Class 11th Online Admission Process 2024-25 Portal Link Information Date Schedule

Class 11th Online Admission Process 2024-25 Portal Link Information Date Schedule

Class 11th Online Admission Process 2024-25 Portal Link Information Date Schedule
Class 11th Online Admission Process 2024-25 Portal Link Information Date Schedule

शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य
मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे

महाराष्ट्र शासन

प्रति,

विभागीय शिक्षण उपसंचालक,

मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर

Government of Maharashtra

DIRECTORATE OF EDUCATION (Secondary & Higher Secondary) Maharashtra State

Pune

क्र. विद्या-ए-१/११.प्रवेश/२०२४/ दिनांक-२०/०५/२०२४

Class 11th Online Admission Process 2024-25 Regarding Commencement of Proceedings.
संदर्भ- १. शासन निर्णय क्र. प्रवेश-२०१८/प्रक्र. ३३३/एसडी-२ दि. २३/०६/२०२०.

२. शासन पत्र क्र. प्रवेश-०६२१/प्रक्र. ३३३/एसडी-२ दि.०९/०६/२०२२.

३. राज्यस्तर इ.११वी प्रवेश नियंत्रण समिती बैठक दि. २९/०४/२०२४.

सन. २०२४-२५ मध्ये राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र (MMR) तसेच पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ.११वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश प्रचलित पद्धतीनुसार करण्यात येतील.

Join our Social Media
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ.११वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असल्याने या शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या इ.११वी प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी सरु करणेत येत आहे. त्यासाठी 👉 पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे पोर्टलला जोडले जाण्यासाठी फक्त ओळीला स्पर्श करा असेल. सदर पोर्टलस भेट देऊन आपणास प्रवेश घ्यावयाच्या शहराचे नाव निवडावे व प्रवेशासाठी आवश्यक पुढील कार्यवाही करावी.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कार्यवाहीचे टप्पे खालीलप्रमाणे असतील.

क्रसंबंधित घटककार्यवाहीचा तपशील
उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांसाठी  विद्यालय नोंदणी Jr. College Registration (प्रवेश देण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी, लॉगीन आयडी व पासवर्ड सेट करुन विद्यालयाबाबतची माहिती ऑनलाईन भरुन भरलेली माहिती शिक्षण उपसंचालक यांचेकडून प्रमाणित करुन घेणे.)  
विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे टप्पे१) विद्यार्थी नोंदणी Student Registration. (विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करुन लॉगीन आयडी व पासवर्ड सेट करणे) २) प्रवेश अर्ज भाग-१ भरणे (भरलेला अर्ज आपली माध्यमिक शाळा किवा मार्गदर्शन केंद्र यांचेकडून प्रमाणित करुन घेणे.) ३) पसंतीक्रम देणे, भाग-२ (Option Form) भरणे (प्रवेश फेरीपूर्वी प्रवेशासाठी पसंतीची कनिष्ठ महाविद्यालये ऑनलाईन निवडणे)
प्रवेश प्रक्रियेची कार्यपद्धती• विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश दोन प्रकारे घेता येतील. १. केंद्रीय प्रवेश फेऱ्यांद्वारे Allotment मिळवून. (CAP Seats) किंवा २. कोटांतर्गत राखीव (Quota Seats) जागांवर संबंधित विद्यालयास संपर्क साधून. • प्रवेश मिळविण्यासाठी विद्याथ्यांनी ऑनलाईन अर्ज भाग-१ भरुन प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे. त्यानंतर (CAP Seats) करीता आयोजित करण्यात येणाऱ्या प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्यांस अर्जाचा भाग-२-पसंतीक्रम भरुन विद्यालये निवडता येतील. (किमान-१ व कमाल-१०). • विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश फेरीमध्ये Allotment देण्यात येईल व त्यानुसार विद्यार्थ्यांनी संबंधित मिळालेल्या विद्यालयास संपर्क साधून आपला प्रवेश दिलेल्या वेळेत निश्चित करावयाचा आहे. • कोटांतर्गत (Quota Seats) प्रवेशासाठी संबंधित विद्यालयातील जागेसाठी ऑनलाईन Apply करण्याची सुविधा विद्यार्थी लॉगीन मध्ये देण्यात येईल. कोटासाठी पसंतीस मार्यादा नसेल.
कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी उपलब्ध जागांची विभागणी पुढीलप्रमाणे असेल.
  बिगर अल्पसंख्याकअल्पसंख्याक विद्यालये
केंद्रीय प्रवेश फेरीद्वारे प्रवेश (CAP Seats)८५%३५%
संस्थांतर्गत कोटा (In House Quota)१०%१०%
व्यवस्थापन कोटा (Management Quota)५%५%
अल्पसंख्याक कोटा (Minority Quota)लागू नाही५०%

(प्रवेश देण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी, लॉगीन आयडी व पासवर्ड सेट करुन विद्यालयाबाबतची माहिती ऑनलाईन भरुन भरलेली माहिती शिक्षण उपसंचालक यांचेकडून प्रमाणित करुन घेणे.)

