Class 11th Online Admission Process 2025-26 Guidelines For Junior College Registration
Class 11th Online Admission Process 2025-26 Guidelines For Junior College Registration
Guidelines for Junior College Registration for Class 11th Online Admission Process 2025-26
Class 11th Online Admission Process Schedule
महाताष्ट्र शासन शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे
दि.०९/०५/२०२५
जा.क्र : शिसंमा/इ.११ वी औ.प्र.प/२०२५-२६/०2392 महत्वाचे/कालमर्यादित ई-मेलव्दारे
विषयः इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया बावबत संदर्भ: शासन निर्णय दिनांक २६/०२/२०२५ व दिनांक ०६/०५/२०२५
उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयाच्या अनुषंगाने इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यामध्ये राबविण्यात आहे. तरी शासन निर्णयाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आपल्या विभाग/जिल्हा मधील उच्च माध्यमिक शाळांची इयत्ता १० ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुलभतेने होण्यासाठी सोबतच्या सन २०२५-२६ प्रवेश प्रक्रिया कार्य सूचना तसेच कनिष्ठ महाविद्य प्रवेश प्रक्रिया नोंदणी करीता मार्गदर्शक सूचना संबंधितांच्या निदर्शनास आणून अंमलाबजावणी बाबत योग्य ती कार्यवाही करण यावी.
(मा.शिक्षण संचालक यांचे मान्यतेने)
शिक्षण उपसंचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
तथा सदस्य सचिव
इ.११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राज्यस्तर संनियंत्रण समिती
प्रवेश प्रक्रिया सन २०२५-२६ कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी करीता मार्गदर्शक तत्वे
१) तंत्रस्नेही शिक्षकांची/समग्र शिक्षामधील डीटीपी ऑपरेटर/एमआयएस को-ऑडिनेटर इत्यादीची या कामकाजा करीता विभागीय शिक्षण उपसंचालक/शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी नेमणूक करावी.
२) प्रत्येक तालुक्यात मार्गदर्शन केंद्राकरिता किमान २-३ कनिष्ठ महाविद्यालयांची निवड करताना त्या कमवि मध्ये सुसज्ज आयटी लॅब, तंत्रस्नेही शिक्षक यांची निवड करून त्या कमविच्या प्राचार्यावर संपूर्ण तालुक्यातील कर्मावची नोंदणी व विद्यालय मार्गदर्शन बाबतची जबाबदारी निश्चित करावी.
३) प्रत्येक माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक/कर्मचारी यांनी शाळेतील विद्याथ्यांना इयत्ता ११ वी प्रवेशबाबत नोंदणी मदत करण्यासाठी त्याच्या जिल्हास्तरावरुन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी सूचना निर्गमित करणे.
४) संचालनालयाने दिलेल्या कॉलेज नोंदणी प्रपत्रातील सर्व बाबी कनिष्ठ महाविद्यालयामधील प्राचार्य/कर्मचारी यांना समजावून सांगणे, तसेच कमविने तुकडी मान्यता, प्रवेशक्षमता, संच मान्यता, वाढीव प्रवेशक्षमता इत्यादी सर्व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी तयारी करावी.
५) कमविने यू-डायसकोड आणि प्राथमिक माहिती भरुन प्रत्येक प्राचायांनी आपल्या कमविची एक्सेल शीट तयार करुन ठेवली आहे.या शोटचा उपयोग संकेत स्थळावरील माहिती अद्यावत करताना उपयोग करता येईल.
६) सर्व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी त्यांच्या अधिनस्त जिल्हयातील सर्व कमविंचे प्राचार्य यांनी कमवि नोंदणी माहिती अचूक भरली असल्याची खात्री करण्यासाठी सदर विभाग स्तरावर तपासण्यासाठी आवश्यकतेनुसार सेवा द्यावी.
७) विद्यार्थ्यांचे वार्षिक शैक्षणिक शुल्क, तिमाही शैक्षणिक शुल्क, मासिक शैक्षणिक शुल्काबाबत माहिती अचूक तसेच शासन नियमानुसार असल्याची खातरजमा क्षेत्रिय अधिकारी यांनी करावी.
८) अशा प्रकारे कोणत्याही माध्यम, तुकडी, शाखा, प्रवेशक्षमता, वाढीव प्रवेश क्षमता इत्यादीची माहिती प्राचार्यानी भरल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या नुकसानीस व प्रशासकीय कारवाईस स्वतः जबाबदार असतील. याबाबत प्राचार्य/मुख्याध्यापकांना लेखी कळविणे,
९) राज्यातील सर्व इयत्ता ११ वी प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेव्दारे होणार असल्याने ज्या कमविने नोंदणी न केल्यास होणाऱ्या नुकसानीस व प्रशासकीय कारवाईस स्वतः व्यस्थापन व शाळा जबाबदार असेल ही बाब सर्वाच्या लक्ष्यात आणून द्यावी,
१०) वेळोवेळी संकेतस्थळावरील माहिती आवश्यकतेनुसार अद्यावत करण्यासाठी यासाठी प्रयत्न करणे. विहीत मुददीत काम पूर्ण होईल करीता नियमित अनुपालन घेत राहणे.
