Educational Calendars Videos R1 R2 Textbooks For Teachers Teaching English To Grade 1 इयत्ता पहिलीला इंग्रजी शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी R1 व R2 पाठ्यपुस्तकातील घटकांवर आधारित तयार करण्यात आलेल्या शैक्षणिक दिनदर्शिका व व्हिडिओज राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्थेकडून उपलब्ध

Educational Calendars Videos R1 R2 Textbooks For Teachers Teaching English To Grade 1

IMG 20250624 092446
Educational Calendars Videos R1 R2 Textbooks For Teachers Teaching English To Grade 1

Educational Calendars Videos R1 R2 Textbooks For Teachers Teaching English To Grade 1

Educational calendars and videos based on elements from R1 and R2 textbooks for teachers teaching English to Grade 1

Educational calendars and videos for Teachers by SCERT PUNE GUIDELINES

My English Book Grade One

This textbook aligns with the curriculum and syllabus developed by the State Council of Educational Research and Training (SCERT), Maharashtra, Pune and has been verified by them. The Coordination Committee. established under Government Resolution by GR No. Abhyas-2116/(Pra.Kra.43/16) SD-4 dated April 25, 2016, approved this textbook in its meeting held on April 16, 2025 for use from academic year 2025-26 onwords.

*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*

*विषयः- इयत्ता पहिलीला इंग्रजी शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी R1 व R2 पाठ्यपुस्तकातील घटकांवर आधारित तयार करण्यात आलेल्या शैक्षणिक दिनदर्शिका व व्हिडिओज प्रस्तुत कार्यालयाच्या वेबसाईटवर अपलोड केलेबाबत…*

    इयत्ता पहिली R1 (इंग्रजी माध्यम)व R2 (इंग्रजी माध्यम वगळून अन्य माध्यमांसाठी) इंग्रजी भाषा विषय पाठ्यपुस्तकातील घटकांच्या अध्ययन- अध्यापनास सहाय्य व्हावे म्हणून इयत्ता पहिलीला शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी शैक्षणिक दिनदर्शिका शालेय वेळापत्रक तपशीलानुसार अनुक्रमे ५२५ आणि ३१५ तासिका लक्षात घेऊन प्रस्तुत कार्यालयातील इंग्रजी भाषा विभागामार्फत विकसित केलेली आहे. याचा वापर दैनंदिन अध्यापनात करणेविषयी सूचित करण्यात यावे.

याचबरोबर राज्यातील शिक्षकांना प्रत्येक तासिका वर्गात कशी घ्यावी या संदर्भात इयत्ता पहिलीच्या “My English Book Grade One (R2) इंग्रजी भाषा विषय पाठ्यपुस्तकातील घटक व शैक्षणिक दिनदर्शिका यावर आधारित एका व्हिडीओमार्फत पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तक परिचय तर पाठ्यपुस्तकातील आशयावर आधारित सुरुवातीच्या एकूण ३४ तासिकांच्या व्हिडीओजची निर्मिती केलेली आहे. या व्हिडीओज मार्फत शिक्षकांना त्याच्या दैनंदिन अध्यापनात करावे लागणारे नियोजन, आशयावर आधारित एका घ्यावयाच्या कृती, आवश्यक कृतींचे दिग्दर्शन, पूरक कृतीचे नियोजन व अंमलबजावणी आणि करावे लागणारे मूल्यांकन याबाबतच्या मार्गदर्शक सूचना प्रत्येक व्हिडीओमध्ये सखोल दिलेल्या आहेत.

फक्त इयत्ता पहिलीच्या “My English Book Grade One (R2) साठी तयार केलेले  ३४ व्हिडीओज प्रस्तुत कार्यालयाच्या
www.maa.ac.in
या वेबसाईटवर समन्वय विभागांतर्गत इंग्रजी भाषा विभागाच्या tab अंतर्गत उपलब्ध आहेत.यापुढेही “My English Book Grade One (R2) साठीच्या उर्वरित तासिकांचे व्हिडिओज निर्मिती करून दरम्यानच्या कालावधीत उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे.

सदर साहित्याचा महत्तम वापर अध्ययन-अध्यापनात करणेबाबत इयत्ता पहिलीला इंग्रजी भाषा शिकविणाऱ्या शिक्षकांना आपले स्तरावरून सूचित करावे.

सदर साहित्याची लिंक खालीलप्रमाणे,

https://bit.ly/3SUnR5c

-(राहूल रेखावार, भा.प्र.से)
          संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

State Council of Educational Research and Training, Maharashtra, Pune

Annual Academic Calendar-2025-26

Subject: My English Book: Grade – One (R-2) For Non-English Mesdium

Balbharti Grade One (R1)

https://drive.google.com/drive/folders/1F8-_moMEVKoQycjeTffT6VG2PK9CYc8x

प्रति,
१) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व)
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) (सर्व)
३) शिक्षणनिरीक्षक, मुंबई (पश्चिम, उत्तर व दक्षिण)

Leave a Comment

error: Content is protected !!