EWS Ten Percent Reservation
EWS Ten Percent Reservation
EWS OPEN Category Ten Percent Reservation For Admission
EWS OPEN Category Ten Percent Reservation For Educational Institutions Admission Government Services
Ten Percent Reservation EWS OPEN Category For Admission
10% reservation for economically weaker sections in open category for admission to government services and educational institutions
Regarding prescribing 10% reservation for admission to government services and educational institutions for the economically weaker sections in the open category.
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाकरिता १०% आरक्षण विहित करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांक: राआघो-४०१९/प्र.क्र.३१/आरक्षण-१.
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, विस्तार इमारत ४ था मजला, मंत्रालय, मुंबई ४०००३२.
दिनांक ३० डिसेंबर, २०२५.
संदर्भ शासनाचा समक्रमांक दि. १२.०२.२०१९ रोजीचा शासन निर्णय
प्रस्तावना -राज्य शासनाने दि.१२.२.२०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये शासकीय सेवा व शैक्षণिক संस्थांमध्ये प्रवेशाकरिता १०% आरक्षिण विहित केलेले आहे. सदर शासन निर्णयामधील परिच्छेद २ (क) (२) मध्ये कुटुंबाची व्याख्या पुढील प्रमाणे देण्यात आली आहे. या आरक्षणाच्या लाभासाठी कुटुंब म्हणजे अर्जदाराचे / उमेदवाराचे आई-वडील व १८ वर्षाखालील भावंडे तसेच अर्जदाराची/ उमेदवाराची १८ वर्षांखालील मुले व पती पत्नी यांचा समावेश होईल. एकत्रित उत्पन्नात त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या सर्व स्रोतांमधून मिळणाऱ्या या उत्पन्नाचा समावेश असेल म्हणजेच वेतन, कृषी उत्पन्न, उदद्योग-व्यवसाय या व इतर मार्गातून होणारे, अर्ज दाखल करण्याच्या दिनांकाच्या मागील आर्थिक वर्षाचे उत्पन्न एकत्रितपणे रु. ८ लाखापेक्षा कमी असावे.”
२० तथापि, केंद्र शासनाच्या दि. ३१.१.२०१६ रोजीच्या आदेशामध्ये कुटुंबाची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे. The tema “Family” for this purpose will include the person who seeks henefit of reservation, hischer parents and siblings below the age of 18 years as also his/her spouse and children below. the age of 18 years
तसेच, मा. प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद दाखल मुळ अर्ज क्र. ९७८/२०२५ मध्ये मा. प्रशासकीय न्यायाधिकरणाने शासन निर्णय दि. १२.०२.२०१९ मधील परि. २ (क) (१), (२) आणि (३) च्या अनुषंगाने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी लान देताना कुटुंबाच्या व्याख्येत उत्पन्न निश्चित करताना अर्जदाराच्या उत्पन्नाचा त्यामध्ये समावेश होतो किंवा कसे याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून लेखी स्वरूपात सुचना घेण्यात याव्यात असे निर्देश दि. २२.०९.२०२५ रोजी झालेल्या सुनावणी वेळी दिलेले आहेत. यानुषंगाने केंद्र शासनाच्या दि. ३१.१.२०१९ रोजीच्या आदेशात केलेल्या कुटुंबाची व्याख्या विचारात घेता, दि. १२.०२.२०१५ रोजीच्या शासन निर्णयातील कुटुंबाच्या व्याख्येत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती,
शासन शुद्धीपत्रक
सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय दि. १२.०२.२०१९ मधील परि. (का) (२) मध्ये कुटुंबाची व्याख्या दिलेली आहे. त्यामध्ये या आरक्षणाच्या लाभासाठी कुटुंब म्हणजे अर्जदाराचे उमेदवाराचे आई वडील व १८ वर्षाखालील भांवडे तसेच अर्जदाराची उमेदवाराची १८ वर्षाखालील मुले व पती/पत्नी यांचा समावेश होईल, कुटूंबाच्या एकत्रित उत्पन्नात त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या सर्व स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पनाचा समावेश असेल म्हणजेच वेतन, कृषि उत्पन्न, उद्योग-
व्यवसाय या व इतर सर्व मार्गातून होणारे, अर्ज दाखल करण्याच्या दिनांकरच्या मागील आर्थिक वर्षाचे उत्पन्न एकत्रितपणे रु.८ लाखापेक्षा कमी असाचे”
याऐवजी खालीलप्रमाणे वाचाचे.
“या आरक्षणाच्या लाभासाठी कुटुंब म्हणजे अर्जदार/उमेदवार, अर्जदार/उमेदवाराचे आई-वडील, १८ वर्षाखालील भावंडे, पती/पानी व १८ वर्षांखालील मुले यांचा समावेश होईल. एकत्रित उत्पन्नात त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या सर्व स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश असेल म्हणजेच अर्ज दाखल करण्याच्या दिनांकाच्या मागील आर्थिक वर्षांचे वेतन, कृषी उत्पन्न, उदयोग व्यवसाय या व इतर मार्गातून प्राप्त होणारे उत्पन्न एकत्रित उत्पन्न रु. ८ लाखापेक्षा कमी असावे.”
२. तसेच, दि. १२.२.२०१९ व्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट ड खालीलप्रमाणे सुधारित
करण्यात येत आहे.
परिशिष्ट
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी घोषणापत्र
वय व्यवसाय खाली स्वाक्षरी करणार शपथेवर घोषित करतो की, मी स्वत: साठी)/ मी -यांच्या नावे (अर्जदार अज्ञान असल्याने आर्थिकटष्टया दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला आहे. माइया/अर्जदाराच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे सर्व खोतातून मागील आर्थिक वर्षात प्राप्त झालेले उत्पन्न खालील प्रमाणे घोषित करीत आहे. सदर उत्पन्न शासनाने आर्थिकरष्ट्या दुर्बल घटकासाठी विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेत येत असल्याने भी/अर्जदार बार्मिकरष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गात मोडतो.
अ.क्र. उत्पन्नाचा मार्ग
आर्थिक वर्ष
वेतन/मजूरी पासूनचे
उत्पन
२.
व्यवसायापासूनचे उत्पन्न
कृषी उत्पन
गुंतवणुकीच्या स्रोत्रापासून
उत्पन्न
वरील श्रोताव्यतिरिक्त
उत्पन्न
इतर स्रोत्रापासून मिळणारे
एकूण उत्पन्न
मी असे घोषित करतो की, वरील माहिती माझ्या माहितीप्रमाणे पूर्णपणे सत्य आहे आणि भी अर्जदार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे लाभ घेण्यासाठी पात्र आहे.
ठिकाण
दिनांक-
अर्जदारावी स्वाक्षरी
(अर्जदार अज्ञान असल्यास त्याचे आई वडील
/पालक यांची स्वाक्षरी)
3 सदरचे शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक २०२५१२३०१९२०२३३२००७ आहे. हे शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
शासन शुद्धीपत्रक पीडीएफ प्रत लिंक
उप सचिव, महाराष्ट्र शासन
