Auditing Schools PM Poshan Shakti Nirman Yojana for Period 2020 21 To 2023 24 प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांचे सन २०२०-२१ ते सन २०२३-२४ या कालावधीकरीता लेखा परिक्षण करणे बाबत

Auditing Schools PM Poshan Shakti Nirman Yojana for Period 2020 21 To 2023 24

IMG 20250129 164657
https://eshala.in/auditing-schools-pm-poshan-shakti-nirman-yojana-for-period-2020-21-to-2023-24/

Auditing Schools PM Poshan Shakti Nirman Yojana for Period 2020 21 To 2023 24

IMG 20241228 100457
Auditing Schools PM Poshan Shakti Nirman Yojana for Period 2020 21 To 2023 24

Auditing Schools PM Poshan Shakti Nirman Yojana for Period 2020 21 To 2023 24

Regarding auditing schools under Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana for the period 2020-21 to 2023-24.

विषय : शाळा आणि ब्लॉकद्वारे चुकीचा डेटा सादरीकरणाबाबत.

महोदय,
२६ डिसेंबर २०२४ रोजी, आयुक्त (शिक्षण) यांच्या पत्रासह सर्व जिल्हे, ब्लॉक आणि शाळांसाठी वेबफॉर्म फॉर्मेट जारी करण्यात आले होते. त्या अनुषंगाने, डेटा संकलन प्रक्रिया सुरू आहे. तसेच, डेटा आमच्या वेबसाइटवर ब्लॉक स्तरावरील डेटा एंट्री ऑपरेटरद्वारे भरला जात आहे.

आम्ही विविध जिल्ह्यांमधील अनेक ब्लॉक तपासले आहेत आणि भरलेल्या डेटाच्या अचूकतेचे मूल्यांकन केले आहे. यावेळी असे लक्षात आले आहे की, अनेक वेबफोर्म मध्ये भरलेला डेटा अपूर्ण किंवा चुकीचा आहे. खालीलप्रमाणे काही महत्त्वाच्या अडचणी किंवा तुटी सामान्यपणे अनेक शाळांमध्ये आढळल्या आहेतः
प्रश्न उत्तर

IMG 20250129 163400

IMG 20250129 163428

IMG 20250129 163446

व्यवहार कोणत्या कालावधीचा आहे आणि रक्कम या सर्व गोष्टी व्यवस्थित भरणे आवश्यक आहे.

आम्ही वारंवार विचारलेल्या प्रश्नांची आणि शंका निरसन करणारे एक विस्तृत व्हिडिओ तयार केले आहे, ज्यामुळे शाळांचे पुनरावृत्तीचे काम टाळता येईल. कृपया या व्हिडिओसह ब्लॉक आणि शाळांना आवश्यक ते निर्देश देण्यात यावे हि विनंती.

आशा आहे की, डेटा संकलन प्रक्रिया भविष्यात अधिक कार्यक्षम आणि अचूक होईल. या प्रक्रियेत आपले सहाय्य, समर्थन आणि सहकार्य याबद्दल आम्ही आपले आभार मानतो

CIRCULAR PDF COPY LINK

आपला विश्वासू,

शिंदे चव्हाण गांधी & कंपनी
चार्टर्ड अकाउंटंट्स
for
सीए. अक्षर आंबेकर
भागीदार

Also Read 👇

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांचे सन २०२०-२१ ते सन २०२३-२४ या कालावधीकरीता लेखा परिक्षण करणे बाबत.

महाराष्ट्र शासन
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना

(PIM FOSHAN)

प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, १७, डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे

जा.क्र. प्राशिसं/पीएम पोषण/२०२४/07820

दि. 26 डिसेंबर, २०२४. 26 DEC 2024

प्रति,

१. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका

२. शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद, सर्व

विषय :- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांचे सन २०२०-२१ ते सन २०२३-२४ या कालावधीकरीता लेखा परिक्षण करणे बाबत.

संदर्भ :- शिंदे चव्हाण गांधी अॅन्ड कंपनी, पुणे यांचे सोबत करण्यात आलेला करारनामा दि. १५.१०.२०२४.

