Celebration Of Partition Vibhishika Memorial Day
Celebration Of Partition Vibhishika Memorial Day
Vibhajan Vibhishika Smurti Din
Regarding the celebration of Partition Vibhishika Memorial Day in all schools in Maharashtra
महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये विभाजन विभीषिका स्मृती दिन साजरा करणेबाबत
जा.क्र.शिसं/मावउमा/संकिर्ण/विविस्मृतीदिन/२०२५/अ-१/
दिनांक : १३/०८/२०२५
विषयः- महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये विभाजन विभीषिका स्मृती दिन साजरा करणेबाबत.
संदर्भ :- शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे दिनांक १३/०८/२०२५ रोजीचे पत्र.
उपरोक्त संदर्भिय पत्र आणि सहपत्रचे अवलोकन करावे.
विषयांकित प्रकरणी विद्यार्थ्यांना इ.स. १९४७ सालच्या भारताच्या फाळणीची ऐतिहासिक आणि वेदनादायक वास्तवाची माहिती घेणे आवश्यक आहे. व त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होऊन एकात्मतेचे, सौहार्दाचे व समतेचे मूल्य रूजेल या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये दिनांक १४ ऑगस्ट २०२५ पासून “विभाजन विभीषिका स्मृती दिन साजरा करण्याबाबत संदर्भिय पत्रान्वये कळविण्यात आले आहे.
त्याअनुषंगाने संदर्भिय पत्रात नमूद केल्याप्रमाणे दिनांक १४ ऑगस्ट “विभाजन विभीषिका स्मृती दिन” साजरा करण्याबाबत आपल्या अधिनस्त शाळा / कनिष्ठ महाविद्यालय आणि संबंधितांना आपल्या स्तरावरुन कळविण्यात यावे.
(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक,)
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत- माहितीस्वत सविनय सादर,
१. मा. अ.अ. कुलकर्णी, अवर सचिव (एसडी-४) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्ताल, मध्यवर्ती इमारत, महाराष्ट्र राज्य पुणे-४११००१.
Partition Horrors Remembrance Day / 14 August Partition Horrors Remembrance Day
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.
२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक/ प्राथमिक) जिल्हा परिषद, सर्व.
३. शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई, (दक्षिण, उत्तर, पश्चिम)
४. प्रशासन अधिकारी मनपा / नपा.