Distribution of Class 10th & 12th Exam Mark Sheet Migration Certificate to Schools & Students
Distribution of Class 10th And 12th Exam Mark Sheet Migration Certificate to Schools And Students
क्र.रा.मं./परीक्षा-२/2200
पुणे
दिनांक-०४/०६/२०२४
प्रति,
विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, सर्व विभागीय मंडळे
विषय :- मार्च २०२४ मध्ये झालेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेच्या गुणपत्रिका व इतर साहित्य वाटपाबाबत…
उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, मार्च २०२४ मध्ये झालेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेच्या गुणपत्रिका व तपशिलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळांनी सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना मंगळवार दिनांक ११/०६/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता करावयाचे असून माध्यमिक शाळांनी त्याच दिवशी दुपारी ३.०० वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करावयाचे आहे. त्यानुसार विभागीय मंडळ स्तरावर नियोजन करावे.
सदर बाब विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व संबंधित माध्यमिक शाळांना आपल्या स्तरावरुन कळविण्यात यावी व त्याची प्रत या कार्यालयास पाठविण्यात यावी.
(अनुराधा ओक)
सचिव, राज्य मंडळ,
पुणे
प्रत माहितीसाठी व कार्यवाहीसाठी –
व्यवस्थापक,
गणकयंत्र विभाग, राज्यमंडळ,
पुणे
Distribution of Class 10th And 12th Exam Mark Sheet Migration Certificate to Schools And Students
Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, Pune
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,
पुणे
क्र.रा.मं./परीक्षा-२/2028 पुणे – ४११००४
दिनांक-२७/०५/२०२४
प्रति,
विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, सर्व विभागीय मंडळे
विषय :- फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या गुणपत्रिका, स्थलांतर प्रमाणपत्र व इतर साहित्य वाटपाबाबत…
Distribution of Higher Secondary Certificate (Class 12th) exam mark sheet, migration certificate and other materials
उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता १२ वी) परीक्षेच्या गुणपत्रिका, स्थलांतर प्रमाणपत्र व तपशिलवार गुण दर्शविणारे कनिष्ठ महाविद्यालयीन अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळांनी उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांन सोमवार दिनांक ०३/०६/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता करावयाचे असून उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याच दिवशी दुपारी ३.०० वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे व स्थलांतर प्रमाणपत्रांचे वाटप करावयाचे आहे. त्यानुसार विभागीय मंडळ स्तरावर नियोजन करावे.
🙋♂️👇
हेही वाचाल
उत्तरपत्रिका गुणपडतळणी VERIFICATION OF MARKS
उत्तरपत्रिका छायाप्रत PHOTOCOPY OF ANSWER BOOK
उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन REVALUATION OF ANSWER BOOK
स्थलांतर प्रमाणपत्र MIGRATION CERTIFICATE
सविस्तर माहितीसाठी व लिंक साठी फक्त या ओळीला स्पर्श करा
सदर बाब आपल्या विभागीय मंडळ कार्यकक्षेतील संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ नहाविद्यालयांना आपल्या स्तरावरुन कळविण्यात यावी व त्याची प्रत या कार्यालयास पाठविण्यात यावी.
(अनुराधा ओक)
सत्चित, राज्य मंडळ, पुणे-०४
प्रत माहितीसाठी व कार्यवाहीसाठी
व्यवस्थापक,
गणकयंत्र विभाग, राज्यमंडळ, पुणे