Creating Employees Master Database शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकोष माहितीकोष

Creating Employees Master Database

IMG 20250305 145729
Creating Employees Master Database

Creating Employees Master Database

Regarding creating an encyclopedic database of government employees.

शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकोष माहितीकोष तयार करणेबाबत.

Employees Master Database (EMDb)

दिनांक ०५ मार्च, २०२५

वाचावे-शासन परिपत्रक, नियोजन विभाग, क्रमांक- असांस-१३२४/प्र.क्र. ९३/का.१४१७,

दिनांक १९ ऑगष्ट, २०२४.

    शासन परिपत्रक :

उपरोक्त संदर्भीय परिपत्रकानुसार महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष अद्ययावत करण्याची कार्यवाही अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांची दिनांक १ जुलै, २०२४ या संदर्भ दिनांकाची माहिती अद्ययावत करावयाची आहे. यासाठी माहिती अद्ययावत झाल्याबाबतचे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा सांख्यिकी कार्यालय / प्रादेशिक कार्यालय यांनी दिलेले प्रमाणपत्र माहे फेब्रुवारी, २०२५ च्या वेतन देयकासोबत जोडलेले नसल्यास अशा कार्यालयांची वेतन देयके अधिदान व लेखा कार्यालयाने / कोषागाराने पारित न करणेबाबत संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या आहेत.

२. तथापि, काही तांत्रिक कारणांमुळे सद्यस्थितीत कर्मचारी सर्वंकष माहितीकोष २०२४ (EMDЬ -२०२४) साठीचे संकेतस्थळ कार्यान्वीत नाही. त्यामुळे ज्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना कर्मचारी सर्वंकष माहितीकोष २०२४ (EMDb-२०२४) मधील माहिती अद्ययावत केल्याबाबतचे दुसरे प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे शक्य झालेले नाही, अशा कार्यालयांची माहे फेब्रुवारी, २०२५ ची वेतन देयके अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा सांख्यिकी कार्यालय/प्रादेशिक कार्यालयाच्या प्रमाणपत्राशिवाय कोषागार अधिदान व लेखा कार्यालयात सादर करावीत आणि संबंधित कोषागार अधिदान व लेखा कार्यालयांनी अशी वेतन देयके पारित करावीत.

३. तसेच सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी पहिले व दुसरे प्रमाणपत्र प्राप्त करुन माहे मे २०२५ (देय जून २०२५) च्या वेतन देयकांसोबत सादर करावे. माहे मे २०२५ च्या वेतन देयकासोबत दुसरे प्रमाणपत्र जोडले नसल्यास अशी वेतन देयके कोषागार अधिदान व लेखा कार्यालयांनी स्वीकारू व पारित करु नयेत.

४. अधिदान व लेखा अधिकारी तसेच कोषागारे / उप कोषागारे अधिकारी यांनी वरील सूचना तातडीने सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणाव्यात.

५. सदर परिपत्रक वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ७५/२०२५/कोप्र ५, दिनांक २५ फेब्रुवारी, २०२५ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करणार आले असून त्याचा संकेतांक २०२५०३०५१२०१४५१११६ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशांनुसार व नावाने,

Circular PDF Copy Link

सह सचिव, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग
शासन परिपत्रक, नियोजन विभाग क्रमांक असांसं १३२४/प्र.क्र. ९३/का.१४१७,

Leave a Comment

error: Content is protected !!