Action Against officers employees benefited from of Mukhymantri MAZI LADKI BAHIN YOJANA

Action Against officers employees benefited from of Mukhymantri MAZI LADKI BAHIN YOJANA

Regarding taking necessary action under the Maharashtra Civil Service Rules against the officers/employees who have benefited from the scheme as per the ineligibility conditions of the “Chief Minister’s Beloved Sister” scheme

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई – ४०० ००१

क्र.संकीर्ण-२०२५/प्र.क्र. ४६७/आस्था-७

दिनांक :- १८ ऑगस्ट, २०२५

प्रति,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद (सर्व)

विषय:-“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी/कर्मचारीऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमातंर्गत आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत.

संदर्भ:- महिला व बाल विकास विभागाचे पत्र क्र. मबावि २०२४/प्र.क्र. १५७/का.०२, दि. २९.०७.२०२५

महोदय,

सोबत जोडलेल्या संदर्भाकीत पत्राचे कृपया अवलोकन व्हावे.

२. माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या (DATA) अनुषंगाने जिल्हा परिषदांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेतला असलेल्या कार्यरत अधिकारी/कर्मचाऱ्यांची यादी महिला व बाल विकास विभागाने संदर्भाधीन पत्रान्वये पाठविली आहे. सदर योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार सदर अधिकारी/कर्मचारी पात्र नसताना सुध्दा या योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेवून शासनाची दिशाभूल केल्याची बाब विचारात घेऊन संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमातंर्गत आवश्यक ती कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल सादर करणेबाबत कळविले आहे.

३. सदर पत्रासोबत महिला व बाल विकास विभागाने पाठविलेल्या यादीमध्ये एकूण ११८३ नावे समाविष्ट आहेत. सदरचे अधिकारी/कर्मचारी जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत आहेत. जिल्हा परिषदा स्वयत्त संस्था असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे नियुक्ती तथा शिस्तभंग विषयक प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आहेत. त्यामुळे विषयांकीत प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियमातंर्गत आवश्यक ती कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल महिला व बाल विकास विभागास उपलब्ध करुन द्यावी व त्याची प्रत ग्राम विकास विभागास उपलब्ध करुन द्यावी.

शासन परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा

आपला,

(नितीन स. पवार) कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत- १. उप सचिव (का. ०२), महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

(यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी/कर्मचारीऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमातंर्गत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हा परिषदांकडून परस्पर प्राप्त करुन घ्यावा.)

२. निवडनस्ती- आस्था ७

IMG 20250818 223956
Action Against officers employees benefited from of Mukhymantri MAZI LADKI BAHIN YOJANA

Leave a Comment

error: Content is protected !!