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद व प्राथमिक शिक्षण संचालनालयस्तरावरुन शाळांना विविध प्रकारचे अनुदान वितरीत करण्यात येते आहे. शाळांना वितरीत करण्यात आलेल्या अनुदानाचा विनियोग नियमानुसार होणे आवश्यक असते. शाळा, तालुका व जिल्हास्तरावर योजनेची अंमलबजावणी करतांना सन २०२०-२१ ते सन २०२३-२४ या कालावधीत करण्यात आलेल्या खर्चाचे लेखापरिक्षण करणे करीता शिंदे, चव्हाण गांधी अॅन्ड कंपंनी, पुणे या सनदी लेखापाल संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर संस्थेमार्फत सन २०२०-२१ ते सन २०२३-२४ या चार वर्षाच्या कालावधीतील शाळा, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महानगरपालिका यांचेकडील प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेच्या अभिलेख्यांचे लेखा परिक्षण करण्यात येणार आहे. सदरच्या लेखापरिक्षण कार्यवाहीकरीता खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

१. राज्यातील योजनेस पात्र सर्व शाळांचे लेखापरिक्षण करण्यात येणार असल्याने, योजनेस पात्र शाळांना सोबत जोडण्यात आलेला विहित नमुना (वेब फॉर्म) उपलब्ध करुन देण्यात यावा.

२. शाळांनी सदरची माहिती भरतांना शाळेकडील उपलब्ध सर्व अभिलेखांचा आधार घेऊन योग्य, अचूक व वस्तुनिष्ठ माहिती भरावी.

३. सदरची माहिती शाळांनी केवळ एक वेळेस भरावयाची आहे. त्यामुळे माहिती भरतांना योग्य ती दक्षता शाळाप्रमुख/मुख्याध्यापक यांनी घेणे आवश्यक आहे.

४. शाळा, तालुका व जिल्ह्यांना माहिती भरण्याकरीता व आढावा घेण्याकरीता ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्याकरीता तालुका व जिल्ह्यांचे लॉगिन आयडी व पासवर्ड जिल्ह्यांना ५. शाळांनी अचूकपणे विहित नमुना (वेव फॉर्म) यामध्ये भरलेली माहिती सर्व तालुक्यांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या

image 52
Auditing Schools PM Poshan Shakti Nirman Yojana for Period 2020 21 To 2023 24

PM POSHAN MDM INTERNAL AUDIT

या ऑनलाईन पोर्टलवर शाळानिहाय भरावयाची आहे. तसेच शाळांकडून संकलित गाहितीची एक प्रत तालुकास्तरावर जतन करुन ठेवण्यात यावी.

६. सदर संस्थेमार्फत टप्प्याटप्प्याने विविध जिल्ह्यांचे लेखापरिक्षण करण्यात येणार आहे. तालुकानिहाय लेखापरिक्षणाचा कार्यक्रम जिल्ह्यांना कळविण्यात येईल. तेत्रीयरतरावर शाळांकडील अभिलेख्यांचे शाळानिहाय माहितीचा विहित नमुना (वेव फॉर्म) व प्रत्यक्ष अभिलेख्यांची पडताळणी करण्यात येणार आहे.

७. प्रस्तुत लेखापरिक्षणाकरीता शाळांकडून कोणत्याही स्वरुपाची फी (Free Of Cost) आकारण्यात येणार नसल्याने, शाळांनी लेखापरिक्षणाकरीता कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही प्रकारचा मोबदला अथवा फि देण्यात येऊ नये, याबाबत सर्व क्षेत्रीय यंत्रणांना अवगत करण्यात येऊन तशा सूचना सर्व शाळांना देण्यात याव्यात.

८. लेखापरिक्षणाकरीता विहित नमुन्यातील माहिती सर्व शाळांनी देणे अनिवार्य आहे. लेखापरिक्षणास माहिती सादर न करणे अथवा लेखापरिक्षण पडताळणी दरम्यान अभिलेखे सादर न करणा-या शाळाप्रमुखांकडून लेखाविषयक नियमानुसार दंडात्मक तसेच प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी व याबाबत सर्व शाळांना अवगत करुन देण्यात यावे.

९. लेखापरिक्षणाकरीता तालुका व जिल्ह्यांशी आवश्यक समन्वय साधण्याकरीता, तालुका व जिल्हा कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांचे संपर्क क्रमांक संबंधित संस्थेस

या ई- मेलवर त्वरीत कळविण्यात यावेत.

१०. शाळांकडून लेखापरिक्षण नमुना प्रपत्र भरुन घेतांना खालील आवश्यक अभिलेख्यांचा तपशिल खालीलप्रमाणे.

