Four year degree courses Honours and Honours with Research GR
Four year degree courses Honours and Honours with Research GR
Guidelines for four year degree courses Honours and Honours with Research GR
Regarding issuance of guidelines for the fourth year Honours and Honours with Research courses in the four-year degree course (under NEP-2020)
Char varsh padavi abhyaskram Sanman Sanshodhan Margdarshak tatve Shasan nirnay
चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील (NEP-२०२० अन्वये) चौथ्या वर्षाच्या ऑनर्स व ऑनर्स विथ रिसर्च अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२६/ई-१६०९७२२/विशि-३
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, ४ था मजला, मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२
दिनांक : ०६ एप्रिल, २०२६
संदर्भः
(१) उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. एनईपी-२०२२/प्र.क्र.०९/विशि-३/ शिकाना, दि. २०.०४.२०२३
(२) उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. एनईपी-२०२२/प्र.क्र.०९/विशि-३/ शिकाना, दि. १६.०५.२०२३
(३) उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. एनईपी-२०२२/ (६७/२३)/तांशि-२/ शिकाना, दि. ०४.०७.२०२३
(४) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद (MahaSARC) यांचा दि. २७.०३.२०२६ रोजीचा ई-मेल संदेश
प्रस्ततावना:-
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने उच्च शिक्षण व्यवस्थेत लवचिकता, बहुपर्यायी प्रवेश व निर्गमन व्यवस्था, तसेच कौशल्याधिष्ठित व संशोधनाभिमुख शिक्षणाला चालना देण्यासाठी पदवी अभ्यासक्रमांची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने शासन निर्णय, दिनांक २०.०४.२०२३, १६.०५.२०२३ व शासन निर्णय, दि. ०४.०७.२०२३ अन्वये तीन वर्षीय/चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच अभियांत्रिकी शिक्षणासाठी क्रेडिट फ्रेमवर्क निश्चित करण्यात आले आहे.
सदर शासन निर्णयांमध्ये नमूद तरतुदींनुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील चौथे वर्ष (ऑनर्स व ऑनर्स विथ रिसर्च) लागू करण्याचे नियोजित असून, राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्न/स्वायत्त महाविद्यालयांमध्ये या अभ्यासक्रमाची सुसूत्र, प्रभावी व एकसमान अंमलबजावणी सुनिश्चित करण्याची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने महासार्कने मार्गदर्शक तत्वे तयार करून सर्व कुलगुरू व प्र-कुलगुरू यांना पाठविली. त्यांच्याकडून प्राप्त सूचना विचारात घेऊन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेने (MahaSARC) सदर अभ्यासक्रमांसाठीची सुधारीत मार्गदर्शक तत्वे तयार केली. त्यानुसार अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांनी सदर मार्गदर्शक सूचना लागू करण्याबाबतचा ठराव संदर्भ क्र. ४ येथील ई-मेल संदेशान्वये शासनास सादर केला आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांच्याकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांच्या ठरावास अनुसरून चौथ्या वर्षातील ऑनर्स व ऑनर्स विथ रिसर्च कार्यक्रमाच्या अमंलबजावणीसंदर्भात आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय:-
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील चौथे वर्ष (ऑनर्स व ऑनर्स विथ रिसर्च) लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठे व संलग्न / स्वायत्त महाविद्यालयांमध्ये चौथ्या वर्षाच्या ऑनर्स व ऑनर्स विथ रिसर्च अभ्यासक्रमाची सुसूत्र, प्रभावी व एकसमान अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना सोबत जोडलेल्या प्रपत्र-अ मध्ये विहित करण्यात येत आहेत.
२. सदर मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम-२०१६ मधील कलम ५ (८१) मधील तरतूदीनुसार निर्गमित करण्यात येत आहेत.
३. या मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीबाबतचा आढावा शासनामार्फत सुकाणू समितीच्या माध्यमातून वेळोवेळी घेण्यात येईल.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०४०६१९४४१२८३०८ असा आहे. सदर निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
शासन निर्णय पीडीएफ प्रत लिंक
(प्रताप पां. लुबाळ) उप सचिव, महाराष्ट्र शासन
प्रतिः-
१. मा. राज्यपाल यांचे सचिव, लोकभवन, मलबार हिल मुंबई,
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,

