Compassionate appointments implemented in Municipal Councils Panchayats राज्यातील महानगरपालिका नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण लागू

Compassionate appointments implemented in Municipal Councils Panchayats

Compassionate appointments implemented in Municipal Councils Panchayats

Compassionate appointments implemented in Municipal Councils and Municipal Panchayats

Comprehensive revised policy for compassionate appointment of officers/employees in Municipal Councils and Municipal Panchayats implemented

Comprehensive revised policy for compassionate appointment to the heirs of officers/employees in Municipal Corporations (except Brihanmumbai Municipal Corporation)/Municipal Councils and Municipal Panchayats in the state has been implemented.

राज्यातील महानगरपालिका (बृहन्मुंबई मनपा वगळता) / नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण लागू करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग
शासन परिपत्रक क्र.एमसीओ-२०२५/प्र.क्र.४११/नवि-१४

मंत्रालय (मुख्य इमारत), ४ था मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मुंबई ४०० ०३२

दिनांक: २६ ऑगस्ट, २०२५.

संदर्भ :

१. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.अकंपा-१२१७/प्र.क्र.१०२/आठ, दि.२१.०९.२०१७.

२. नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. एमसीओ-२०२५/प्र.क्र. ११७/नवि-१४, दि.३०.०७.२०२४.

३. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.अकंपा-१२२५/प्र.क्र.१९४/म.लो.आ., दि.१७.०७.२०२५ व दि.२२.०८.२०२५.

प्रस्तावना:-

सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयास अनुसरुन संदर्भ क्र.२ येथील दि.३०.०७.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा नियुक्तीचे धोरण लागू करण्यात आले आहे. आता, अनुकंपा तत्वावर प्रत्यक्ष नियुक्ती देत असतांना विविध आदेश विचारात घ्यावे लागत असल्याने अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला सर्व आदेश एकत्रित स्वरुपात मिळावेत यास्तव सामान्य प्रशासन विभागाने अनुकंपा नियुक्ती धोरणाचे यापूर्वीचे सर्व आदेश अधिक्रमित करुन, संदर्भ क्र.३ येथील दि.१७.०७.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये “अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारीत धोरण” तयार केले आहे. सदर शासन निर्णयातील अ.क्र. (IX) (४) मध्ये सदर शासन निर्णय हा शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना लागू असून, निमशासकीय कार्यालये स्थानिक स्वराज्य संस्था/ शासनाच्या अधिपत्याखालील महामंडळे अथवा प्राधिकरण यामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना थेट लागू होत नाही. त्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अनुकंपा योजना लागू करण्याबाबत संबंधित प्रशासकीय विभागाने त्यांच्या स्तरावरुन स्वतंत्रपणे निर्णय घेणे आवश्यक राहील असे नमुद केले आहे.

राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील कर्मचारी हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी / कर्मचारी असून, राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी नाहीत. त्यामुळे, संदर्भ क्र.३ येथील दि.१७.०७.२०२५ येथील शासन निर्णय महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील कर्मचाऱ्यांना थेट लागू होत नाही. सबब, संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णय अधिक्रमीत करुन, दि.१७.०७.२०२५ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये अंशतः बदल करुन, सदर धोरण महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील अधिकारी / कर्मचाऱ्यांना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

   शासन आदेश

सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दि.१७.०७.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारीत धोरण शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना लागू करण्यात आले आहे. उक्त शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे बदल करुन, सदर शासन निर्णयातील उर्वरित सर्व तरतूदी जशा आहेत तशा सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील अधिकारी/ कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहेत.:-

अ.क्र.

दि.१७.०७.२०२५ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदी

महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील

IMG 20250826 215021
Compassionate appointments implemented in Municipal Councils Panchayats

Leave a Comment

error: Content is protected !!