Class 10th Marathi Kumarbharti Appreciation of All Poems

Class 10th Marathi Kumarbharti Appreciation of All Poems

image 7
Class 10th Marathi Kumarbharti Appreciation of All Poems

Class 10th Marathi Kumarbharti Appreciation of All Poems

Maharashtra State Board Syllabus Class 10th Marathi Solutions Kumarbharti Appreciation of All Poems Iytta Dhavi Sarv Kavitanche Rasgrahan

Class 10th Marathi Kumarbharti Appreciation of All Poems

कवीचे नाव – संत रामदास / नारायण सुर्याजी ठोसर.

रचना प्रकार – ओवी.

काव्यसंग्रह – श्रीदासबोध.

कवितेचा विषय – उत्तम माणसाची किंवा आदर्श व्यक्तीची लक्षणे.

स्थायिभाव – शांत किंवा आदर्श माणसे घडविण्याचा ध्यास.

कविंची लेखन वैशिष्ट्ये –

प्रस्तुत कविलेची रचना ओवी या छंद- प्रकारात केली आहे. ओवी हा उच्चारणाला अत्यंत लवचिक असा रचनाप्रकार आहे व सर्वसामान्यांना समजेल अशी आहे. चुकिचे वर्तन व चांगले वर्तन या दोन्ही बाबी समर्थांनी स्पष्ट शब्दात सांगितल्या आहेत. दासबोध या त्यांच्या कृतीत व्यासंग व चिंतन, समाजाचे व जनहिताचे सुक्ष्म अवलोकन प्रत्ययास येते. सामाजिक जाणीव ही रामदासांच्या कवितेचे ठळक वैशिष्ट्य आहे.

मध्यवर्ती कल्पना –

प्रस्तुत कवितेत रामदासांनी आदर्श व्यक्तिची – लक्षणे सांगितली आहेत. समाजात वावरताना कसे वागावे, काय करावे, काय टाळावे याचेच स्पष्ट शब्दात निवेदन केले आहे. समाजाने विवेकाने वागावे व कर्तबगार व्हावे ही तळमळ या पद्यपाठातून व्यक्त होते.

कवितेतून व्यक्त होणारा विचार-

प्रस्तुत कवितेत कविने समाजात कसे वागावे याचे मार्गदर्शन केले आहे. इतरांशी सहकार्याने वागावे कपट करू नये. वाचाळ माणसास टाळावे, उपकाराची परतफेड करावी, उदारपणाने वागावे अशा अनेक गुणांचे आच रण करण्यास संत रामदास सांगतात.

कवितेच्या आवडलेल्या ओळी-

कविता आवडण्याची/ना आवडण्याची कारणे-

ही कविता मला फार आवडली कारण कविते- तील विचार सर्वसामान्यांना पटण्यासारखा आहे, कवितेतील गुण व अवगुण संत् रामदासांनी परखडपणे सांगितले आहेत.

कवितेतून मिळणारा संदेश-

प्रत्येक व्यक्तिने चांगले वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी वाईट काय चांगले काय हे समजून घ्यावे, प्रत्येकाने चांगला व्यक्ती बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे यामधून आदर्श व उत्तम समाज घडेल

Class 9th 10th 11th 12th Revised Syllabus Assessment Evaluation Scheme

कवयित्री/कवी- नीरजा / नीरजा राजन धुळेकर

रचना प्रकार – मुक्तछंद

काव्यसंग्रह – नीरर्थकाचे पक्षी

कवितेचा विषय – स्त्री-पुरुष समानतेचे आश्वासक चित्र.

स्थायीभाव – विस्मय, आश्चर्य, मनातील आशावाद, कवयित्रीची लेखन वैशिष्ट्ये – साध्या विधानातून कवयित्री खोलवर विचार मांडतात, आधुनिक जगातील स्त्री-पुरुष समानता हा विचार अगदी सहजपणे व्यक्त होतो. मुलगा व मुलगी यांच्या भावी आयुष्यातील समानतेचे, सामंजस्याचे आश्वासक चित्र कवयित्रीने प्रत्ययकारकपणे प्रकट केले आहे.

मध्यवर्ती कल्पना –

सध्याच्या काळात लक्ष टाकले की, असे जाणवते आजच्या युगातही स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. पण कवयित्रींना मुलगा व मुलगी यांच्या खेळण्यातून त्यांच्यामधे हळूहळू सामंजस्य निर्माण होत जाताना दिसते. हीच मुले मोठी झाल्यावर सामंजस्याने वागून समाजामध्ये स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करतील स्त्री-पुरुष समानतेचा आशावाद हीच या काव्याची मध्यवर्ती कल्पना आहे. कवितेतून व्यक्त होणारा विचार –

अजूनही समाजाने पूर्णपणे ‘स्त्री-पुरुष समानता स्विकारलेली नाही हे निराशा जनक चित्र आहे. परंतु भावी काळ हा स्त्री-पुरुष समानतेचे तत्व आतापासून मान्य करुन स्वीकारले पाहीजे असा विचार या कवितेतून मांडला आहे.

कवितेतील आवडलेली ओळ-

कविता आवडण्याची वा नावडण्याची कारणे-

ही कविता मला आवडलेली आहे. ही आजच्या आमच्या पिढीची कविता आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्त्री-पुरुष समानतेचे मुल्य तसेच आमच्या मनातील विचार व्यक्त होतात, आम्ही आपापसात वागताना आमच्या मनामध्ये मुलगा-मुलगी हा भेदच नसतो त्यामुळे ही स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य रुजविणारी चिंतन- शील कविता मला खुप आवडली आहे.

कवी/कवयित्री – द. भा. धामनस्कर –

रचनाप्रकार – मुक्तछंद

काव्यसंग्रह – भरून आलेले आकाश

कविलेचा विषय निर्जीव वस्तुंचा सजीवपणा/ वस्तुंनाही भावना असतात.

स्थायिभाव – कंटाळा

लेखनवैशिष्ट्ये –

या कवितेची रचना मुक्तछंदातील असल्याने लेखनशैलीही मुक्त आहे, शब्द निवडण्यावर कोणतेही बंधने नाहीत. दैनंदिन व्यवहारातील सहजपणे वापरली जाणारी भाषा वाचकांच्या मनाला स्पर्श करते. अत्यंत हळुवार, संवेदनशील भावना, चिंतनशीलता व प्रांजळपणा कवी साध्या शब्दांतून व्यक्त करतात.

मध्यवर्ती कल्पना-

निर्जीव वस्तुंनाही भावना असतात. त्यांनाही मन असते. वस्तू आणि व्यक्ती यांच्यामधे एक अतुट नाते असते. वस्तूंशी वागण्याच्या पद्धती-तून वस्तुंचे स्वरूप घडत जाते. म्हणून कोणतीही वस्तू नजरेला पडताच त्या वस्तूच्या स्वरूपावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व कळते. यावरुन्च क्स्तू असतात असे कविना वाटते वस्तू आणि माणसे यांच्यातील नाते या कवितेतून उलगडून सांगितले आहे. व्यक्त होणारा विचार-निर्जीव वस्तूंना आपण मन नसते असे म्हणतो. कविंच्या मते त्यांना मन आणि भावना असतात वस्तू संवेदनशील असतात. म्हणून मानसाने क्स्तूंशी प्रेमाने आत्मीयतेने वागले पाहि व पाहिजे जसे आपण माणसांशी वागतो तसेच वस्तूंशीही वागले पाहिजे हा महत्वाचा विचार कवितेतून मांडला आहे.

आवडलेली ओळ-

कविता आवडण्याची/नआवडण्याची कारणे-

ही कविता भावनिक त्यामुळेच मनावर भावते आधुनिक जगात वावरताना कोणालाही ही कविता आवडेल अशीच आहे. एका वेगळ्याच चाकोरीबाहेरचा विचार कविंनी या कवितेतून मांडला आहे. सहसा आपण वस्तू आणि ती वापर- णारा णारा माणूस माणूस, यांना वेगळे मानतो. पण तसे न करता वस्तूंशी प्रेमाने वागले पाहिजे हा नाविन्यपूर्ण वेगळा भाव या कवितेतून व्यक्त होतो म्हणून ही कविता मला खूप आवडते.

कवितेतून मिळणारा संदेश-

वस्तू माणसाला दिर्घकाळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांमध्ये अतुट नाते तयार होते. आपण वापरलेल्या वस्तुंच्या रुपाने आपले अस्तित्व शिल्लक राहते त्यांचा उपयोग संपला की त्यांना टाकून देऊ नये त्यांना टाकून देणे म्हणजे आपले अस्तित्व स्वतः संपवून टाकणे हे टाळण्यासाठी आपण वस्तूंशी स्नेहाने संवेदनशीलपणे वागले पाहिजे.

कवी – मोरोपंत (मोरेश्वर रामजी पराडकर)

रचनाप्रकार – आर्या/ पंडितीकाव्य

काव्यसंग्रह – केकावली – कावला –

कवितेचा विषय – परमेश्वर भक्तीने परिवर्तन होते.

स्थायीभाव – शांत, शम किंवा दुःख.

कवीची लेखनवैशिष्ट्ये –

ही कविता आर्या या वृत्तात लिहिली आहे. आर्याची चाल ही जनमानसात खुप लोकप्रिय झालेली आहे. ही कविता चालीमुळे गुणगुणत रहाविशी वाटते. या कवितेत सुजनवाक्य, सदंधि- कमळी, कुजनविघ्नबाधा, सत्यत्व, सकलकामना यांसारख्या संस्कृत शब्दांमुळे कवितेला भारदस्त- पणा येतो. भक्तीमार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये हा हटकेबाज विचार कविलेत अनुभवास येतो.

मध्यवर्ती कल्पना-

माणसाने नेहमी संत, सज्जन्नांच्या सहवासात रहावे. खोटा अभिमान न बाळगता, मोहाला बळी न पडता सत्य कर्म करुन सज्जनाच्या सहवासात रहावे. ही शिकवण कवी मोरोपंत देतात.

व्यक्त होणारा विचार –

माणसाने सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे. दुराभिमान, गर्विष्ठपणा, वाईट विचार आपल्या मनातून नष्ट झाले झाले पाहिजेत, पाहिजेत, चांगल्या चागल्या विचारांचे वळण सज्जनांचे वागणे त्यांचे लागावे, स विचार अंगिकारावे हा विचार कवितेत मांडला आहे

आवडलेली ओळ –

आवडण्याची/न्आवडण्याची कारणे-

ही कविता मला खुप आवडते कारण कवितेत चांगले वागण्याचा सल्ला दिला आहे, पण चांगले म्हणजे काय हे अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले आहे. पण या कवितेत काही संस्कृत शब्दांमुळे अर्थ कळण्यास अडचणी येतात ही या कवितेची नावड निर्माण करणारी बाब आहे,

मिळणारा संदेश – नेहमी संत सज्जनांच्या संगतीने रहावे त्यांच्या सहवासामुळे चांगले वागण्याचे दर्शन घड़ते नेहमी ईश्वराचे नामस्मरण करत राहावे म्हणजे वाईट कल्पना, वाईट विचार मनात येत नाही.

SSC Marathi All Lesson Questions And Answers

कवयित्री – आसावरी काकडे –

रचनाप्रकार – अष्टाक्षरी ओवी –

काव्यसंग्रह – लाहो –

कवितेचा विषय – जीवन जगण्यास सत्य गोष्टींची गरज असते प्रयत्न आणि सकारात्मकता यांचे महत्त्व.

स्थायिभाव- उत्साह

लेखन वैशिष्ट्ये –

ओघवत्या भाषेमुळे कवितेला सौंदर्य प्राप्त झाले – आहे. ‘सारी खोटी नसतात नाणी’ या शब्दातून जीवनाचा आशावाद व्यक्त होतो प्रत्येक चरणात आठ अक्षरे आणि प्रत्येक कडव्यात चार चरण अशी या ओळींची रचना आहे. संपूर्ण कविताच जीवनाकडे आशावादी दृष्टीकोना- तून पाहावे या विचाराने भरलेली आहे. मध्यवर्ती कल्पना-संयम, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी यांच्या योगाने कार्य सिद्धीस नेता यावे हा विचार या कवि- तेच्या केंद्रस्थानी आहे. जीवनात अपयश येण्याच्या खुप घटना घडतात म्हणून माणसाने कोलमडून न जाता आपल्याला यश मिळेलच अशी आशा बाळगावी असा आशावाद ही कविता जागवते

व्यक्त होणारा विचार-

जीवनात कष्ट करून सुद्धा अनेकदा यश हुलकावणी देते. यामुळे माणसे नाऊमेद होतात माणसाने नाऊमेद कधीच न होता सतत प्रयत्न करी त रहावे हा विचार कवितेत कविने प्रकर्षाने व्यक्त केला आहे.

कवितेच्या आवडलेल्या ओळी-

आवडण्याची / न आवडण्याची कारणे-

ही कविता मला खुप आवडली कविता वाचताना निराशेची मळभ दूर होते. ‘प्रयत्नात परमेश्वर’ म्हणजेच प्रयत्न करत राहण्यातच यशाचे खरे गमक आहे, हे मनोमन पटते. ‘खोद आणखी थोडेसे या शब्दांनी मनाला उभारी येते. कवि- तेलील विचार माणसाला चांगले व प्रयत्नवादी जीवन जगण्याची प्रेरणा देते, मिळणारा संदेश- आयुष्यातील प्रत्येक क्षण हा सुखाने भरलेला नसतो ‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे’ या उक्तीप्रमाणे सुखापेक्षा जीवनात सदोदित अडचणीच असतात या अडचणींना घाबरून न जाता सकारा त्मक दृष्टीकोन बाळगला पाहिजे. समाजात सगळी- च माणसे अगदी वाईट नाही. सगळीकडे वाईटपणा खोटेपणा भरलेला आहे. असे मानू नये. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे’ म्हणजे प्रयत्न केलाच पाहिजे हा संदेश कवितेतून मिळतो.

कवी – जगदीश खेबुडकर,

रचनाप्रकार – गीतरचना/संदेशप्रधान.

काव्यसंग्रह – एक चित्रपट गीत (आराम हराम है), भावगीत.

कवितेचा विषय-स्वसामर्थ्य व स्वातंत्र्य मोलाचे असते किंवा स्वसामर्थ्यावर ध्येय साकार करण्याची इच्छा.

स्थायिभाव – उत्साह, प्रेरणा.

लेखनवैशिष्ट्ये –

धृपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे, रसाळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणा- री भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे प्रतिकां- च्या माध्यमातून थेट मनाला भिडेल अशी शब्द- रचना कवींनी वापरली आहे. फळ रसाळ मिळते’ याप्रमाणे अनुप्रासाचा सुंदर उपयोग केला आहे.

मध्यवर्ती कल्पना-

स्वतःच्या क्षमतेवर आणि स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवावा व यशासाठी दमदार पाऊले पुढे टाकावे तत्कालीन सुखाच्या मोहापायी बळी पडू नये. सुख- लोलुपतेमध्ये मनाला अडकू देऊ नये. अशी या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे.

व्यक्त होणारा विचार-दैव, नशीब, नशीबात असेल तेच मिळेल अशी समजूत करणाऱ्या माणसाची कवी ही समजूत, दूर करायला सांगतात. कवींच्या मते माणसाने स्वतःचे सामर्थ्य ओळखले पाहिजे ध्येयाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी स्वसामर्थ्य, प्रयत्नवाद हाच एक विचार आहे.

आवडलेल्या ओळी- कविता आवडण्याची/ न आवडण्याची कारणे- ही कविता म्हणजे एक गाजलेले भावगीत आहे. त्याची चाल, संगीत ऐकले की हे गीत ऐकत राहावे व म्हणावेसे वाटते. अवतीभवती मोहाचा पसारा आहे. त्यात मन सहजपणे अडकते म्हणून कवी म्हणतात ‘तूज भवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया’ कष्ट केल्या- शिवाय खस्ता खाल्याशिवाय फळ मिळत नाही हे सांगताना कवी म्हणतात ‘कष्टाविन फळ ना मिळते, तूज कळते परि न वळले असे म्हटले आहे. यात थोडासा विरोध जाणवतो. हे थोडेसे खटकते, मिळणारा संदेश- माणसाने कष्टावर विश्वास ठेवला पाहिजे असेल हरी देईल पलंगावरी’ असे मानू नये. नशिबावर अवलंबून राहण्यापेक्षा प्रयत्नवादी बना केवळ देहाला तृप्त करणारी सुखे महत्वाची नसतात आपल्या प्रयत्नाने गगनभरारी मारली पाहिजे त्यातच खरे सुख असते. हा संदेश कविता देते

कवी – ज. वि. पवार

रचनाप्रकार – मुक्तछंद

काव्यसंग्रह – नाकेबंदी

कवितेचा विषय-अन्यायाविरोधी लढा किंवा डॉ आंबेडकरांचे महात्म्य, गौरख

स्थायिभाव – उत्साह, क्रोध, आनंद, विद्रोह.

कवितेतील लेखनवैशिष्ट्ये –

कविता मुक्तछंदात आहे. तू परिस्थितीवर स्वार झालास, इतिहास घडविलास, आकाश हाद्रले, पृथ्वी डचमळली, चवदार तळ्याला आग लागली अशा शब्द‌प्रयोगांनी कविता ओजस्वी बनली आहे. दलित समाज शांत झाला आहे. ही बाब ‘चवदार तळ्याचे पाणी थंड झाले आहे’ या शब्दांतून व्यक्त होते. सामाजिक रुढी-परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण करण्याचा प्रयत्न केला आहे.

मध्यवर्ती कल्पना-

डॉ. बाबासाहेबांनी केलेल्या महान कार्या बद्दल. त्यांचे महात्म्य कथन करण्यासाठी ही कविता लिहिली आहे. सावित्री व गंधारी यानद्यांच्या काठी वसलेल्या महाडमधील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने दलित् समाजाला एक नवा जन्म दिला. खचलेल्या मर्नामधे आत्मविश्वास निर्माण केला. बाबासाहेबांनी कर्तबगारी हा या कवितेचा विषय आहे व्यक्त होणारा विचार – पारंपारिक वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या व दैन्य, दारिद्रयाच्या चिखलात खितपत पडलेल्या समाजाला आंबेडकरांनी बाहेर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना मदत केली. चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला, दलित चळवळीला तेज प्राप्त करून दिले. पण आता मात्र तोच दलित समाज थंड झालाय त्यांना बाबासाहेबांनी मिळवून दिलेले तेज आता विरुन गेले आहे. याविषयीची खंत कवींनी व्यक्त केली आहे.

कवितेच्या आवडलेल्या ओळी-

आवडण्याची/नआवडण्याची कारणे-

ही कविता मला अतिशय आवडली आहे. कविता वाचताना बाबासाहेबांची महानता स्पष्ट होते, कवितेतील शेवटच्या कडव्यात मात्र वेगळा अर्थ जाणवतो. दलित समाजातील दुःखाची जाणीव केवळ शेवटच्या चार ओळींमध्ये व्यक्त झाली आहे. मात्र त्या अगोदरच्या सर्व ओळी जाज्वल्य भक्तीच्या पार्श्वभूमीवर मनाला व्याकूळ करतात, एकुणच दुःखभाव हा या कवितेचा आत्मा आहे.

मिळणारा संदेश-

अज्ञान, दारिद्र्य, जातीयता या भोवऱ्यात अडकुन पडलेल्या समाजाला बाबासाहेबांनी बाहेर काढले. सन्मान, आत्मविश्वास मिळवून दिला. पण आता मात्र त्यांचे तेज मावळले आहे. या दलित समाजाने पुन्हा पूर्वीप्रमाणे विषमतेविरुद्ध लढण्यास सिद्ध व्हावे. अशी इच्छा कवी व्यक्त करतात हाच या कवितेचा संदेश आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!