Adhikari Karmchari Karymulymapan Ahval अधिकारी कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबत

Adhikari Karmchari Karymulymapan Ahval

IMG 20241126 201149
Adhikari Karmchari Karymulymapan Ahval

Adhikari Karmchari Karymulymapan Ahval

Regarding taking action for writing performance appraisal report of Government Officers Employees

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही करणेबाबत.

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक सीएफआर १२२०/प्र.क्र. १९९/आस्थामं (१३), मंत्रालय, मुंबई

दिनांक : २६ नोव्हेंबर, २०२४.

वाचा : समक्रमांकाचे दिनांक १७ नोव्हेंबर, २०२२ चे परिपत्रक

शासन परिपत्रक

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे दरवर्षी कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही दिनांक ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात यावी याबाबतची सूचना शासन परिपत्रक दिनांक १७ नोव्हेंबर, २०२२ च्या परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत.

२. महापार हे संकेत स्थळ आतापर्यंत सर्व Internet वर उपलब्ध होत होते. तथापि, दिनांक १ ऑगस्ट, २०२४ पासून सदर संकेतस्थळ केवळ NICNet किंवा State Wide Area Network (SWAN-DIT) या Internet वर उपलब्ध आहे, अशा सूचना NIC, Data Centre, Delhi यांच्याकडून प्राप्त झाल्या आहेत. सदर सुविधा NIC केवळ WebVPN द्वारा उपलब्ध करुन देणार आहे. WebVPN ही सुविधा बहुतांशी अधिकारी/कर्मचारी यांना उपलब्ध झाली नसल्याने ३७% PAR महापार संगणक प्रणालीत अद्यापही प्रलंबित आहेत.

महापारमध्ये कार्यमूल्यमापन अहवाल भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचर्णीमुळे [विशेषतः WebVPN ही सुविधा काही अधिकारी/कर्मचारी (Users of MahaPAR) यांना उपलब्ध झाली नसल्याने कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी १ महिन्याची म्हणजेच दिनांक ३१ जानेवारी, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर मुदतवाढ अंतिम असेल.

३. महापारमध्ये समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत सन २०२३-२४ या वर्षाचे गोपनीय अहवाल दिनांक ३१ जानेवारी, २०२५ रोजी महापार प्रणालीत बंद करण्यात येतील.

४. वर नमूद केलेल्या वेळेत ही सर्व कार्यवाही केली जाईल याची जबाबदारी संबंधित आस्थापना अधिकारी/संस्करण अधिकारी यांची राहील.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या 🌐👉www.maharashtra.gov.in 👈या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेताक २०२४११२६१६०६४५७९०७ असा आहे.

हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

🌐👉परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा👈

Circular pdf Copy LINK

सह सचिव, महाराष्ट्र शासन

Leave a Comment

error: Content is protected !!