Raghoji Bhangre Gunagaurav Scheme राघोजी भांगरे गुणगौरव योजना

Raghoji Bhangre Gunagaurav Scheme

Raghoji Bhangre Gunagaurav Scheme

image 28
Raghoji Bhangre Gunagaurav Scheme

Raghoji Bhangre Gunagaurav Scheme

Revised guidelines for implementing the “Raghoji Bhangre Gunagaurav” scheme for providing incentive prizes to Scheduled Tribe students who excel with special marks in class 10th and 12th examinations…

इयत्ता १० वी व १२ वीच्या परिक्षेत विशेष गुणांसह प्राविण्य मिळविणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस देण्यासंदर्भातील “राघोजी भांगरे गुणगौरव” योजना राबविण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना…

दिनांक : २० मे, २०२५

प्रस्तावना :-
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळून गुणवत्तेबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी राज्यातील इयत्ता १० वी व १२ वी मधील शालांत व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत विशेष गुणांसह प्राविण्य मिळविणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस योजना विभागाच्या संदर्भ क्र. १ येथील दिनांक १४ ऑगस्ट, २००३ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुरू करण्यात आली असून त्यामध्ये संदर्भ क्र. ५ येथील शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आली आहे. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी संदर्भक्र. ६ येथील दिनांक १९ मे, २०२५ रोजीच्या पत्रान्वये प्रस्तावित केल्यानुसार प्रस्तुत योजनेची व्याप्ती वाढविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

शासन निर्णय :-
आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळा,
अनुदानित आश्रमशाळा, नामांकीत शाळा, सैनिकी शाळा, एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमधील
इयत्ता १० वी व १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (S.S.C. Board) तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ
(C.B.S.E. Board) मधून गुणवत्ता यादीत प्राविण्यासह गुण मिळवून राज्यात प्रथम येणाऱ्या ५ मुले व
५ मुली तसेच राज्यातील ९ विभागीय शिक्षण मंडळामध्ये प्रत्येक शिक्षण मंडळात प्रथम येणाऱ्या ३ मुले
व ३ मुलींना प्रोत्साहनपर बक्षिस योजनेची व्याप्ती वाढविण्यास व सदरील योजना “राघोजी भांगरे
गुणगौरव” या नावाने सुरु करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.


२. शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, सैनिकी शाळा, नामांकीत शाळांमध्ये शिकत असलेले इयत्ता १० वी व १२ वीच्या परिक्षांमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (S.S.C. Board) मध्ये राज्यस्तरावर प्रावीण्य मिळविणारे मुले व मुली.

महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्रमांकः शाआशा-२०१९/प्र.क्र.२२८/का-१३ (ई-ऑफीस क्रमांक ११२७८७६ ) मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय विस्तार, मुंबई

Shala Praveshotsav शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम राबविणेबाबत

Shala Praveshotsav

Shala Praveshotsav Shala Praveshotsav Shala Praveshotsav महाराष्ट्र शासनप्राथमिक शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, पुणे क्र. प्राशिसं/८०२/शाळाभेटी/२०२५/3/24दिनांक १२.०६.२०२५ विषय :- “शाळा प्रवेशोत्सव” …

Read more

D A Hike Two Percent

D A Hike Two Percent

D A Hike Two Percent शासन निर्णय क्रमांकः ममवा-१३२५/प्र. क्र.९/सेवा-९दिनांक : ११ ऑगस्ट, २०२५ वाचा – भारत सरकार, वित्त मंत्रालय, …

Read more

Comprehensive Instructions Measures Safety Security Of students In Schools

Comprehensive Instructions Measures Safety Security Of students In Schools

राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा सुरक्षिततेच्या अनुषंगाने करावयाच्याउपाययोजनांसंदर्भात सर्वसमावेशक सूचना. Comprehensive Instructions Measures Safety Security Of students …

Read more

error: Content is protected !!