Duties And Powers Of Deputy Vice Principal HM
Duties And Powers Of Deputy Vice Principal HM
Duties And Powers Of Post Of Deputy Vice Principal HM
Upmumukhyadhyapak Upprachary Pad Kartvye v adhikar
Duties and powers of the post of Deputy Vice Principal HM
The duties and powers of the post of Deputy Principal/Vice Principal are as follows:
परिशिष्ट “अ”
उपमुख्याध्यापक/उपप्राचार्य या पदाची कर्तव्ये व अधिकार खालीलप्रमाणे
राहतील :-
कर्तव्ये व अधिकार:-
[अ] शैक्षणिक कर्तव्य :-
१] उच्च माध्यमिक स्तरावरील सर्व विद्याथ्याचे शिक्षण सक्षपतेने व प्रभावीपणे होण्या-साठी प्रयत्न करणे व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणाचा दर्जा राखण्यास मदत करणे.
२] उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयीन शिखकांच्या अध्यापनाचे निरोक्षण करणे व निरीक्षण नोंदवही व अन्य अभिलेखे ठेवणे व शिक्षकांच्या दैनिक टाचणांची नियत-कालिक तपासणी करणे.
३] शासनाने तथा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेसाठी नियुक्त केले गेल्यास परिक्षा-चालक किंवा परीक्षा उपसंचालक किंवा पर्यवेक्षक किंवा परीक्षक व नियामक म्हणून कामे पहाणे आणि संबधित परीक्षेसाठी विहित केलेल्या नियमानुसार कार्य व शिस्त पालन करणे, सोपविलेले परीक्षापूर्व व परोक्षोत्तर सर्व प्रकारचे कामकाज पाहणे.