Coordination of sanctioned posts in the service system सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेण्याच्या अनुषंगाने आहरण व संवितरण अधिकारी तसेच प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाही शासन निर्णय

Coordination of sanctioned posts in the service system

Coordination of sanctioned posts in the service system

सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेण्याच्या अनुषंगाने आहरण व संवितरण अधिकारी तसेच प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाही बाबत…

दिनांकः ६ ऑगस्ट, २०२५.

वाचा:

१. महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, शासन निर्णय, क्रमांक संकीर्ण १००७/प्र.क्र.११२/भाग ४/कोषा प्रशा.५, दि.२६.११.२०१२.

२. महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक संकिर्ण-२०२२/प्र.क्र.२९/कोषा प्रशा-४, दि.६.४.२०२५.

प्रस्तावना :

अ) नवीन सेवार्थ प्रणाली विकसन करताना Data Porting बाबत कार्यवाही करण्यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना सध्या कार्यान्वित असलेल्या सेवार्थ प्रणालीत असलेली माहिती अद्ययावत करण्यासाठी वाचा-२ येथील परिपत्रकान्वये प्रणालीतील माहिती अद्ययावत करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे.

आ) नवीन सेवार्थ प्रणालीत पुढील टप्प्यातील Data Porting कार्यवाही करण्यासाठी, सध्या कार्यान्वित असलेल्या सेवार्थ प्रणालीतील सद्यस्थितीतील पदांची संख्या व पदनामे, आढाव्यानुसार तसेच नजीकच्या सुधारीत शासन निर्णयानुसार असल्याबाबत खात्री करणे आवश्यक आहे.

इ) उपरोक्त कार्यवाही राज्य शासनाच्या १५० दिवसाच्या कृति आराखडा निश्चित करण्यात आल्याप्रमाणे प्रस्तावित करण्यात येत आहे. तसेच सध्या सेवार्थ प्रणालीचे इंटिग्रेशन सामान्य प्रशासन विभागामार्फत प्रस्तावित करण्यात आलेल्या ई-एचआरएमएस (e-HRMS) प्रणालीसोबत करण्यात आले आहे. त्यामुळे सेवार्थ प्रणालीची माहिती अत्यंत अचूकपणे संकलित ठेवण्यास उपरोक्त कार्यवाहीमुळे मदत होणार आहे.

ई) तसेच शासनाच्या अर्थसंकल्पीय, पावसाळी तसेच हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य शासनाकडे असलेली मंजूर पदे, रिक्त पदे व भरलेली पदे याबाबत विधानसभा/विधानपरिषद सदस्यांकडून माहितीची विचारणा करण्यात येत असते. उपरोक्त कार्यवाहीमुळे अचूक माहिती सदनास देणे शक्य होणार आहे. त्यामुळे सेवार्थ प्रणालीतील मंजूर पदांचा ताळमेळ घेण्याच्या अनुषंगाने सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच सर्व प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना प्रसृत करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

        शासन परिपत्रक :

उक्त प्रस्तावनेस अनुसरुन, सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच सर्व प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
१) आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी करावयाची कार्यवाहीः
१.१) आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयासंदर्भात मंजूर आकृतीबंधानुसार सेवार्थ प्रणालीवर भरलेल्या Asst login येथील Entry of Posts या टेंब मधील एकूण मंजूर (स्थायी/अस्थायी) पदांची संख्या तपासावी. त्याचप्रमाणे सेवार्थ प्रणालीत भरलेली कर्मचाऱ्यांची संख्या, पदे व वेतनपटाद्वारे वेतन आहरीत करणाऱ्या कर्मचाऱ्याऱ्यांच्या संख्येबाबत व पदांबाबत ताळमेळ घेण्यात यावा. सदर ताळमेळात आढळलेले कर्मचारी तसेब पदे सेवार्थ प्रणालीवर आहेत, परंतु वेतनपटावर नाहीत असे कर्मचारी, पदे पुढील पैकी कोणत्या प्रकारात मोडतात याची शहानिशा करण्यात यावी,
अ) नियत वयोमान सेवानिवृत्त / स्वेच्छा सेवानिवृत्त / मृत/सेवेतून काढण्यात आलेले / राजीनामा दिलेले अधिकारी/कर्मचारी,
आ) प्रतिनियुक्तीवर गेलेले अधिकारी/कर्मचारी,
बदली झालेले परंतु सेवार्थ प्रणालीतून Detach केलेले नाहीत असे अधिकारी/कर्मचारी,
बदलून आलेले परंतु सेवार्थ प्रणालीत Attach केलेले नाहीत असे अधिकारी/कर्मचारी,
छ) पद रिक्त असल्याकारणाने,
क) तसेच यापूर्वी ज्यांचे वेतन ०१ वेतन या उद्दिष्टाअंतर्गत आहरीत करण्यात येत होते परंतु आता त्यांचे पारिश्रामिक १० कंत्राटी सेवा या उद्दिष्टाअंतर्गत करण्यात येते अशी पदे नष्ट (Delete) करण्यात यावीत.
१.२) वरील प्रकारामुळे उद्भवलेली तफावत दूर करुन वेतन पटावरील कर्मचारी संख्या व प्रणालीतील संख्या निक्षित कराची असे करताना पुढील कार्यवाही करावी.

