Educational Loan Interest Repayment Scheme महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्याबाबत

Educational Loan Interest Repayment Scheme

implementation of Educational Loan Interest Repayment Scheme GR

Educational Loan Interest Repayment Scheme

Regarding implementation of educational loan interest repayment scheme through Maharashtra State Other Backward Classes Finance and Development Corporation

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्याबाबत

महाराष्ट्र शासन
इतर मागास बहुजन कल्याण विभाग

शासन शुध्दिपत्रक क्रमांक: महामं-२०२५/प्र.क्र.८७/महामंडळे, मुंबई ४०० ०२०.

दिनांक :- ३१ जुलै, २०२५

संदर्भ :- इतर मागास बहुजन कल्याण विभाग, शासन निर्णय क्रमांक इमाव-२०२१/प्र.क्र. २३/महामंडळे, दिनांक ०६ डिसेंबर, २०२१

   शासन शुध्दिपत्रक

संदर्भाधीन शासन निर्णयातील लाभार्थीच्या पात्रतेच्या अटी व शर्तीमधील अट क्र.३ “अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण व शहरी भागाकरीता रू. ८.०० लक्ष पर्यंत व शासनाच्या सक्षम प्राधिकरणाने वेळोवळी निर्धारित केलेल्या नॉन क्रिमीलेअर च्या मर्यादेत”

या ऐवजी

“अर्जदाराने ग्रामीण व शहरी भागाकरीता कौटुंबिक वार्षिक उत्पन्नासंदर्भात नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे” असे वाचावे.

सदर शासन शुध्दिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२५०७३११७०६३४०९३४ असा आहे. हे शासन शुध्दिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

शासन शुद्धिपत्र पीडीएफ मध्ये प्राप्त करा या ओळीला स्पर्श करून

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.

२. सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.

३. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

४. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, मुंबई.

५. निवडनस्ती (महामंडळे).

IMG 20250802 211351
Educational Loan Interest Repayment Scheme

Leave a Comment

error: Content is protected !!