Duties And Responsibilities Of Disciplinary Matters Presentation Officers General Instructions
Duties And Responsibilities Of Disciplinary Matters Presentation Officers General Instructions
Disciplinary Matters Before the Enquiry Authority Duties and Responsibilities of the Presenting Officers – General Instructions
शिस्तभंग विषयक प्रकरण चौकशी प्राधिकरणासमोर
सादरकर्ता अधिकाऱ्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या – सर्वसाधारण सुचना
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्रमांक- वशिअ १३२५/प्र.क्र.४५/विचौ-१
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक- २५ एप्रिल, २०२५
संदर्भ :-१) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-वशिअ-१२१४/प्र.क्र. २२/११. दि.२२.०८.२०१४
२) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-संकीर्ण-२०२४/प्र.क्र.५७/विचौ-२, दि.०६.११.२०२४
परिपत्रक
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ८ (५) (ब) आणि नियम ८ (५) (क) मधील तरतुदींनुसार ज्या विभागीय चौकशीच्या प्रकरणात, दोषारोप सिध्द करण्यासाठी चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येते, त्या प्रकरणात शिस्तभंगविषयक प्राधिकरणाच्या वतीने चौकशी प्राधिकरणासमोर प्रकरण सादर करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्याची वा विधी व्यवसायीची सादरकर्ता अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाते. सादरकर्ता अधिकारी हे सेवारत अधिकारी असून त्यांची नियुक्ती पदनामाने करण्यात येते. सादरकर्ता अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आल्यावर संबंधित अधिकाऱ्याने करावयाच्या कामांच्या अनुषंगाने तपशीलवार मार्गदर्शक सूचना संदर्भ क्र.१ येथील सामान्य प्रशासन विभागाच्या दि.२२.०८.२०१४ च्या परिपत्रकान्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत. तसेच विभागीय चौकशीची प्रकरणे चौकशी अधिकाऱ्यांकडे पाठविण्याबाबत, चौकशी अधिकारी यांच्या नियुक्ती आदेशाचा नमुना तसेच सोबत पाठवावयाच्या कागदपत्रांची तपासणीसूची याबाबतच्या सूचना संदर्भ क्र.२ येथील सामान्य प्रशासन विभागाच्या दि.०६.११.२०२४ च्या परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत. (सोबत प्रत संलग्न)
२. सादरकर्ता अधिकारी हा चौकशी प्रक्रियेतील महत्वाचा तसेच जबाबदार घटक असून, चौकशी अधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या प्रत्येक सुनावणीस सादरकर्ता अधिकारी यांनी हजर राहून प्रकरणातील तथ्य शोधण्याकामी चौकशी अधिकारी यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. वरीलप्रमाणे सविस्तर सूचना देण्यात येऊनही, बहुतांश प्रकरणातील सादरकर्ता अधिकारी सुनावण्यांच्या वेळी गैरहजर राहत असून, चौकशी प्राधिकरणास आवश्यक ते सहकार्य करीत नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे विहीत कालावधीत चौकशीची कार्यवाही पूर्ण करणे चौकशी अधिकाऱ्यांना शक्य होत नाही. परिणामी चौकशीची प्रकरणे प्रदिर्घ काळ प्रलंबित रहात आहेत. प्रकरणांतील अपचारी सेवानिवृत्त होत असून, न्यायालयीन प्रकरणे उदभवत आहेत. चौकशी प्रकरणातील सादरकर्ता अधिकारी उचित सहकार्य करीत नसल्याने दोषारोप सिध्दतेच्या प्रमाणात घट होत आहे. या पार्श्वभूमीवर, सादरकर्ता अधिकाऱ्यांच्या नियुक्ती आदेशाचा नमुना या परिपत्रकासोबतच्या विवरणपत्र-१ मध्ये तसेच सादरकर्ता अधिकाऱ्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या याबाबतच्या सर्वसाधारण सुचना विवरणपत्र-२ मध्ये देण्यात येत आहेत.
३. सर्व शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्यांना कळविण्यात येते की, सदर सूचना, त्यांच्याकडील विभागीय चौकशीच्या प्रकरणांत नियुक्त सर्व सादरकर्ता अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणाव्यात. तसेच नविन प्रकरणात नियुक्त होणाऱ्या सादरकर्ता अधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या आदेशांत या परिपत्रकासोबतच्या सूचना जोडून त्यांचे दक्षतेने अनुपालन करण्याबाबत कळवावे.
शासन परिपत्रक क्रमांकः वशिअ १३२५/प्र.क्र.४५/विचौ-१
४. सदर परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या सूचनांनुसार, सादरकर्ता अधिकारी चौकशी कामात सहकार्य करीत नसल्याबाबतचा अहवाल चौकशी अधिकाऱ्याने शिस्तभंगविषयक प्राधिकरणास सादर केल्यास, प्रकरणातील विलंबाची जबाबदारी निश्चित करुन, संबंधित सादरकर्ता अधिकाऱ्यांविरुध्द शिस्तभंगविषयक कार्यवाही सक्षम प्राधिकाऱ्याच्या स्तरावर प्रस्तावित करावी.
हे परिपत्रक शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०४२५१६३५२५०८०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
(सुचिता महाडिक)
सोबत-१) विवरणपत्र क्र.१ व २
सह सचिव, सामान्य प्रशासन विभाग
Disciplinary Matters Duties and Responsibilities of Presenting Officers – General Instructions
breach of discipline