  1. नियत वयोमान सेवानिवृत्त / स्वेच्छा सेवानिवृत्त / मृत / सेवेतून काढण्यात आलेले कर्मचारी हे Deactivate करावे (End of Service Asst. Login) प्रतिनियुक्तीवर गेलेले, अन्य कार्यालयात बदली झालेले परंतु सेवार्थ प्रणालीतून Detach केले नाही अशा कर्मचाऱ्यांना Detach करावे. (Relieving of Employee, If relieved on Deputation then entered Deputation office details, Or if relieve but No office allotted then Detach with Entering Own office DDO Code).

॥. बदलून आलेले परंतु सेवार्थ प्रणालीत attach केले नाही, असे कर्मचारी attach करावे. (Joining of Employee) त्यानंतर जे उर्वरित आहेत त्यापैकी रिक्त पदांची संख्या निश्चित करावी.
२) प्रशासकीय विभागांनी करावयाची कार्यवाहीः
२.११ आहरण व संवितरण अधिकान्यांनी उपरोक्त परिच्छेदामध्ये नमूद केलेली कार्यवाही पूर्ण केल्यानंतर प्रशासकीय विभागांनी त्यांना देण्यात आलेल्या विशिष्ट लॉगीननुसार स्थायी / अस्थायी पदांची संख्या आकृतीबंध पदांच्या शासन निर्णयानुसार निश्चित करावी (लाकृतीबंधानुसार कमी पदे भरलेली असल्यास परिपूर्णपणे भरण्यात मावीत तसेच आकृतीबंधापेक्षा जास्त पदे भरल्याचे निदर्शनास आल्यास जास्तीची पदे देण्यात आलेल्या विशिष्ट लॉगीन मधून नष्ट (Delete) करण्यात बावीत.
२.शु उपरोक्त वाचा-१ वैबील वित्त विमान, शासन निर्णयान्वये, सेवार्थ प्रणालीत मंजूर पदांची
माहिती भरण्याचे अधिकार केवळ प्रशासकीय विभागांच्या सचिवांना राहील, तसेच सदर अधिकार सचिव त्यांच्या प्रशासकीय विभागातील उपसचिव किंवा त्यावरील दर्जाच्या कोणत्याही अधिका-याला प्रत्यार्पित करु शकतील, असे निर्देश देण्यात आलेले आहेत. प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रिय विभागानुसार आहरण व संवितरण अधिका-यांच्या कार्यालयाकरीता सेवार्थ प्रणालीमध्ये शासन निर्णयानुसार मंजूर असलेली पदे भरण्याबाबतची कार्यपध्दती विषद करण्यात आलेली आहे. सदर मंजूर पदांची माहिती भरण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांना क्षेत्रिय विभागानुसार विशिष्ट लॉगीन तयार करुन देण्यात आलेले आहे.
२.३० प्रशासकीय विभागास क्षेत्रिय विभागनिहाय देण्यात आलेल्या विशिष्ट लॉगीनमध्ये व्यांध्या अधिनस्त असलेल्या सर्व क्षेत्रिय विभागनिहाय, कोषागारनिहाय तसेब आहरण व संवितरण अधिकारी निहाय मंजूर पदांची माहिती उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
२.४) सदर भाहिती पुढीलप्रमाणे प्राप्त होऊ शकेल. मुख्य पानावरील Reports-Sanctioned Post Reports या टेबवर शिलक करावे, व्यानंतर Caick on Department Select Department Selct Field Department-Select Financial YearClick on Generate Report → Repod जनरेट झाल्यानंतर Name of the Field Department Vया अंतर्गत दर्शविलेल्या नावावर [Hyperlink वर क्लिक करावे, त्यानंतर त्या विभागाच्या अधिनस्त असलेल्या कोषागार कार्यालयांची नाये उपलब्ध होतील. प्रत्येक कोषागाराच्या नावावर लिंक केल्यास त्या कोषागाराच्या अधिनस्त असलेल्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची नावे आहरण व संवितरण अधिकारी क्रमांकानुसार प्राप्त होतील, अशा प्रकारे प्रत्येक आहरण व संवितरण अधिकान्यांच्या कार्यालयात नोंद केलेल्या मंजूर, मरलेल्या तसेच रिका पदांची माहिती उपलब्ध होईल.
