विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे तसेच तातडीच्या प्रसंगी त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन तात्काळ मिळणे यांकरीता उपाययोजना करण्याकरीता समिती गठीत Counseling Students guidance In Emergency Situations

Counseling Students guidance In Emergency Situations

Counseling Students guidance In Emergency Situations

Regarding the formation of a committee to take measures to counsel students and ensure that they receive the necessary guidance immediately in case of emergency.

विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे तसेच तातडीच्या प्रसंगी त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन तात्काळ मिळणे यांकरीता उपाययोजना करण्याकरीता समिती गठीत करणेबाबत.


महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः संकिर्ण-२०२५/प्र.क्र.१४७/एसएम-३ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२

दिनांक :- ४ डिसेंबर, २०२५

संदर्भ :- श्री. सुखदेब सहा यांनी मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे आंध्रप्रदेश सरकार विरोधात दाखल केलेली अपिल याचिका प्रकरणी मा. न्यायालयाचे दि.२५.०७.२०२५ रोजीचे आदेश

प्रस्तावना :-
श्री. सुखदेब सहा यांनी मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे आंध्रप्रदेश सरकार विरोधात दाखल केलेली अपिल याचिका प्रकरणी दि.२५.०७.२०२५ आदेशान्वये मा. न्यायालयाने देशातील विद्यार्थ्यांवरील ताणतणाव कमी करण्याच्या अनुषंगाने विस्तृत सूचना निर्गमित केलेल्या आहेत. सदर सूचनांच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल (Action Taken Report) मा. न्यायालयास सादर करावयाचा आहे. त्यानुषंगाने, मा. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्याकरीता मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, दि.३०.१०.२०२५ रोजी मंत्रालय, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये मा. न्यायालयाच्या संदर्भाधीन आदेशान्वये देण्यात आलेल्या सर्व सूचनांवर चर्चा करण्यात आली. बैठकीअंती झालेल्या चर्चेनुसार संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून सदर समितीमार्फत पुढील रूपरेशा निश्चित करण्याबाबत सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करण्याबाबतच्या सूचना प्रधान सचिव (शालेय शिक्षण) यांनी दिल्या आहेत. त्यानुसार समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-
श्री. सुखदेब सहा यांनी मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे आंध्रप्रदेश सरकार विरोधात दाखल केलेली अपिल याचिका प्रकरणी दि.२५.०७.२०२५ आदेशान्वये मा. सर्वोच्च न्यायालयाने देशातील विद्यार्थ्यांवरील ताणतणाव कमी करण्याच्या अनुषंगाने पारित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्याकरीता उपाययोजना सुचविण्यासाठी पुढील प्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे.

Counseling Students guidance In Emergency Situations
Counseling Students guidance In Emergency Situations विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे तसेच तातडीच्या प्रसंगी त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन तात्काळ मिळणे यांकरीता उपाययोजना करण्याकरीता समिती गठीत करणेबाबत

२.उपरोक्त प्रमाणे गठीत केलेल्या समितीची कार्यकक्षा पुढील प्रमाणे राहील.

a. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये मानसोपचारतज्ञ यांची नियुक्ती करण्यासंदर्भात जिल्हा रूग्णालयातील क्लिनिकल सायकोलॉजिस्ट (Clinical Psychologist) यांची मदत घेऊन विद्यार्थ्यांचे सामुपदेशन करण्याकरीता ऑनलाईन मॉड्युल तयार करणे.
b. डॉ. हरीश शेट्टी, मानसोपचार तज्ञ यांनी सुचित केल्यानुसार विद्यार्थ्यांना / पालकांना ताणतणावापासून मुक्त ठेवण्याकरीता त्यांना प्रशिक्षण देण्याच्या हेतूने आवश्यक माहिती/डेटा (Content) निश्चित करणे, सदर माहितीच्या आधारे प्रशिक्षणाकरीता व्हिडीओ तयार करणे संदर्भात अधिकाधिक तत्परतेने कसे काम करता येईल या हेतूने राज्यामध्ये कार्यरत मानशास्त्रीय संघटनांची मदत घेऊन पुढील कामकाजाची रूपरेशा निश्चित करणे.
c. विद्यार्थ्यांची ताणतणावापासून मुक्तता होण्याकरीता अल्पकालीन, मध्यमकालीन व दिर्घकालीन लक्ष्य निश्चित करणे व प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आवश्यक ते मार्गदर्शन पोहोचविण्याकरीता मार्ग निश्चित करणे.
d. राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याशी संबंधीत प्रशिक्षण देण्याकरीता “अविरत शिक्षण” चे चार टप्प्यांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. या शिक्षकांच्या मदतीने तसेच मानशात्रीय संघटना / क्लिनिकल सायकोलॉजिस्ट यांच्या मदतीने मानसशास्त्रीयदृष्ट्या ताणतणाव असलेले विद्यार्थी ओळखण्याकरीता शिक्षकांचे प्रशिक्षण निश्चित करणे व त्यांना तातडीने समुपदेशन / मार्गदर्शन देण्याची व्यवस्था करणे. ऑनलाईन कोर्सेस / व्हीडीओच्या माध्यमातून शिक्षकांना प्रशिक्षित करणे या बाबतचे नियोजन आखणे.
e. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत व्यवसाय मार्गदर्शन पदविका धारण केलेले एकुण ३५० समुपदेशक कार्यरत आहेत. सदर समुपदेशक हे विविध माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत व त्यांच्या समुपदेशन सेवा राज्यातील इ. ९ वी ते १२ वी च्या विद्याथ्यांना उपलब्ध करून देण्यात येतात. सदर समुपदेशक हे इ. १० वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षा पूर्व, परीक्षा कालावधीत व परीक्षेनंतर तसेच निकालानंतर मार्गदर्शन व समुपदेशन करत आहेत. सदर शिक्षकांच्या अनुभवाचा कायमस्वरूपी उपयोग कशा प्रकारे करता येणे शक्य आहे याची पडताळणी करणे.
f. राज्य पाठ्यपुस्तकांमध्ये हेल्पलाईन नंबरचा समावेश करणे. तसेच राज्यशासनाचा हेल्पलाईन नंबर तयार करून त्याचा देखील समावेश पाठ्यपुस्तकांमध्ये करणे.
g. राज्यशासनांतर्गत कार्यरत शिक्षक यांनी मानसोपचार विषयाचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी त्यांना प्रेरित करण्यासाठी त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी/ आगाऊ वेतनवाढ लागू करण्यासंदर्भात पडताळणी करणे.
h. मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या संदर्भाधीन आदेशान्वये देण्यात आलेल्या सूचनांनुसार आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भातील सविस्तर अहवाल शासन निर्णयार्थ सादर करणे.

३. सदर समितीने त्यांचा अहवाल शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत शासनास सादर करावा.

४. सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२५१२०४१२१७४८८१२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

उप सचिव, महाराष्ट्र शासन

Counseling Students guidance In Emergency Situations विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे तसेच तातडीच्या प्रसंगी त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन तात्काळ मिळणे यांकरीता उपाययोजना करण्याकरीता समिती गठीत करणेबाबत
Counseling Students guidance In Emergency Situations विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे तसेच तातडीच्या प्रसंगी त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन तात्काळ मिळणे यांकरीता उपाययोजना करण्याकरीता समिती गठीत करणेबाबत

Leave a Comment

error: Content is protected !!