Allowed to Pay Medical Bills Online
Allowed to Pay Medical Bills Online
Allowed to Pay Medical Bills Online TAB open
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे
क्र.शिसंमा/२०२४/टि-७/शालार्थ/वे. दे/ ८८०५
दिनांक :- /२ १/२०२४.
प्रति,
१) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिप. सर्व
२) अधीक्षक, वेतन व भनिनि पथक (माध्यमिक) सर्व.
02 JAN 2025
विषय- सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात वैद्यकीय देयके ऑनलाईन अदा करण्याची परवानगी देणेबाबत.
संदर्भ- १) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमापू/शिक्षक-शिक्षकेतर/टि-५/२४-२५/३०४१ दि. १२.६.२०२४.
२) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२४/टि-७/शालार्थ/वे. दे/४५५६ दि. २३/८/२०२४.
३) अधीक्षक, वेतन व भनिनी पथक, (माध्यमिक) अहमदनगर यांचे पत्र क्र. शिअवेभनिनिप/वेदय, देयके/९०५/२०२४ दि. २/१२/२०२४.
उपरोक्त विषयी संदर्भ क्र. २ अन्वये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात दि. ३०/९/२०२४ अखेर पर्यंतची वैद्यकीय देयके शालार्थ प्रणालीमधून ऑनलाईन काढण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.
हेही वाचाल मेडिकल बिल काढण्यास परवानगी शालार्थ टॅब ओपन
तथापि दि. ३०/९/२०२४ नंतर ऑनलाईन वैद्यकीय देयके वेतन पथक (माध्यमिक) कार्यालयास प्राप्त झाली असून नियमित वेतन झाल्यानंतर अनुदान शिल्लक असल्याने शिल्लक अनुदानामधून वैद्यकीय देयके अदा करण्यासाठी परवानगी मिळणेबाबत क्षेत्रिय कार्यालयाकडून मागणी करण्यात येत आहे.
मेडिकल बिल संपूर्ण प्रस्ताव पीडीएफ
त्यानुसार सन २०२४-२५ या आधिक वर्षात मंजूर अनुदान व जिल्हयाचा संभाव्य खर्च विचारात घेता लेखाशीर्ष २२०२०४४२, २२०२०४७८, २२०२०४६९, २२०२०५५८, २२०२०५७६, २२०२१९०१ २२०२एच९७३ मध्ये वैद्यकीय देयके बीम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून ऑनलाईन अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदरची वैद्यकीय देयके आपल्या कार्यालयास प्राप्त आवक क्रमांकानुसार तसंच शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार व नियमाप्रमाणे अदा करावी.
ALSO READ – MEDICAL BILLS AMOUNT EXEMPT IN INCOME TAX
उपरोक्त वैद्यकीय देयके अदा करताना नियमित वेतनासाठी अनुदान कमी पडणार नाही याची खात्री करूनच संबंधित शिक्षणाधिकारी व अधीक्षक, वेतन पथक यांनी देयके अदा करावीत. सन २०२४-२५ मध्ये ऑनलाईन प्रशासकीय मान्यता मिळालेली थकीत देयके अनुदान उपलब्धतेनुसार अदा करण्यात यावी.
Circular pdf Copy Link
(संपप्त सुर्यवंशी)’ शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रत माहितीस्तव सविनय सादर.
१. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-१
प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी.
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२) जिल्हा कोषागार अधिकारी, सर्व
प्रत- श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ सिस्टीम, महाआयटी, मुंबई. यांना फळविण्यात येते की, उपरोक्त प्रमाणे नमूद लेखाशीर्षासाठी सन २०२४-२५ मध्ये वैद्यकीय देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी शालार्थमध्ये टॅब उपलब्ध करून देण्यात यावा. व इतर देयके शालार्थमधून अदा होणार नाही याची दक्षता घ्यावी.