२.५० सदर माहितीनुसार प्रशासकीय विभागाने कार्यवाही प्रस्तावित करावी व आढाव्यानुसार पदे संबंधितआहरण व संवितरण अधिकाऱ्याच्या लॉगीनमध्ये उपलब्ध आहेत अथवा नाही, याची खात्री करावी.
२.६) तसेच असेही निदर्शनास आले आहे की, बऱ्याच प्रशासकीय विभागाच्या अधिनस्त असलेले आहरण व संवितरण अधिकारी चुकीने दुसऱ्याच प्रशासकीय विभागांच्या अधिनस्त अथवा त्याच प्रशासकीय विभागाच्या इतर क्षेत्रिय कार्यालयामध्ये सेवार्थ प्रणालीत नोंद झालेले आहेत,
२. सर्व प्रशासकीय विभागाना क्षेत्रिय विभागानुसार (Field Department विशिष्ट लॉगीन देण्यात आलेले आहे त्या लॉगीनमधून Reports Sanctioned Post Reports या टेबवर क्लिक करावे, त्यानंतर Cick on Department Select Department-Selct Field Department Select Financial Year Click on Generate Report Report जनरेट झाल्यानंतर Name of the Field Department या अंतर्गत दर्शविलेल्या नावावर (Hyperin) क्लिक करावे, त्यानंतर त्या विभागाच्या अधिनस्त असलेल्या कोषागार कार्यालयांची नावे उपलब्ध होतील, प्रत्येक कोषागाराच्या नावावर क्लिक केल्यास त्या कोषागाराच्या अधिनस्त असलेल्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची नावे आहरण व संवितरण अधिकारी क्रमांकानुसार प्राप्त होतील.
२.८) सदर आहरण व संवितरण अधिकारी चुकीने संबंधित विभागाच्या अधिनस्त अथवा त्याव प्रशासकीय विभागाच्या इतर क्षेत्रिय कार्यालयामध्ये नौद झालेले असतील, तर सदर दुरुस्ती करण्यासाती संबंधित विभागांनी अचूक प्रशासकीय विभाग व क्षेत्रिय कार्यालयाच्या नावासह तसेच आहरण व संवितरण अधिकारी सांकेतांकासह माहिती संवालक, लेखा व कोषागारे मुंबई येथील सेवार्थ शाधीस दुरुस्तीकरीता पाठवावी.
२.९० प्रशासकीय विभागाने आढाव्यानुसार पदे संबंधित आहरण व संवितरण अधिका-यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध असल्याची खात्री केल्यानंतर खालीलप्रमाणे प्रमाणपत्र संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना स्वाक्षरी करून द्यावे व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सदर प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्यांकडूनच स्वाक्षरी करुन वेतन देयकास जोडून वेतन देयक कोषागारात सादर करण्यात यावे,

image 5
Coordination of sanctioned posts in the service system

२.१०) उपरोक्त कार्यवाही पूर्ण न झाल्यास संबंधित आहरण व संवितरण अधिका-यांची माहे सप्टेंबर २०२५ देय ऑक्टोबर २०२५ ची मासिक वेतन देयके अधिदान व लेखा कार्यालय, कोषागारात उपकोषागारात स्विकारण्यात येणार नाहीत..

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक क. २०२५०८०६१११७५१३५०५ असा आहे. है शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

शासनाचे उप सचिव

महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकिर्ण-२०२२/प्र.क्र.२९/कोषा प्रशा-४, मुंबई

Regarding the action to be taken by the Drawing and Disbursing Officers and Administrative Departments in connection with the reconciliation of approved posts in the Sevarth Pranali

Regarding the action to be taken by the Drawing and Disbursing Officers and Administrative Departments in connection with the reconciliation of approved posts in the service system

Leave a Comment

error: Content is protected !!