Eligibility For Selection Grade

Eligibility For Selection Grade

Eligibility For Selection Grade

Eligibility For Selection Grade for Teachers

Qualifications required for selection Grade for secondary teachers

Eligibility for selection category for teachers in private secondary schools in the state has been fixed.

Regarding determining the qualifications for selection grade category for teachers in private secondary schools in the state.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Join Now

राज्यातील खाजगी माध्यमिक शाळांतील शिक्षकांना निवडश्रेणीसाठी अर्हता निश्चित करण्याबाबत.

तारीखः १५ जुलै, २०१६

वाचा – शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक पीआरई २००२/ ३३९५/प्राशि-१ दि.२७.२.२००३

शासन शुध्दीपत्रक –

राज्यातील खाजगी माध्यमिक शाळांतील शिक्षकांना निवडश्रेणी अर्हता निश्चित करण्याबाबत पारित करण्यात आलेल्या संदर्भाधीन शासन निर्णय, दि. १ डिसेंबर, १९९९ मधील खालील परिच्छेद – २

“इतर विषयांच्या शिक्षकांना “शिक्षकाच्या अध्यापनाच्या विषयाची पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम अर्हता” तसेच ” ज्या अध्यापनाच्या विषयाची पदव्युत्तर पदवी बहिस्थः रित्या संपादन करणे शक्य नसेल त्या ठिकाणी एम. एड. ही पदवी” ग्राहय धरण्यात यावी.”

            या ऐवजी

“शिक्षकाच्या शैक्षणिक अर्हतेबाबत इतर विषयाच्या शिक्षकांना” शिक्षकाच्या अध्यापनाच्या विषयाची पदव्युत्तर पदवी किंवा ज्या अध्यापनाच्या विषयाची पदव्युत्तर पदवी नियमितरित्या संपादन करणे शक्य नसल्यास त्या ठिकाणी बहिस्थः रित्या प्राप्त केलेल्या त्या विषयातील पदव्युत्तर पदवी अथवा एम.एड. ही पदव्युत्तर पदवी ग्राह्य धरण्यात यावी, तसेच एम.ए. (एज्युकेशन) ही पदवी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (N.C.T.E.) च्या दि. २८.११.२०१४ च्या अधिसूचनेनुसार एम.एड. पदवी समकक्ष समजण्यात यावी.” असे वाचण्यात यावे.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१६०७१६१५०६२१८४२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

  शासन निर्णय शासन शुद्धिपत्रक पीडीएफ लिंक

उप सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांकः संकीर्ण-२०१५/(प्र.क्र.३१)/टीएनटी-१,मंत्रालय, मुंबई

IMG 20260215 065537

Leave a Comment

error: Content is protected !!