अ. बैंक पासबुक सन २०२०-२१ ते सन २०२३-२४ पर्यंत

आ. सन २०२०-२१ ते सन २०२३-२४ पर्यंतचे कॅशबुकचा तपशिल

इ. सन २०२०-२१ ते सन २०२३-२४ या कालावधीतील तांदुळ साठा नोंदवही इतर धान्यादी माल शिल्लक सन २०२०-२१ ते सन २०२३-२४ या कालावधीतील तांदूळ खर्च विवरण नोंदवही

ई. सन २०२०-२१ ते सन २०२३-२४ या कालावधीत शासन खाती भरणा करण्यात आलेल्या रकमांच्या चलनांच्या छायांकित प्रत

ऊ. सर्व प्रकारचे खर्चाचे व्हॉऊचर्स, उपयोगिता प्रमाणपत्रे, विद्यार्थी आरोग्य तपासणी विवरण

ऊ. याव्यतिरिक्त लेखापरिक्षण नमुना प्रपत्राच्या अनुषंगाने इतर आवश्यक अभिलेखे व विहित नमुन्यातील हस्तलिखित भरलेला नमुना (Hard copy of web form)

११. लेखापरिक्षणाकरीता निर्गमित करण्यात आलेल्या नमुन्यातील माहिती शाळांकडून संकलित करुन वेबसाईटवर भरणेची सुविधा तालुक्यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तालुक्यांनी उपलब्ध करुन दिलेल्या लॉगिनवरुन शाळानिहाय माहिती अद्यावत करावयाची आहे.

१२. जिल्ह्यांनी तालुक्यांच्या लेखापरिक्षणा विषयक कामकाजाचा नियमितपणे आढावा घेऊन सर्व शाळांची माहिती भरणेबाबत योग्य ते नियोजन करावे तसेच याबाबत सर्व तालुक्यांना आवश्यत ती दक्षता घेण्याच्या सूचना निर्गमित कराव्यात. जिल्ह्यातील सर्व शाळांचे लेखापरिक्षण होण्याच्या दृष्टिने योग्य ते नियोजन करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची राहील.

१३. जिल्ह्यातील ज्या शाळा लेखापरिक्षणास उपस्थित राहणार नाहीत अथवा अभिलेखे सादर करणार नाहीत, अशा शाळांवर दंडात्मक तसेच प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, याबाबतचे गांभीर्य सर्व क्षेत्रीय कार्यालयांना अवगत करुन देण्यात यावेत.

उक्त निर्देश शालेय पोषण आहार योजनेचा लाभ मिळणा-या सर्व शाळा, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपालिका यांना लागू राहतील.

Circular pdf Copy Link

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे

image 53
Auditing Schools PM Poshan Shakti Nirman Yojana for Period 2020 21 To 2023 24

