शालार्थ पोर्टल वरील सेवा समाप्त करणे शालार्थ आयडी चे नियमन करणे शाळेचे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर झाल्यास शालार्थ प्रणालीवर बदल करणेबाबत मार्गदर्शक सूचना Guidelines for terminating services on Shalarth portal regulating Shalarth ID and making changes to the Shalarth Pranali in case of school relocation from one district to another

Guidelines for terminating services on Shalarth portal, regulating Shalarth ID and making changes to the Shalarth Pranali in case of school relocation from one district to another

Guidelines regarding termination of services on the Shalarth portal, regulation of Shalarth ID, changes to the Shalarth system in case of school relocation from one district to another

शालार्थ पोर्टल वरील सेवा समाप्त करणे, शालार्थ आयडी चे नियमन करणे, शाळेचे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर झाल्यास शालार्थ प्रणालीवर बदल करणेबाबत मार्गदर्शक सूचना.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

क्र.शिसंमा/टी-७/२०२५-२६/5257

दिनांक १२/११/२०२५

विषय: शालार्थ पोर्टल वरील सेवा समाप्त करणे, शालार्थ आयडी चे नियमन करणे, शाळेचे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर झाल्यास शालार्थ प्रणालीवर बदल करणेबाबत मार्गदर्शक सूचना.

संदर्भ: १. शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद, सोलापूर यांचे पत्र क्र. जा.क्र/जिपसो/लेखा-९/बजेट/८०८/२०२५/सोलापूर, दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२५ रोजी प्राप्त पत्र.

२. जिल्हा परिषद, बीड शिक्षण विभाग (माध्यमिक) यांचे पत्र क्र. जा.क्र./जिपबी/विद्याथी/२०२५-२६/ ०५६५८, दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२५ रोजी प्राप्त पत्र.

३. जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग (प्राथमिक) यांचे पत्र क्र.जा.क्र.रजिप/शिक्षण/प्राथ/ई-१० /वेतन/९६६९/२०२५, दिनांक १६ ऑक्टोबर, २०२५ रोजी प्राप्त पत्र.

४. शासन निर्णय क्रमांक वेतन १२२१/प्र.क्र.४२/टीएनटी-३, दिनांक ०१ मार्च, २०२३.

शालार्थ आयडी देताना अनुसरावयाची कार्यपद्धती आणि कर्मचारी अभिलेखे डिजिटलाईज करणेबाबत वाचा या ओळीला स्पर्श करून

उपरोक्त संदभीय विषयाच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१. कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यास शालार्थ आयडी बंद करुन सेवा समाप्त करणे व सदरील कर्मचारी इतरत्र रुजू झाल्यास शालार्थ आयडी चे नियमन करणे

या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्याने ज्या शाळेवरुन राजीनामा दिलेला आहे त्या शाळेच्या विभागातील विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित कर्मचारी संबंधित विभागात अथवा इतर विभागात रुजू झाल्यास शालार्थ प्रणालीवरील सुविधा वापरुन त्याचा शालार्थ आयडी प्रथम पुनर्जिवित करावा. तद्नंतर ज्या शाळेतून राजीनामा देण्यात आलेला आहे त्या शाळेसंबंधित वेतन पथक अथवा गटशिक्षणाधिकारी (डीडीओ-२) यांनी संबंधित कर्मचाऱ्यास DETACH करावे, हा कर्मचारी ज्या शाळेत नव्याने रुजू झाला आहे त्या शाळेसंबंधित वेतन पथक अथवा गटशिक्षणाधिकारी (डीडीओ-२) यांनी या कर्मचाऱ्यास ATTACH करण्याची कार्यवाही करण्यात यावी. यापूर्वीचा शालार्थ असल्याने नव्याने शालार्थ आयडी तयार करु नये,

Shalarth ID Scam SIT Implementation अपात्र शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाहयरित्या समाविष्ट करुन वेतन अदा केल्यासंदर्भात विशेष चौकशी पथक तयार करण्यात आले आहे त्याअनुषंगाने चौकशी प्रकरणी करावयाच्या कार्यवाहीबाबत वाचा या ओळीला स्पर्श करून

