Balpanichya Kavita Sangrh Upkram Link

Balpanichya Kavita Sangrh Upkram Link

Balpanichya Kavita Sangrh Upkram Link

Poems of childhood

Collection of childhood poems

बालपन कि कविताएँ (बालपणीच्या कविता) संग्रह

जा.क्र. राशैसंप्रपम/बालशिक्षण/कविता संग्रह/२०२५-२६/

प्रति,
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व जिल्हे. शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद, सर्व जिल्हे.

विषयः बालपन कि कविताएँ (बालपणीच्या कविता) संग्रह तयार करण्यासाठी सर्व स्तरावर आवाहन करणेबाबत

संदर्भ: स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग शास्त्री भवन, नवी दिल्ली, शिक्षा मंत्रालय भारत सरकार कार्यालयाचे पत्र, D.O No.- १-१/२०२५-१९.१३ दि.२७.०५.२०२५

उपरोक्त विषयान्वये, राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP), २०२० नुसार शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने (DOSE & L) बालपन कि कविताएँ (बालपणीच्या कविता) उपक्रम लहान मुलांसाठी भारतीय गाणी /कविता पुनसंग्रहित करणे यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले आहे. प्रस्तुत उपक्रमाचा उद्देश पायाभूत टप्प्यातील शिक्षणासाठी भारतीय कवितांचा संग्रह तयार करणे असा आहे. प्रस्तुत उद्दिष्ट पूर्तता करण्यासाठी देशभरातील साधारण २२ प्रमुख भाषांमध्ये तयार असणारे लोकसाहित्य, विविध स्तरावर (वयोगटानुसार) तयार केल्या जाणाऱ्या बालसाहित्यातील कविता, लोकगीते किंवा स्वलिखित कविता सादर करणे तसेच जुन्या कविता व गीते संबंधित लेखकांच्या नावासह एकत्रित करण्यासाठी नमूद संदर्भानुसार आवाहन करण्यात आले आहे. यामुळे प्रत्येक भाषेतून उत्स्फुर्तपणे अनेक कवितांचे संग्रह तयार होऊ शकतील. कविता पुढील तीन स्तरांसाठी संकलित करावयाच्या आहेत.

१. पूर्व-प्राथमिक (वय ३-६)

२. इयत्ता १ (वय ६-७)

३. इयत्ता २ (वय ७-८)

सदर उपक्रमात सहभाग घेण्यासाठी

१. कोणतेही प्रवेश शुल्क नाही.

२. MyGov वेबसाइट

https://innovateindia.mygov.in/baalpan-k-kavita

वर नोंदणी करावी.

३. कविता वेबसाइट

https://innovateinda.mygov.in/baalpan-ki-kavita

वर सबमिट करावी.

४. निवड समितीद्वारे अंतिम प्रवेशिकांना योगदानाचे प्रमाणपत्र, योग्य रोख बक्षीस दिले जाईल.

५. सदर कविता पाठविण्याची मुदत दि. ३०.६.२०२५ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

६. स्पर्धेची इतर माहिती MyGov वेबसाइटवर पाहता येईल.

तदनुसार उपरोक्त उपक्रमाची अंमलबजावणी करत असताना सदर कविता संग्रहासाठी महाराष्ट्राची प्रमुख भाषा मराठी सोबतच इंग्रजी व इतर भाषांमध्ये देखील कविता सादर करण्यात याव्यात. प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षक, पालक, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी, कवी, लेखक यांच्यापर्यंत सदर उपक्रमाच्या माहितीचा व्यापक प्रसार आणि प्रचार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, वृत्तपत्रांद्वारे करण्यात यावा. प्रत्येक शाळेतून उपरोक्त प्रत्येक गटासाठी शक्य होतील तेवढ्या स्वलिखित कविता, गाणी, लोकसाहित्यात लोकप्रिय असलेल्या विद्यमान कविता (लेखकाच्या नावासह) सादर करण्यासाठी आवाहन करावे. बालकांसाठी भारतीय कविताचा एक उत्कृष्ट संग्रह तयार करण्यासाठी संबधित घटकांना प्रोत्साहित करावे.

सदर आदेशानुसार आपल्या स्तरावरून तात्काळ कार्यवाही पूर्ण करण्यात यावी व कार्यवाहीचा अहवाल प्रस्तुत कार्यालयास सादर करण्यात यावा.

सोबत : संदर्भ पत्र

संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे-३०

प्रत माहितीस्तव
मा. आयुक्त (शिक्षण), आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

IMG 20250628 074237
Balpanichya Kavita Sangrh Upkram Link

Leave a Comment

error: Content is protected !!