विषय: प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत सन २०२०-२१ ते २०२३-२४ या कालावधीतील अंतर्गत लेखा परिक्षण करणे बाबत..
संदर्भ :-
१. शिंदे चव्हाण गांधी अॅड कंपनी, पुणे व शिक्षण संचालक (प्राथ.) यांचेमधील करारनामा दि. १५.१०.२०२४.
२. आमच्या संस्थेस देण्यात आलेला कार्यादेश क्रमांकः ०६७१३ दि. १५.१०.२०२४.
माननिय महोदय,
आमच्या, शिंदे चव्हाण गांधी अॅड कंपनी, पुणे या संस्थेस राज्यातील महत्वाकांक्षी अशा प्रधानमंत्री पोषण शक्ति निर्माण योजनेसाठी अंतर्गत लेखा परीक्षक म्हणून २०२०-२१ ते २०२३-२४ या कालावधीसाठी निवड करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर, यापूर्वी देखील आमच्या संस्थेने सन २०१५-१६ ते २०१९-२० या मागील कालावधीकरीता देखील अंतर्गत लेखा परीक्षक म्हणून सेवा प्रदान केल्या आहेत. सदरच्या लेखा परिक्षणामुळे शाळांच्या अभिलेखांमध्ये महत्वपूर्ण सुधारणा झालेल्या असून अनेक वर्तमानपत्रामधून देखील सदरच्या उत्कृष्ट कामाची दखल घेण्यात आलेली आहे.
शाळास्तरावर विद्यार्थ्यांना गरम ताजा तसेच पौष्टिक आहार उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तथापि सदरचा आहार पोषणमूल्य युक्त तसेच आवश्यक मानकांची पूर्तता करीत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. याबरोबरच शाळांनी शाळास्तरावर जतन करुन ठेवलेले विविध लेखाविषयक अभिलेखे नियमानुसार, आवश्यक मार्गदर्शक तत्वाचे पालन करुन जमा व खर्च केल्याबाबतची पडताळणी करणे आवश्यक आहे. ह्या सर्व बाबी योग्य दस्तऐवजीकरण, पारदर्शकता, जबाबदारी आणि वितरीत निधीच्या योग्य व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत.
तालुकास्तरावर आमच्या संस्थेमार्फत संबंधित तालुक्याकरीता एकत्रितपणे योजनेस पात्र सर्व शाळांची अभिलेखे पडताळणी करून शाळांकडील साठा नोंदवही, किर्द बुक (Cash Book), जमा-खर्च ताळमेळ, बैंक पासबुक, व्हॉऊचर्स, शासन खाती भरणा केलेल्या रकमा इत्यादी अभिलेखांची पडताळणी करुन शाळांना लेखाविषयक आवश्यक मार्गदर्शन करण्यात येईल. याकरीता शाळांना लेखा परिक्षणाकरीता तयार करण्यात आलेल्या विहित नमुना (वेब फॉर्म) यामध्ये सर्व आवश्यक माहितीची नोंद करतील व त्याची प्रत्यक्ष अभिलेख्यांच्या आधारावर तपासणी केली जाईल.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना अंतर्गत शाळेच्या पातळीवरील लेखापरिक्षणाचा दृष्टिकोन विविध महत्त्वाच्या बार्थीवर आधारित आहे. यामध्ये आर्थिक व्यवस्थापनाचा आढावा घेणे, सर्व जमा व खर्च आणि वितरित रक्कमांचे योग्य प्रकारे नोंदी केल्या आहेत किंवा नाही यीच पडताळणी केली जाईल आणि वितरीत निधी योजनेच्या मार्गदर्शक कार्यप्रणालीनुसार वापरला गेला किंवा नाही याची खात्री केली जाईल. याव्यतिरिक्त, केंद्र आणि राज्य सरकारांच्या निर्देशांचे पालन क्षेत्रीय स्तरावर कशा पध्दतीने होते ते तपासले जाईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना निर्धारित योग्य गुणवत्तेचा आहार पुरवठा होत असल्याची खात्री केली जाईल. शाळास्तरावरील तांदुळ व धान्यादी मालाचा पुरवठा आणि मागणी याचा देखील राखोल आढावा घेतला जाईल, जेणेकरून योग्य वेळेस सर्व शाळांपर्यत मुझ
पोहोच होत असल्याची सुनिश्चितता केली जाईल. सर्व लेखापरिक्षण प्रक्रिया प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण भोजना क्षेत्रीय स्तरावर कार्यक्षमतेने आणि पारदर्शकतेने राबवली जात आहे याची खात्री करण्यासाठी अत्यंत महसुआहे.
वेब मॅन्युअल फॉर्म आणि पोर्टलवरील माहिती अचूकपणे आणि योग्य प्रकारे भरणे, तसेच सर्व माहिती योग्य ठिकाणी भरली जात आहे याची खात्री करणे ही शाळांची जबाबदारी असेल. याकरीता कृपया blockmahamdmscgc वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती भरावी. तसेच ऑडिट प्रक्रियेसाठी, चेकलिस्ट, यूजर मॅन्युअल आणि मार्गदर्शक व्हिडिओ या पत्रासोबत संलग्न केलेले आहेत. जर याकरीता आणखी काही मदतीची आवश्यकता असल्यास, कृपया आमच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. (मोबाईल क्रमांकः ९२७०१०१७८३; ९२०९९७७८९५; ८०८०७३२८८६).
वरील विवेचनाद्वारे आम्ही प्रकर्षाने आपल्या निदर्शनास आणू इच्छितो कि, सदर लेखापरीक्षणाचा मोबदला प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत अदा करण्यात येणार असल्यामुळे लेखापरिक्षणाकरीता शाळा स्तरावर कुठल्याही प्रकारची पैशाची देवाण घेवाण होऊ नये याची आवश्यक ती काळजी संस्थेमार्फत घेण्यात येईल तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ प्रमाणे अशी देवाण घेवाण कायदेशीर गुन्हा समजला जाऊ शकतो. या धोरणाचे कठोर पालन ऑडिट प्रक्रियेच्या निष्कलंकतेला कायम ठेवण्यासाठी आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे आहे.
आम्ही ऑडिट प्रक्रियेदरम्यान आपल्या संपूर्ण सहकार्याची आणि आपणाकडून जिल्हा कार्यालयासोबत समन्वयाची अपेक्षा करतो. आपल्या सहयोगामुळे लेखा परिक्षण प्रक्रिया सुरळीत आणि यशस्वीपणे पार पडेल. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेचे लेखा परिक्षण उत्तम व कार्यक्षम पध्दतीने होऊन त्याद्वारे सकारात्मक परिणाम प्राप्त करण्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा करतो.

प्रपत्र- अ
PRADHAN MANTRI POSHAN SHAKTI NIRMAN (MID DAY MEAL SCHEME) AUDIT AND RECONCILIATION

image 54
Auditing Schools PM Poshan Shakti Nirman Yojana for Period 2020 21 To 2023 24

Also Read

1 thought on “Auditing Schools PM Poshan Shakti Nirman Yojana for Period 2020 21 To 2023 24 प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांचे सन २०२०-२१ ते सन २०२३-२४ या कालावधीकरीता लेखा परिक्षण करणे बाबत”

Leave a Comment

error: Content is protected !!