Additional Salary Increment To M A Marathi Employees एम ए मराठी केलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा निर्णय लागू करण्याचे निर्देश दिले

Additional Salary Increment To M A Marathi Employees

IMG 20250227 200222
Additional Salary Increment To M A Marathi Employees

Additional Salary Increment To M A Marathi Employees

Decision to further give additional salary hike to employees who have completed MA in Marathi language

Decision to give additional salary increase to employees who have done MA Marathi

Decision to give additional increment to employees

ठाणे महानगरपालिका, ठाणे

जा.क्र.ठामपा/मुख्या-१/कावि-०८/५३६९

दिनांक २७.०२.२०२५

          आदेश

विषयः-ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी / कर्मचारी यांना एम.ए (मराठी) पदव्युत्तर पदवीबाबत.

संदर्भ :-
१. प्रशासकीय ठराव क्र. ५९८ दि.१८.०२.२०२५
२. कार्यालयीन आदेश क्र. ठामपा / अतिआ (२) आस्था/५३०२ दि.२४.०२.२०२५.

संदर्भ क्र. १ वरील प्रशासकीय ठरावानुसार ठाणे महानगरपालिकेचे जे अधिकारी, कर्मचारी एम.ए (मराठी) पदव्युत्तर पदवी प्राप्त करतील, अशा अधिकारी, कर्मचारी यांना यापूर्वीच्या निर्णयानुसार देण्यात येत असलेल्या दोन अतिरिक्त वेतनवाढी न देण्याचे संदर्भ क्र.२ च्या आदेशामध्ये नमूद होते.

IMG 20250301 102807
Additional Salary Increment To M A Marathi Employees

तथापि, यानुसार सुधारित आदेश निर्गमित करण्यात येत असून, ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील जे अधिकारी, कर्मचारी प्रशासनाची पूर्व परवानगी घेऊन एम.ए (मराठी) पदव्युत्तर पदवी प्राप्त करतील अशा अधिकारी, कर्मचारी यांना एम.ए (मराठी) पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केल्याच्या दिनांकापासून अतिरिक्त दोन वेतनवाढीची कार्यवाही तुर्तात सुरु ठेवण्यात यावी.

IMG 20250301 102819
Additional Salary Increment To M A Marathi Employees

परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा

अतिरिक्त आयुक्त (२) ठाणे महानगरपालिका, ठाणे

मा.आयुक्त सो. यांचे मान्यतेने

प्रतः मा. आयुक्त सो. यांसकडे माहितीसाठी सविनय सादर.

प्रत :-१. अतिरिक्त आयुक्त (१) कार्यालय
३. विभाग प्रमुख (सर्व)
५. मुख्य लेखा व वित्त अधिकारी
७. उप आयुक्त (सर्व)
९. कार्मिक अधिकारी
११. आस्थापना प्रभारी (सर्व प्रभाग)
२. अतिरिक्त आयुक्त (२) कार्यालय
४. मुख्य लेखापरिक्षक
६. उप आयुक्त (मुख्यालय)
८. सहाय्यक आयुक्त (सर्व)
१०. आस्थापना अधीक्षक
१२. मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी.. संकेतस्थळावर प्रसिध्दीसाठी

मराठी भाषेतून एम ए चे शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा निर्णय

एम ए मराठी केलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा निर्णय लागू करण्याचे निर्देश दिले.

मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला मराठी भाषेची गळपेची काढणारे परिपत्रक ठाणे महानगर पालिकेने काढले होते. मराठी भाषेतून एम एचे शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला होता. मात्र मनसेचे आंदोलन आणि समाज माध्यमांवरील वाढत्या दबावाने पालिका प्रशासन झुकले असून उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पालिका आयुक्तांना निर्णय रद्द करण्यास सांगून एमए केलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा निर्णय लागू करण्याचे निर्देश दिले.

Leave a Comment

error: Content is protected !!