Chhatrapati Sambhaji Maharaj SARTHI Computer Skill Development Training Program For Youth Of Maratha Kunbi Cast Online Apply Link
Chhatrapati Sambhaji Maharaj SARTHI Computer Skill Development Training Program For Youth Of Maratha Kunbi Cast Online Apply Link
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे (नियोजन विभागाअंतर्गत महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल), पुणे
सारथी पुणे व एमकेसीएल पुणे यांच्या द्वारे “छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम” संपूर्ण महाराष्ट्रात तालुकास्तरापर्यंत राबविण्यासाठी मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलेयर गटाच्या युवांसाठी निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत खाली दर्शविल्याप्रमाणे प्रशिक्षणासमोर नमूद पात्रता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
SR. NO. | TITLE OF THE TRAINING PROGRAMME | ENTRY QUALIFICATION (BASIC EDUCATION) | DURATION (MONTH) | NO. OF SEATS (SANCTION INTAKE) |
01 | CHHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ SARTHI Digital Employability Enhancement Program (“CSMS-DEEP”) | 10th Std. Pass | 6 Months | 40,000 |
- उपरोक्त कौशल्य विकास प्रशिक्षण हे निःशुल्क असून सदर प्रशिक्षणाचा प्रशिक्षण खर्च सारथी, पुणे मार्फत करण्यात येईल.
- उपरोक्त कौशल्य विकास प्रशिक्षण हे एमकेसीएल संस्थेच्या अधिकृत अध्ययन केंद्रांमार्फत (ALC) महाराष्ट्र पातळीवर राबविण्यात येईल.
- सदर प्रशिक्षण हे अनिवासी (Non Residential) असून, प्रशिक्षणादरम्यान राहणे व जेवणाची व्यवस्था उमेदवारास स्वः खर्चाने करावी लागेल.
- मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा- कुणबी समाजाच्या नॉनक्रिमिलेयर गटाच्या वयोगट 18 ते 45 मधील गरजू व इच्छुक पात्रता धारक उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे.
- संबंधित उमेदवारांनी एमकेसीएल संस्थेच्या अधिकृत अध्ययन केंद्राकडे मूळ कागदपत्रांसह स्वः खर्चाने उपस्थित राहावे याची नोंद घ्यावी.
- प्राप्त अर्जामधून निकषाच्या आधारे अर्जाची छाननी करून व प्रथम येणान्या निवडक उमेदवारांना प्रवेश दिला जाईल. अपूर्ण असलेले तसेच मुदती नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- मराठा उमेदवारास जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर / EWS (Economically Weaker Section) असल्याचे प्रमाणपत्र, TC/ LG व 1 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- • कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी उमेदवाराचे जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी ज्या प्रशिक्षण केंद्राची निवड केली आहे त्याच प्रशिक्षण केंद्रावर त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल.
- प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर, उमेदवारास प्रशिक्षणास गैरहजर राहता येणार नाही अथवा प्रशिक्षण मध्येच सोडून जाता येणार नाही. प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमांचे घटक, कालावधी, स्थान व प्रवेश क्षमतेबाबतचे सर्व अधिकार संस्थेकडे राखीव असतील.
उमेदवाराने ऑनलाईन अर्जासोबत अपलोड/जोडावयाची कागदपत्रे
Also Read-
1) विहीत नमुन्यातील व फोटोसहित परिपूर्ण अर्ज
2) प्रशिक्षणानुसार आवश्यक शैक्षणिक गुणपत्रक व प्रमाणपत्र (किमान दहावी पास)
3) सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र मराठा जातीच्या उमेदवाराकडे जातीचे प्रमाणपत्र नसल्यास मराठा जातीचा उल्लेख असलेले EWS प्रमाणपत्र (उप विभागीय अधिकारी SDO यांचे प्रमाणपत्र) किंवा TC / LC (शाळा/कॉलेज सोडल्याचा दाखला) आणि 1 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र (March 31, 2025 पर्यंत वैध)
4) जन्म दाखला
5) नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र / मागील तीन वर्षांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (उप विभागीय अधिकारी/तहसीलदार यांचे प्रमाणपत्र) (March 31, 2025 पर्यंत वैध)
6) तहसीलदार यांचे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र (Domicile Certificate)
7) आधार कार्ड
8) उमेदवाराचा फोटो व सही
प्रशिक्षण ठिकाण : एमकेसीएल संस्थेचे अधिकृत अध्ययन केंद्र (ALC) |