GPF Slip Facility Live In Shalarth Pranali भ नि नि लेखा चिठठी सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये लाईव्ह

GPF Slip Facility Live In Shalarth Pranali

IMG 20250616 101717
GPF Slip Facility Live In Shalarth Pranali

GPF Slip Facility Live In Shalarth Pranali

Regarding making the GPF Slip facility live in the Shalaarth system.

भ.नि.नि. लेखा चिठठी (GPF Slip) ही सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये Live करणेबाबत.

शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, मध्यवर्तीइमारत, पुणे

क्र.शिसंमा/२०२४/टि-७/शालार्थ/जीपीएफ/स्लीप / 2938

दिनांक :- /०६/२०२५.

प्रति,

श्री. पवन जोशी,

11.3 JUN 2025

प्रोजेक्ट लिड,

शालार्थ सिस्टीम, महाआयटी मुंबई-३२

विषय- भ.नि.नि. लेखा चिठठी (GPF Slip) ही सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये Live करणेबाबत.

संदर्भ- १) संचालनालयाचे पत्र दिनांक १३/५/२०२५

२) वेतन पथक (माध्यमिक) पुणे यांचे पत्र क्र. वेवभनिनिपपु/१७५४/२५-२६ दिनांक २७/५/२०२५.

३) वेतन पथक (माध्यमिक) कोल्हापूर यांचे पत्र क्र. वेपमाको/भ.नि.नि.ले.चि/२०२५ दि २७/५/२०२५.

संदर्भ क्र. १ अन्वये दिनांक ८/५/२०२५ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्तानुसार वेतन पथक, माध्यमिक, पुणे आणि कोल्हापूर यांना त्यांचे कार्यक्षेत्रातील ५-६ शिक्षक कर्मचा-यांचे शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन भनिनि चिठठी तयार करून पडताळणी करणेबाबत कळविण्यात आले होते.

संदर्भ क्र. २ व ३ अन्वये वेतन वेतन पथक पुणे आणि कोल्हापूर यांनी ५-६ शिक्षक कर्मचा-यांचे शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन भनिनि चिठठी तयार करून वेतन पथक कार्यालयातील अभिलेख्याशी पडताळणी करण्यात आली असून सदर कर्मचा-यांच्या शालार्थ प्रणालीमध्ये भनिनि चिठठी व वेतन पथक कार्यालयातील अभिलेख्यांच्या भ.नि.नि चिठठया सुसंगत आढळून आल्याबाबत संचालनालयास अहवाल सादर करण्यात आलेला आहे. तथापि भनिनि चिठठी शालार्थ प्रणालीमध्ये Live करणेबाबत विनंती करण्यात आली आहे.

सबब संदर्भ क्र. २ व ३ अन्वये सादर अहवालानुसार भ.नि.नि. लेखा चिठठी (GPF Slip) ही सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये तात्काळ Live करण्यात यावी.

या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल या संचालनालयास सादर करावा.

शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)

प्रत- शिक्षणाधिकारी/शिक्षण निरीक्षक/अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) संबंधित सर्व यांना कळविण्यात येते की, उपरोक्त विषयी संदर्भ क्र. २ व ३ अन्वये सादर अहवालानुसार भ.नि.नि. लेखा चिठठी (GPF Slip) ही सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये Live करण्यात येत असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे भ.नि.नि. लेखा चिठठ्याचे वाटप तात्काळ पूर्ण करावे.

शिक्षक कर्मचा-यांचा शालार्थ आयडी हाच त्याचा GPF नंबर असेल. शिक्षकांचे जिल्हयाबाहेर बदली झाली तरी त्याचे खाते वर्ग करण्याची आवश्यकता राहणार नाही.

तसेच सन २०२१ ते २०२४ पर्यंत जे अग्रीम घेतले आहे त्याची नोंद करूनच जीपीएफ स्लीपांचे वाटप करावे.

प्रत- विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व.

प्रत- माहितीस्तव सविनय सादर.

१. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-१

२. वि. र. परमार, अवर सचिव, टिएनटी-६, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई-३२

३. कक्ष अधिकारी, टिएनटी-३ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई-३२

IMG 20250616 100352
GPF Slip Facility Live In Shalarth Pranali

शालेय शिक्षण विभाग
अधीक्षक वेतन व भ.नि.नि. पथक (माध्यमिक) पुणे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद कार्यालय आवार कुमठेकर रोड, सदाशिव पेठ, पुणे -३०

जा.क्रं वेवभनिनिपपु/ १७५४ / २५-२६

दिनांक ०५.२०२५

27 MAY 2025

प्रति, मा. शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे

विषयः शालार्थ प्रणालीमध्ये भ नि नि लेखाचिठ्ठी तयार करणेबाबत..

संदर्भ : दिनांक ०८.०५.२०२५ रोजीच्या बैठकीचे आपले कार्यालयाचे इतीवृत्त

महोदय,

उपरोक्त विषयान्वये दिनांक दिनांक ०८.०५.२०२५ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार या कार्यालयांतर्गत ५ कर्मचाऱ्यांच्या शालार्थ प्रणालीमध्ये भ.नि.नि चिड्डी तयार करून त्या या कार्यालयातील अभिलेख्यांशी पडताळणी करण्यात आली आहे. सदर कर्मचाऱ्याच्या शालार्थ प्रणालीमध्ये भ नि नि चिठ्ठी व या कार्यालयातील अभिलेख्यांच्या भ नि नि चिठ्ठया या सुसंगत आढळुन आल्या आहेत. सोबत उपरोक्त नमुद कर्मचाऱ्यांचे शालार्थ प्रणालीमध्ये भ नि नि चिड्डी व या कार्यालयातील अभिलेख्यांच्या भ नि नि चिठ्ठया सविनय सादर करण्यात येत आहे.

तथापी शालार्थ प्रणालीमध्ये सन २०२४-२५ या कालावधीतील सर्व कर्मचाऱ्यांचे व्याजाची गणना दिसुन येत नाही. सदर बाब शालार्थ प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याबाबत विनंती करण्यात येत आहे. तरो भनि नि चिड्डी शालार्थ प्रणालीमध्ये लाईव्ह करण्यास हरकत नाही.

हे आपले माहितीस्तव व कार्यवाहीस्तव सविनय सादर.

आपला विश्वासु

अधिक्षक (शहर)

वेतन व भ.नि.नि.पथक, (माध्यमिक) पुणे.

प्रतः मा. शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर.

IMG 20250616 100506
GPF Slip Facility Live In Shalarth Pranali

Leave a Comment

error: Content is protected !!