Anudanit Shala Shikshaketar Karmchri Akrutibandh Circular

Khajagi Anudanit Madyamik Uchha Madyamik Shikshaketar Karmchri Akrutibandh Circular

Shikshaketar Karmchari AakrutiBandha Circular

Privately Aided Partially Aided Secondary Higher Secondary Non-Teaching Staff Profile

image 2

महाराष्ट्र शासन

शिक्षण संचालनालय

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)

महाराष्ट्र राज्य, मध्यवनी इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग,

पुणे

क्र. : शिसंगा-२०२४/शिक्षकेतर/न्याप्र.५०५८/२१/टी-४/1179

प्रति,

दिनांक : २२.०२.२०२४.

01 MAR 2024

१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व)

३) शिक्षण निरीक्षक (दक्षिण/उत्तर/पश्चिम), मुंबई.

विषय : शिक्षकेतर कर्मचा-यांच्या आकृतीबंधानुसार करावयाच्या कार्यवाहीबावत. संदर्भ : शासन पत्र क्र.न्यायाप्र/२०२३/प्र.क्र.३०/टिएनटी-२, दि.२१.२.२०२४ चे ई-मेल वरील प्राप्त पत्र.

उपरोक्त विषयावरील संदर्भाधीन पत्राची प्रत सोबत जोडली आहे. सदर पत्रान्वये विषयांकित प्रकरणी खालील वस्तुस्थिती नमूद करण्यात आलेली आहे.

 खाजगी अनुदानित माध्य उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचा-यांच्या आकृतीबंध

राज्यातील सर्व खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचा- यांसाठी शासन निर्णय दि.२८.१.२०१९ नुसार सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार व्यपगत होणारी पदे, अतिरिक्त ठरणारी पदे, त्या पदावरील कार्यरत कर्मचारी यांच्यासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात दि.७.३.२०१९ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कार्यपध्दतीस मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल झालेल्या रिट याचिका क्र.८००७/२०२१ व क्र.५०५८/२०२१ मध्ये मा.न्यायालयाने दि.६.९.२०२१ रोजीच्या आदेशान्वये अंतरिम स्थगिती दिली होती.

अधिक माहितीसाठी दिनांक २१ फेबुवारी २०२४ चे परिपत्रक वाचाल त्या साठी या ओळीला स्पर्श करा

दाखल रिट याचिकेत मा. न्यायालयाने दिलेले अंतरिम स्थगिती आदेश रद्द करण्यासाठी शासनाच्या वतीने मा. उच्च न्यायालयात अंतरिम अर्ज क्र. स्टॅम्प. १६३३७/२०२३ दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने प्रकरणी दि.६.२.२०२४ रोजी झालेल्या सुनावणीमध्ये प्रस्तुत प्रकरणी दाखल झालेल्या सर्व रिट याचिका व सर्व अंतरिम अर्ज निकाली काढले असल्याचे मा. न्यायालयाने आदेश दिले आहेत.

मा. न्यायालयाचे उपरोक्त निर्देश विचारात घेऊन प्रकरणी शासनाच्या दि.२८.१.२०१९ च्या आकृतीबंधानुसार व दि.७.३.२०१९ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कार्यपध्दतीनुसार खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकेतर पदांच्या संचमान्यता व त्या अनुषंगाने इतर आवश्यक ती कार्यवाही तात्काळ सुरु करण्याचे निर्देश संदर्भाधीन शासन पत्रानुसार देण्यात आले आहेत.

(संपत सुर्यवंशी)

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)

महाराष्ट्र राज्य,

पुणे-१.

प्रत : मा.आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, म.रा. पुणे-१ यांना संदर्भाधीन शासन पत्रास अनुसरुन माहितीस्तव सविनय सादर.

प्रत : कक्ष अधिकारी (टिएनटी-२), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ यांना संदर्भाधीन शासन पत्रास अनुसरुन माहितीस्तव अग्रेषित.

Leave a Comment

error: Content is protected !!