Bal Vivah Mukt Bharat
Bal Vivah Mukt Bharat
Special campaign under Bal Vivah Mukt Bharat
Bal Vivah Mukt Bharat Portal Link
Bal Vivah Mukt Bharat
क्र. शिसंमा./संकीर्ण / बालविवाह मुक्त भारत अभियान /२०२६ / विद्या शाखा / ए-२/
दिनांक. स्वाक्षरीचे खाली नमूद असलेप्रमाणे
महत्वाचे/कालमर्यादित/ई-मेल व्दारे
विषयः- "बालविवाह मुक्त भारत" अभियानाविषयी जनजागृती करण्याबाबत.
संदर्भ:-१. सचिव, महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र क्र. १३८/२०२०-WW- Part (६), दि. २१.१०.२०२६
२. शासन पत्र क्रमांकः संकीर्ण-२०२६/ई- १९१५७५५/एस.डी.४ दि. ३ नोव्हेंबर, २०२६
उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भाधीन शासन पत्र व सहपत्राची प्रत सोबत पाठविण्यात येत आहे.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, संदर्भ क्रमांक २ च्या शासन पत्रान्वये शासनाने “महिला आणि बाल विकास मंत्रालयाने बालविवाहाची प्रथा समूळ नष्ट करण्यासाठी “संपूर्ण शासन” आणि “संपूर्ण समाज” हा दृष्टिकोन स्वीकारून २७ नोव्हेंबर, २०२४ रोजी “बाल विवाह मुक्त भारत” (BVMB) अभियान सुरू केले. या हानिकारक प्रथेविरुद्ध जनजागृती, सामुदायिक सहभाग आणि समन्वित कृत्ती बळकट करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेला सातत्यपूर्ण गती देण्यासाठी, १०० दिवसाचे ‘बाल विवाह मुक्त भारत’ (BVMB) जनजागृती अभियान दि. २१ ऑक्टोबर ते २१ डिसेंबर, २०२६ या कालावधीत पुन्हा सुरू करण्यात आले आहे. या अभियानास पाठिंबा देण्याची विनंती संदर्भाधीन पत्रान्वये करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने दि. २७ नोव्हेंबर, २०२६ च्या सुमारास राज्यातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांना बालविवाह रोखणे आणि बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे याबाबत वयाला साजेसा जनजागृती उपक्रम राबवण्यासाठी प्रोत्साहित करावे. क्षेत्रीय अधिकारी आणि नागरिकांना देखील “बाल विवाह मुक्त भारत” (BVMB) पोर्टलद्वारे बालविवाह विरोधी प्रतिज्ञा घेण्यासाठी प्रवृत्त करावे. व्यापक प्रसार सुनिश्चित करण्यासाठी “बाल विवाह मुक्त भारत’ (BVMB) अभियानाशी संबंधित सृजनशील साहित्य, चित्रफिती, प्रतिज्ञा साहित्य आणि इतर सबंधित माहिती आपल्या अधिकृत वेबसाइटवर प्रसारित करावी. या अभियांतर्गत प्रतिज्ञा घेण्यासाठी सविस्तर मार्गदर्शिका सुलभ संदर्भासाठी आणि प्रसारासाठी सोबत जोडली आहे.
उपरोक्त निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही करून राज्यातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांना “बाल विवाह मुक्त भारत’ (BVMB) अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक ते निर्देश आपल्या स्तरावरून निर्गमित करावेत व केलेल्या कार्यवाही बाबतचा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा,” असे संचालनालयास सूचित करण्यात आलेले आहे.
त्याअनुषंगाने आपल्या विभागातील/जिल्हयातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांचे मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्या शासन पत्रातील सूचना निदर्शनास आणून “बाल विवाह मुक्त भारत’ (BVMB) अभियान प्रभावीपणे राबविणेबाबत सर्व संबंधितांस आपल्या स्तरावरून सूचित करावे.
Digitally signed by
SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 05-11-2026 18:12:21
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
प्राथमिक शिक्षण संचालनालय
महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत माहितीस्तव :-
१. मा. आयुक्त, (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सविनय सादर.
Digitally signed by
PALKAR MAHESH MADHUKAR Date: 05-11-2026 17:56:07
(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे.
२. श्री. संजय जगताप, कार्यासन अधिकारी, (एस. डी. ४), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
“बाल विवाह मुक्त भारत” शपथ घ्या आणि भारत सरकारचे प्रमाणपत्र प्राप्त करा
Pledge Against Child Marriage
Child marriage is a social evil and a violation of law that hampers girls’ education, protection, health and development, and prevents them from realising their dreams.