👇👇👇👇👇

इयत्ता ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

अल्पसंख्याक कोटा फक्त अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असेल आणि या जागांवर अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल. इनहाऊस कोटा हा त्यांच संस्थेची माध्यमिक शाळा संबंधित विभागात असेल तर अशा माध्यमिक शाळांमधील इ.१०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लागू असेल. व्यवस्थापन कोटा सर्व विद्यालयांना ऐच्छिक स्वरूपात लागू असेल.

कोणत्याही कोटांतर्गत राखीव जागा दिलेल्या वेळेत संबंधित विद्यालयांना केंद्रीय / CAP प्रवेशासाठी प्रत्यार्पित / Surrender करता येतील, कोटांतर्गत प्रवेश संबंधित कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरुन गुणवत्तेनुसार देण्यात येतील. त्यासाठी कोटांतर्गत प्रवेशासाठी पसंती दर्शविलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यालयास दर्शविण्यात येईल. विद्यालयामध्ये झालेले सर्व प्रवेश त्या-त्या वेळी पोर्टलवर नोंदविले जातील. प्रवेश फेऱ्या व प्रत्यक्ष प्रवेशाचे कार्यवाहीबाबत सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील.

अर्ज भरतांना, केवळ ज्या विद्यार्थ्यांना मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका या शहारांमधील राज्यमंडळ संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा असेल अशाच विद्यार्थ्यांनी या प्रणालीच्या मध्यमातून अर्ज करावा. उक्त ऑनलाईन प्रवेश क्षेत्र वगळता राज्यातील उर्वरित ठिकाणचे प्रवेश प्रचिलत पध्दतीनुसार कनिष्ठ महाविद्याल स्तरावरुन करण्यात येतील त्यासाठी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधावा. अशा सूचना विद्यार्थी च पालकांना द्याव्यात.

यासोबत सन. २०२४-२५ मध्ये मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ.१श्वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रकियेच्या सुरुवातीच्या टप्प्याचे वेळापत्रक सोबत संलग्न आहे. त्यानुसार प्रसिद्धी देऊन पुढील कार्यवाही आपलेस्तरावरुन सुरु करणेत यावी.

मार्गदर्शन केंद्र व माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांचे अर्ज प्रमाणित करणेबाबत आवश्यक सूचना देण्यात याव्यात. सर्व संबंधित घटकांसाठी आवश्यकतेनुसार प्रशिक्षणाचे आयोजन करावे. (मा. शिक्षण सचांलक यांचे मान्य टिपणीनुसार)

पुणे,

दिनांक-२०/०५/२०२४

(दिलीप ज्ञी. जगदाळे)

शिक्षण सहसंचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

विद्यार्थ्यांकरीता अर्ज भरण्याच्या सरावासाठी विशेष सुविधा-

विद्यार्थ्यांना अर्ज भरतांना अडचणींना सामोरे जावे लागू नये तसेच त्यांचा अर्ज भरण्याचा सराव करता यावा यासाठी दिनांक २२ ते २३ मे, २०२४ या कालावधीत, पोर्टलवर Dummy Login सुविधा देण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्या सराव करावा. प्रत्यक्षात अर्ज भरण्यास सुरुवात होणेपूर्वी सदर माहिती नष्ट करुन दि.२४ मे, २०२४ पासून पोर्टलवर प्रत्यक्षात अर्ज, भाग-१ भरण्याची सुविधा त्यांना देण्यात येईल.

प्रत-

मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर

प्रत माहितीस्तव,

व्यवस्थापक, तलिस्मा कॉर्पोरेशन लि., पुणे.