११) शासकीय/अनुदानित शाळा त्या प्रत्येक तालुक्यामधून मार्गदशन केंद्र म्हणून निवड करणे. (संपर्क क्रमांक, पत्ता) मुख्याध्यापक व जबाबदार कर्मचारी) नाव व पदनाम घोषित करणे.
१२) केंद्रिय प्रवेश प्रक्रियेबाबत सकारात्मक विचाराबाबतच्या बातम्या प्रसार माध्यामामध्ये प्रसारित करणे.
१३) नकारात्मक बातम्यांचे तात्काळ खंडन करण्याची व्यवस्था तयार ठेवणे,
१४) क्षेत्रस्तरावरील आवश्यकतेनुसार ११ वी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन कामकाजाचे वाटप करण्यात यावे.
१५) दिनांक २५/०२/२०२५ व दिनांक ०६/०५/२०२५ चे शासन निर्णय महत्वपूर्ण आहेत. याचे वाचन काळजीपूर्वक करावे.
१६) माहिती पुस्तिका सन २०२५-२६ चे वाचन काळजीपूर्वक करावे.
कार्यसूची
कार्य क्रमांक १.
इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कामकाज सुलभ होण्याकरीता कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक, उपप्राचार्य किंवा तांत्रिक व्यक्तींसाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी एक जिल्हा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करावा.
कार्य क्रमांक २.
राज्यस्तरीय कार्यालयातून प्राप्त संदेश काळजीपूर्वक वाचावेत आणि त्यानुसार कृती करा, जर काही प्रश्न असतील तर विभाग/राज्यस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. तथापि समाधान न झाल्यास त्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी स्तरावर संपर्क करावा.
कार्य क्रमांक ३.
प्रत्येक संदेश संबंधित अधिकाऱ्यांना / शाळा प्रतिनिधी / प्राचार्य यांना कळवा. कनिष्ठ महाविद्यालय/ पालक/विद्यार्थी / संबंधित अधिकाऱ्यांना.
कार्य क्रमांक ४
शिक्षणाधिकारी/उपशिक्षणाधिकारी/गटशिक्षणाधिकारी यांना सदरील संदेश पोहोचविणे.
कार्य क्रमांक ५
राज्यस्तरीय व आपल्या स्तरावरील सर्व सूचनामुळे कार्यवाहीच्या बाबी शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याची खातरजमा करावी.
कार्य क्रमाक ६.
राज्यस्तरीय सदस्यांनी दिवसातून किमान चार वेळा व्हॉट्सअॅप ग्रुप मधील संदेश वाचावेत. किमान सकाळी ९.०० वाजता, दुपारी १२.०० वाजता, ४.०० वाजता आणि संध्याकाळी ७.०० वाजता त्यानुसार कार्यवाही करावी.
कार्य क्रमांक ७.
विभागस्तर ते शालेय पातळीपर्यंत तीन ते चार जणांच्या टीममध्ये प्रत्येक स्तरावर तांत्रिक ज्ञान असलेले व्यक्ती पथक तयार करावे. विविध कारणांसाठी प्रशिक्षण, नोंदणी, समुपदेशन, डेटा एंट्री पडताळणी इत्यादी.
कार्य क्रमांक ८.
सर्व सहायक संचालकांनी आपल्या विभागातील कनिष्ठ महाविद्यालयांमधून किमान २५ तांत्रिक उमेदवारांचा एक गट तयार करावा.
कार्य क्रमांक ९.
शाळास्तर ते विभागस्तर कार्यालय पातळीपर्यंत नोडल अधिकारी नियुक्त करावेत. नाव, पदनाम, संपर्क क्रमांक व्हाट्सअॅप नंतर ईमेल आयडी आणि कार्यालयाचे नाव इत्यादीची माहिती प्रसार माध्यमांमध्ये, सूचना फलकावर प्रकाशित करावी.
कार्य क्रमांक १०
सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर समुपदेशन केंद्राचा पत्ता आणि संपर्क क्रमांक घोषित करावा. त्या ठिकाणी कर्मचारी कामकाजासाठी पाठविण्याची व्यवस्था करावी.
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२. सहाय्यक संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय सर्व
३. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषदा सर्व
४. शिक्षण निरीक्षक बृन्हमुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम)