Class 10th 12th Board Exam Schedule Declared
Dates of Class 12th and 10th February-March 2026 exams announced
Regarding the dates of Higher Secondary Certificate (12th) and Secondary School Certificate (10th) examinations in February-March 2026
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
विषय- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी)
फेब्रु-मार्च २०२६ परीक्षांच्या तारखांबाबत…
।। प्रकट न ।।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आगामी फेब्रुवारी-मार्च २०२६ मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेच्या लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा पुढील तारखांना आयोजित करण्यात येणार आहेत.
| अ.क. | तपशील | उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा कालावधी | माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा कालावधी |
| १. | लेखी परीक्षा | मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार, दि. १८ मार्च २०२६ (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षेसह) | शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार, दि. १८ मार्च २०२६ |
२. | प्रात्याक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा | शुक्रवार, दि. २३ जानेवारी २०२६ ने सोमवार, ०९ फेब्रुवारी २०२६ (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह) | सोमवार, दि. ०२ फेब्रुवारी २०२६ ते बुधवार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ (शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह) |
शाळा / कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या तारखा वरीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहेत.
उपरोक्त परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.
याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
दिनांक : १३/१०/२०२५
परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक
(प्रमोद गोफणे)
सहसचिव, राज्य मंडळ, पुणे
Also Read 👇

TIMETABLE FOR SSC FEBRUARY MARCH 2026
दहावी आणि बारावी परीक्षा वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
विषय- फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये आयोजित करावयाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपुत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षांची अंतिम वेळापत्रके जाहीर करणेबाबत
प्रकटन
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्द माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.

Class 12th board exam