता प्राप्त केल्याबाबतचा सर्टिफिकेट क्रमांक नमूद असल्याबाबत खात्री करूनच सदर औषधांची विक्री करण्याची जबाबदारी हि किरकोळ औषध विक्रेते यांची राहील.

सर्व परवाना प्रधिकारी सहायक आयुक्त (औषधे) यांनी सदर बाब कार्यक्षेत्रातील औषधे विक्रेते यांच्या निदर्शनास आणावी.

CIRCULAR PDF COPY LINK

आयुक्त
अन्न व औषध प्रशासन, म.राज्य.

Leave a Comment

error: Content is protected !!