Disbursement of Funds under Local Development Programme to MLA

Disbursement of Funds under Local Development Programme to MLA

Disbursement of Funds under Local Development Programme to MLA

IMG 20250115 223146
Disbursement of Funds under Local Development Programme to MLA

Disbursement of Funds under Local Development Programme to MLA Assembly Members

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी लेखाशीर्ष ४५१५ ००१२ अंतर्गत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीचे विधानसभा सदस्यांना निधी वितरण.

महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग
शासन निर्णय क्रमांक- स्थाविका-०६२४/प्र.क्र. १००/का-१४८२,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक १५ ऑक्टोबर, २०२४

वाचा

:- १) नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. स्थाविका-०६१६/प्र.क्र.९६/का.१४८२,दि. १२/०७/२०१६.

२) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. अर्थसं २०२४/प्र.क्र.३४/अर्थ-३, दि. १८/०७/२०२४.

३) नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. स्थाविका-०६२४/प्र.क्र.१००/का.१४८२,दि.०९/०७/२०२४

४) नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. स्थाविका-०६२४/प्र.क्र.१००/का.१४८२, दि.०६/०९/२०२४

५) नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. स्थाविका-०६२४/प्र.क्र.१००/का.१४८२.दि.२८/०९/२०२४

      शासन निर्णय 

“महाराष्ट्र विनियोजन विधेयक, २०२४” मंजूर झाले असून ते महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या अधिसंमतीनुसार महाराष्ट्र अधिनियम क्र. २७ म्हणून, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग-४, दिनांक १८ जुलै, २०२४ यामध्ये प्रसिध्द करण्यात आले आहे. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता रु.२२००.०० कोटी एवढी तरतूद करण्यात आली आहे. सदर तरतूदीपैकी संदर्भाधीन क्र.२ येथील परिपत्रकान्वये वित्त विभागाने या कार्यक्रमांतर्गत निधी वितरित करण्याचे अधिकार प्रशासकीय विभागास प्रदान केलेले आहेत. वित्त विभागाने सन २०२४-२५ मधील अर्थसंकल्पीत निधीपैकी रु. ११४६.०० कोटी एवढा निधी बीम्स प्रणालीवर उपलब्ध करुन दिलेला आहे. त्यापैकी संदर्भाधीन क्र. ३.४ व ५ येथील शासन निर्णयान्वये अनुज्ञेय निधीचे वितरण सर्व जिल्ह्यांना करण्यात आले आहे. आता, आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत विधानसभेच्या २७२ सदस्यांना प्रति सदस्य रु.४०.०० लक्ष (अक्षरी रु. ४०.०० लक्ष) याप्रमाणे एकूण रु. १०८.८० कोटी (अक्षरी रु. एकशे आठ कोटी ऐशी लक्ष) एवढा निधी सोबतच्या सहपत्रात दर्शविल्याप्रमाणे वितरीत करण्यात येत असून सदर निधी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत आहे.

IMG 20250115 223207
Disbursement of Funds under Local Development Programme to MLA

२. जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती यांनी नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. स्थाविका-०६१६/प्र.क्र.९६/ का.१४८२, दिनांक १२ जुलै, २०१६ च्या तरतुदींच्या अधीन राहून या निधीचे पुढील वितरण तात्काळ करावे. तसेच या निधीमधून आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत वेळोवळी अनुज्ञेय करण्यात आलेल्या बाबींवरील खर्च पुढील लेखाशीर्षांतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध तरतूदीमधून भागविण्यात यावा.

मागणी क्र. ओ – १०

४५१५- इतर ग्राम विकास कार्यक्रमावरील भांडवली खर्च,

(००) १०२ सामुहिक विकास

(०१) (००) (०१) आमदार स्थानिक विकास कार्यक्रम (४५१५००१२)

(योजनांतर्गत) (दत्तमत)

५३ – मोठी बांधकामे

वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्र. २ येथील शासन परिपत्रक क्र. अर्थसं २०२४ /

३. प्र.क्र. ३४/ अर्थ ३, दि. १८ जुलै, २०२४ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारितेत

हा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

४. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर हा शासन निर्णय उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१०१५१५०४२६६२१६ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

(नि.भा. खेडकर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

IMG 20250115 223231
Disbursement of Funds under Local Development Programme to MLA

Leave a Comment

error: Content is protected !!