Therefore, I pledge to…
Make every possible effort against child marriage.
Ensure that no child marriage takes place in my family, neighbourhood, or community.
Report any attempt of child marriage to the Panchayat and the government authorities.
Raise my voice for the education and safety of all children and I support the creation of a Child Marriage Free Bharat.

बाल विवाह के खिलाफ शपथ
बाल विवाह एक सामाजिक बुराई और कानून का उल्लंघन है, जो बालिकाओं की शिक्षा, सुरक्षा, स्वास्थ्य और विकास में बाधा है, तथा उनके सपनों को साकार होने से रोकता है।
इसलिए, मैं शपथ लेता/ लेती हूँ कि …
मैं बाल विवाह के खिलाफ हर संभव प्रयास करूँगा / करूँगी।
मैं सुनिश्चित करूँगा / करूँगी कि मेरे परिवार, पड़ोस और समुदाय में किसी बालिका का बाल विवाह न हो।
मैं बाल विवाह के किसी भी प्रयास की सूचना पंचायत और सरकार को दूँगा / दूँगी।
मैं सभी बच्चों की शिक्षा और सुरक्षा के लिए भी अपनी आवाज बुलंद करूँगा / करूँगी और बाल विवाह मुक्त भारत का निर्माण करूँगा / करूँगी।

बालविवाहाविरुद्ध प्रतिज्ञा
बालविवाह हा एक सामाजिक दुष्प्रचार आहे आणि कायद्याचे उल्लंघन आहे जो मुलींच्या शिक्षण, संरक्षण, आरोग्य आणि विकासात अडथळा आणतो आणि त्यांना त्यांची स्वप्ने साकार करण्यापासून रोखतो.
म्हणून, मी प्रतिज्ञा करतो की…
बालविवाहाविरुद्ध शक्य तितके प्रयत्न करेन.
माझ्या कुटुंबात, परिसरात किंवा समुदायात बालविवाह होणार नाही याची खात्री करा.
बालविवाहाच्या कोणत्याही प्रयत्नांची पंचायत आणि सरकारी अधिकाऱ्यांना तक्रार करा.
सर्व मुलांच्या शिक्षण आणि सुरक्षिततेसाठी माझा आवाज उठवा आणि मी बालविवाहमुक्त भारताच्या निर्मितीला पाठिंबा देतो.
सर्वांना विनंती आहे की बाल विवाह मुक्त भारत करण्यासाठी….
मा. ना. श्रीमती अन्नपुर्णा देवी, मंत्री महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या स्वाक्षरीचे स्वत:चे नावाचे प्रमाणपत्र मिळवा
मेनु वर क्लिक करा त्यानंतर खाली शेवटी Take Pledge असे नांव येईल त्यावर क्लिक करुन
स्वत:ची माहिती भरावी व सबमिट करावी. त्यानंतर प्रतिज्ञा दिसेल प्रतिज्ञा पुर्ण झाल्यानंतर आपण प्रतिज्ञा वाचली. या बटनवर क्लिक करावे,
त्यानंतर प्रमाणपत्र डाऊनलोड करे या बटनवर क्लिक करुन आपले प्रमाणपत्र डाऊनलोड करावे.
मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी सदरील लिंक वरून बालविवाह मुक्त अभियान संदर्भात प्रमाणपत्र घेऊन सहभाग नोंदवावा
Very good
बालविवाह करणे व त्याला प्रोत्साहन देणे कायद्याने गुन्हा आहे अशी आम्ही आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी पालक सामाजिक घटक यांना विविध माध्यमातून समजून सांगितले आहे.
I agree with you. I want stop this method and mind of people. Girl will have independent , need education for her.
I agree with you.
I agree with you 👍👍
I agree with you
बालविवाह ही ग्रामीण भागात आजही भेडसावणारी मोठी समस्या आहे.
बालविवाह मुक्त भारत करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.
बालविवाह ही ग्रामीण भागात आजही भेडसावणारी मोठी समस्या आहे.
या समस्येची निर्मूलन करण्यासाठी आपण विविध उपायोजना करणे आणि ती अमलात आणि आणि गरजेचे आहे.
त्यासाठी सर्वांनी विविध माध्यमातून जनजागृती करणे गरजेचे आहे.
हा उपक्रम चांगला आहे.
I’m said that, i will not allowed child marriage any conditions.
Good
बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे त्याला वेळीच रोखले गेले पाहिजे
Nice
बालविवाह करणे खरच गुन्हा आहे मी माझ्या परिसरातील गावातील व घरातील बालविवाह विषयी काळजी घेईल कधीच बालविवाह होऊ देणार नाही
बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे
खूप चांगला उपक्रम