FLS Survey
FLS Survey
Class 3rd FLS Survey SCERT PUNE Guidelines
FLS 2026 Foundational Learning Study Circular
Payabhut Shikshan Abhyas
FLS QUESTION PAPER PDF
FLS QUESTION PAPER MEDIUM MARATHI HINDI URDU
FLS 2026 PRACTICE QUESTION PAPER WITH ANSWERS
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
जा.क्र. राशैसंप्रप/मूल्यमापन/FLS२०२६/२०२५-२६/
दिनांक: १२..०२.२०२६
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग
२. उपसंचालक, विभागीय विद्या प्राधिकरण, सर्व
३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व
४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व
५. प्रशासन अधिकारी, मनपा/नपा, सर्व
६. शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई
विषय : FLS-२०२६ (Foundational Learning Study) साठी आवश्यक कार्यवाही करणे बाबत.
संदर्भ :
१. मा. अध्यक्ष, परख यांचे ई-मेल दिनांक २७.०१.२०२६
२. मा. अध्यक्ष, परख यांचे ई-मेल दिनांक ०४.१२.२०२५
३. मा. अध्यक्ष, परख यांचे ई-मेल दिनांक ०२.०२.२०२६
वरील संदर्भीय विषयानुसार कळविण्यात येते की, परख राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र, NCERT, नवी दिल्ली मार्फत दिनांक ११ ते १३ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील सर्व माध्यमांच्या निवडक शाळांमधील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी FLS-२०२६ (Foundational Learning Study) हे सर्वेक्षण आयोजित करण्यात येणार आहे.
सदर सर्वेक्षण देशात प्रथमच App Based (Tablet आधारित) पद्धतीने घेण्यात येणार आहे. यासाठी नमुना FLS सराव चाचणी पत्रिका सोबत देण्यात येत आहे. सदर नमुना चाचणीचा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांकडून सराव करून घेण्याबाबत आपल्या स्तरावर तात्काळ सूचना निर्गमित करून आवश्यक नियोजन करावे. सराव घेतानाचे छायाचित्रे व व्हिडिओ निर्धारित लिंकवर अपलोड करावेत. सदर सर्वेक्षणामध्ये Random Selection द्वारे निवडलेल्या विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाची चाचणी घेण्यात येणार असून त्यावरून जिल्ह्याचे स्थान निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे या बाबीकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
१. जिल्हास्तरीय समन्वयकांचे नामनिर्देशनः
FLS-२०२६ साठी राज्यस्तरावर व प्रत्येक जिल्हास्तरावर प्रत्येकी केवळ एक (०१) वरिष्ठ अधिव्याख्याता/अधिव्याख्याता यांना समन्वयक म्हणून नामनिर्देशित करावा.
संबंधित समन्वयकांची संपूर्ण माहिती (पूर्ण नाव, पदनाम, भ्रमणध्वनी क्रमांक, वैध व कार्यरत ई-मेल आयडी) सादर करावी.
सदर ई-मेल आयडीचा वापर डिजिटल अॅप्लिकेशनमध्ये लॉग-इन, OTP प्राप्त करणे, जिल्हा तपशील नोंदविणे व Field Investigators ची माहिती अपलोड करण्यासाठी होणार असल्याने तो नियमितपणे तपासला जाणारा असावा.
जिल्हा समन्वयक यांच्याकडे District Tablet Collector म्हणूनही जबाबदारी राहील. जबाबदाऱ्याः
राज्य स्तरावरून टॅबलेट स्वीकारणे.
तालुका/क्षेत्रीय अन्वेषकांना वितरण करणे.
सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर टॅबलेट संकलित करून राज्य स्तरावर परत पाठविणे.
२. क्षेत्रीय अन्वेषक (Field Investigators – Fls) यांची नियुक्ती DIET मधील तंत्रस्नेही वरिष्ठ अधिव्याख्याता/अधिव्याख्याता/शासकीय अनुदानित अध्यापक विद्यालयातील तंत्रस्नेही अध्यापक यांची FI म्हणून नियुक्ती करावी व आदेश निर्गमित करावेत.
प्रत्येक निवडलेल्या (Sampled) शाळेसाठी एक (०१) FI नियुक्त करावा.
१०% अतिरिक्त राखीव FI नियुक्त करून त्यांना प्रशिक्षण द्यावे.
नियुक्त FI यांना संबंधित शाळेच्या अध्यापन माध्यमाचे (Mol) उत्तम ज्ञान असावे.
मुंबई क्षेत्रासाठी उपसंचालक, विभागीय विद्या प्राधिकरण यांनी निर्णय घ्यावा.
३. माहिती सादर करण्याबाबत
सर्व आवश्यक माहिती खालील लिंक मध्ये दिनांक १४.०२.२०२६ रोजी दुपारी २.०० वाजेपर्यंत भरावी.
जिल्हा समन्वयक तसेच जिल्हानिहाय / तालुकानिहाय FIs माहिती लिंक
Google Sheet Link:
लिंक मध्ये भरलेली माहिती साक्षांकित करून soft copy या कार्यालयाच्या
📩
evaluationdept@maa.ac.in
या ई-मेलवर पाठवावी.
४. इतर सूचना
PARAKH कडून FLS-२०२६ ची Sampling List नामनिर्देशित ई-मेल आयडीवर शाळांना पूर्वसूचना न देता पडताळणीसाठी पाठविण्यात येईल.
. सराव चाचणी पत्रिका जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील संबंधित शाळांपर्यंत तात्काळ पोहोचविण्याची दक्षता घ्यावी.
जिल्हा स्तरावर FLS – २०२६ च्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या सराव चाचणी पत्रिका सर्व माध्यमातील सर्व शाळांपर्यंत पोहोचवावे व त्यासाठी विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेण्यात यावी. तसेच आपण स्वतः शाळा भेट देऊन या बाबत मार्गदर्शन करावे.
तसेच सरावाचे काही क्षणचित्रे व VIDEOS खालील लिंक मध्ये UPLOAD करावे.
https://drive.google.com/drive/folders/1ykB6ewnuQw4UfZHheIqZHVvEH4tZxDPV
वरीलप्रमाणे सर्व बाबींची तात्काळ व प्राधान्याने कार्यवाही करावी. हा राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाचा उपक्रम असल्याने सर्व संबंधितांनी समन्वयाने कामकाज करावे.
Digitally signed by HEMANT SHARACHCHANDRA VASEKAR
Date: 16-02-2026 11:24:02
संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे
प्रत माहितीस्तव :
१. मा. प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई
२. मा. प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई
३. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे
४. मा. अध्यक्ष, परख NCERT नवी दिल्ली.
