Action Against TET Ineligible Teachers

Action against ‘TET’ ineligible teachers?
‘टीईटी’ अपात्र शिक्षकांवर कारवाई ?
आमदार बंब यांनी मागवली राज्यभरातील माहिती
जा.क्र.जिपछसं/शिक्षण/प्रावि-3/2024-25/1482/1590
दिनांक :-24.02.2024
प्रति,
मुख्याध्यापक (सर्व)
अनुदानित / अंशतः अनुदानित/ विनाअनुदानित खाजगी प्राथमिक शाळा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा
विषय :- शासन नियमानुसार TET परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची माहिती मिळणेबाबत.
संदर्भ :- मा. श्री. प्रशांत बन्सीलाल बंब, सदस्य, महाराष्ट्र विधानसभा यांचे पत्र क्र/कार्य/विका/छसं/ 21862 व 21854 दिनांक 19.02.2025.
उपरोक्त विषयी मा. प्रशांत बन्सीलाल बंब, सदस्य, महाराष्ट्र विधानसभा यांनी खाजगी संस्थेतंर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण शिक्षकांची माहिती मागीतलेली आहे. सोबत याबाबतचा नमुना देण्यात येत आहे. सदर माहिती दिनांक 28.02.2025 पर्यंत अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक) छत्रपती संभाजीनगर यांचेकडे सादर करण्यात यावी.
सोबत :- प्रपत्र.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर
प्रतिलीपी-
अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक) छत्रपती संभाजीनगर यांना कळविण्यात येते की, उपरोक्त प्रमाणे माहिती संकलित करुन प्रावि-3 शाखेकडे सादर करावी.
महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या, ‘टीईटी’ परीक्षा न दिलेल्या शिक्षकांची तातडीने माहिती देण्याचा आदेश दिला आहे. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहून संबंधित शिक्षकांची यादी मागवली आहे.
शासकीय शाळांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षेतून (टीईटी) दरवर्षी भरती केली जाते. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षक म्हणून पात्र होण्यासाठी ही परीक्षा म्हणजे किमान पात्रता मानली
”गुणवत्तेवर परिणाम राज्यातील शाळांमध्ये अशा अपात्र शिक्षकांकडून अध्यापनाचे काम सुरू राहिल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील नियमानुसार, पात्रता परीक्षा न उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.”
जाते. राज्यात १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी ‘टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाने २४ ऑगस्ट २०१८ रोजी काढलेल्या निर्णयानुसार, या कालावधीत नियुक्त झालेल्या शिक्षकांनी ३० मार्च २०१९
पर्यंत ‘टीईटी’ उत्तीर्ण करणे आवश्यक होते. मात्र, राज्यातील अनेक शिक्षक आजही पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर प्रशांत बंब यांनी राज्यातील सर्व शाळांमधील ‘टीईटी’ परीक्षा न दिलेल्या शिक्षकांची यादी शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागवली आहे.