२. शाळा इतर जिल्ह्यात स्थलांतरीत झाल्यास शालार्थ प्रणालीवर करावयाच्या बदलाबाबत

या संदर्भात एखादी शाळा त्याच जिल्ह्यात इतर जिल्ह्यात इतर विभागातील जिल्ह्यात स्थलांतरीत झाल्यास सदरील शाळा ज्या जिल्ह्यात स्थलांतरीत झालेली आहे त्या विभागातील विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सदरील शाळेचा पूर्वीचा चुडायस क्रमांक वापरुन सदरील शाळा त्यांचे विभागात स्थलांतरीत ठिकाणी प्रणालीवरील सुविधेचा उपयोग करुन पुनर्जिवित कराया व स्थलांतरीत ठिकाणी हस्तांतरीत करावा. यानंतर संबंधित वेतन पथक अथवा गटशिक्षणाधिकारी (डीडीओ-२) यांनी सदरील शाळेचे स्थलांतरीत ठिकाणी शालार्थ प्रणालीवर School Configuration करुन घ्यावे. अथवा सदरील शाळा ज्या ठिकाणी स्थलांतरीत झालेली आहे त्या विभागातील विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी नवीन युडायस क्रमांकाच्या आधारे सदरील शाळेचा समावेश संबंधित वेतन पथक अथवा गटशिक्षणाधिकारी (डीडीओ-२) यांनी सदरील शाळेचे स्थलांतरीत ठिकाणी शालार्थ प्रणालीवर School Configuration करुन घ्यावे.

Ineligible names of teachers non teaching staff in Shalarth Pranali salary payment investigation by SIT राज्यातील अपात्र शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्यरित्या समाविष्ट करून वेतन अदा केल्यासंदर्भात विशेष चौकशी पथक मार्फत चौकशी करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित वाचा या ओळीला स्पर्श करून

३. पवित्र प्रणालीमार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांना शालार्थ आवडी प्रदान करणेबाबत

यासंदर्भात संबंधित शाळेच्या शालार्थ प्रणालीवर पदे नमूद नसल्यास संचमान्यते प्रमाणे विभागीय शिक्षण उपसंचालक/अध्यक्ष, विभागीय शिक्षण मंडळ यांनी त्यांचेकडील प्रणालीवरील सुविधेचा वापर करुन पदे निर्माण करावीत व अशा कर्मचाऱ्यास शालार्थ आयडी देण्याची कार्यवाही करावी.

४. अध्यापक विद्यालयातील नव्याने रुजू होणाऱ्या शिक्षकांना शालार्थ आयडी देणेबाबत –

पवित्र पोर्टल मार्फत अध्यापक विद्यालयातील नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांना वेतन सुरु करण्यासाठी अध्यापक विद्यालयांना युडायस क्रमांक नसल्यामुळे यापूर्वीच्या प्रचलित कार्यपध्दतीनुसार संबंधित विभागाचे विभागीय अध्यक्ष यांनी त्यांच्या ऑफलाईन पध्दतीने शालार्थ आयडी देण्याची कार्यवाही करावी.

५ . दोन शाळा/शाखा/तुकडयांवर अर्धवेळ म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या अर्धवेळ कार्यभाराचे वेतन शालार्थ प्रणालीतून करण्याबाबत.

प्रस्तुत प्रकरणी शासन निर्णय क्रमांक वेतन १२२१/प्र.क्र.४२/ टीएनटी-३ दिनांक ०१ मार्च २०२३ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात यावी.

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे

महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
( माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य,पुणे

Guidelines for terminating services on Shalarth portal regulating Shalarth ID and making changes to the Shalarth Pranali in case of school relocation from one district to another
Guidelines for terminating services on Shalarth portal regulating Shalarth ID and making changes to the Shalarth Pranali in case of school relocation from one district to another

Leave a Comment

error: Content is protected !!