शिक्षण संचालनालय (मायमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-१

इ.११वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२४-२५

प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य टप्पे

(मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका प्रवेश क्षेत्रांसाठी)

क्रकार्यवाहीचे टप्पेकालावधीकार्यवाहीतील घटक
 पूर्वतयारी विद्यार्थी, पालक, कनिष्ठ महाविद्यालये यांचे उद्बोधन, प्रशिक्षण, जनजागृती व प्रसिद्धीमाहे- २१ मे, २०२४ पासून पुढेशिक्षण उपसंचालक, शाळा, प्रसिद्धी व जनसंपर्क माध्यमे
Mock Demo Registration for Students विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा भाग-१ Dummy Form भरणेबाबात सराव करणेदि. २२ मे, २०२४ ते दि. २३ मे. २०२४ पर्यंत केवळ विद्यार्थ्यांना सरावासाठीविद्यार्थी स्वतः पालकांच्या मदतीने (सराव)
 (ऑनलाईन नोंदणी व सर्वसाधारण माहिती)अर्ज भाग-१ भरणे 
 Actual Student Registration & Part-? विद्याथ्यर्थ्यांसाठी संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा भाग-१ भरणे अर्ज प्रमाणित /Verify करुन घेणेदि.२४ मे, २०२४ स.११:०० वा पासून राज्यमंडळ इ.१०वी निकालापर्यंत.विद्यार्थी स्वतः पालकांच्या मदतीने  
Form Part- Verification by GCs विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती, भाग-१ ऑनलाईन तपासून प्रमाणित / Verify करणे.दि.२४ मे, २०२४ पासून सुरु राज्यमंडळ इ.१०वी निकालानंतर दोन दिवस पर्यंतमाध्यमिक शाळा / अधिकृत मार्गदर्शन केंद्र व विद्यार्थी ##
 टीप- प्रत्येक फेरीपूर्वी Registration & Verification सुरु असेल.  
Jr. College Registration उच्च माध्यमिक विद्यालय नोंदणी, कमवि नी भरलेली माहिती तपासून शिउर्स यांनी ऑनलाईन प्रमाणित (Verify/ Edit) करणे,दि. २२ मे, २०२४ पासून सुरु राज्यमंडळ इ.१०वी निकाल येईपर्यंतउच्च माध्यमिक शाळा व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय
 (प्रवेशासाठी पसंतीची विद्यालये नोंदविणे) अर्ज भाग-२ भरणे  
CAP Option Form for students (Part-२) विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या पोर्टलवर पसंतीक्रम नोंदविणे, (प्रवेश अर्जाचा भाग-२ भरणे)राज्यमंडळ इ.१०वी निकालानंतर सुरु होईल, (साधारणपणे पाच दिवस) टीप- प्रत्येक फेरीपूर्वी सुरु असेल.नोंदणी केलेले विद्यार्थी स्वतः पालकांच्या मदतीने
 कोटांतर्गत राखीव जागांवरील प्रवेश सुरु अल्पसंख्याक कोटा-५०% इनहाऊस कोटा – १०% व्यवस्थापन कोटा- ०५%राज्यमंडळ इ.१०वी निकालानंतर सुरु होईल, (साधारणपणे पाच दिवस) टीप- यासाठी कार्यवाहीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे देण्यात येईल.विद्यार्थी व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालये.  
 प्रवेश फेऱ्या अलॉटमेंट व प्रवेश करणे  
CAP नियमित फेरी-१राज्यमंडळ इ.१०वी निकालानंतर १० ते १५ दिवस 
CAP नियमित फेरी-२ CAP नियमित फेरी -३७ ते ८ दिवस 
 ७ ते ८ दिवस 
CAP विशेष फेरी-१७ ते ८ दिवसआरक्षण लागू नाही
१०CAP विशेष फेरी-२ (ATKT सहभाग)एक आठवडाप्रतीक्षा यादी (२-२ दिवस)
 टीप- प्रत्येक प्रवेश फेरीसोबत कोटांतर्गत प्रवेश समांतर सुरु असतील.  
 उर्वरित विद्यार्थ्यांचे प्रवेशासाठी – विशेष फेऱ्या दैनिक गुणवत्ता फेऱ्या (DMR- Daily Merit Round)आवश्यकता भासल्यास याबबात वेळापत्रक जाहीर केले जाईल.दैनंदिन अर्ज व दैनंदिन गुणवत्ता
    

(विशेष फेरी-१ नंतर इ.११वी वर्ग सुरु करता येतील)

*GC-Guidance Centre

#FCFS Round होणार नाही.

(दिलीप ज्ञा. जगदाळे)

शिक्षण सहसंचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)

परिपत्रक पीडीएफमध्ये उपलब्ध

Leave a Comment

error: Content is protected !!