Aajcha Shaley Paripath
Aajcha Shaley Paripath
आजचा शालेय परिपाठ
Aajcha Shaley Paripath
Today’s school environment / context
२३/०६/२५ सोमवारचा परीपाठ
🇮🇳 राष्ट्रगीत
🚩 राज्यगीत
🇮🇳 प्रतिज्ञा
🇪🇺 संविधान
👏🏻 प्रार्थना
आजचे पंचाग
मास : ज्येष्ठ, पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : त्रयोदशी , नक्षत्र : कृत्तिका,
सूर्योदय : सकाळी ०६.०२
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१८
सुविचार
संकटे तुमच्यातील जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
म्हण व अर्थ
म्हण : इच्छा परा ते येई घरा.
अर्थ : आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे.
२३ जून दिनविशेष
हा वर्षातील १७४ वा दिवस आहे.
जागतिक ऑलिम्पिक दिवस
आंतरराष्ट्रीय विधवा दिन
संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन
टाइपरायटिंग दिवस
महत्त्वाच्या घटना
१७५७ : प्लासीची लढाई : ‘पलाशी’ येथे रॉबर्ट क्लाईवच्या ३,००० सैन्याने सिराज उद्दौलाच्या ५०,००० सैन्याचा फितुरी करवून पराभव केला.
१९२७ : भारतीय नभोवाणी मुंबई येथे सुरु.
१९६० : अमेरिका आणि जापान देशांमध्ये सुरक्षा संबंधी समझोता करण्यात आला.
१९६९ : आय.बी.एम. ने जाहीर केले की जानेवारी १९९७ पासून सॉफ्टवेअर आणि इतर सेवांची किंमत वेगवेगळी होईल त्यामुळे आधुनिक सॉफ्टवेअर उद्योग सुरु झाला.
१९७९ : इंग्लंडला ९२ धावांनी हरवून वेस्ट इंडिजने दुसरा क्रिकेट विश्वकरंडक जिंकला.
जन्मदिवस / जयंती
१९०१ : राजेन्द्र नाथ लाहिरी क्रांतिकारक. (मृत्यू : १७ डिसेंबर १९२७)
१९०६ : वीर विक्रम शाह ‘त्रिभुवन’ नेपाळचे राजे (मृत्यू : १३ मार्च १९५५)
१९३४ : राष्ट्रीय एकात्मतासाठी इंदिरा गांधी पुरस्कार, गांधी पीस पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय गांधीवादी पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते तसचं, दशोली ग्राम स्वराज्य संघाचे संस्थापक चंडीप्रसाद भट्ट यांचा जन्मदिन.
१९३४ : प्रसिद्ध भारतीय राजकारणी, व हिमाचल प्रदेशाचे माजी (४थे) मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा जन्मदिन.
१९३५ : मराठी लेखक राम कोलारकर यांचा जन्म.
१९४२ : दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा जन्म.
१९४८ : नबरुण भट्टाचार्य भारतीय पत्रकार आणि लेखक. (मृत्यू : ३१ जुलै २०१४)
१९५२ : राज बब्बर, भारतीय चित्रपट अभिनेते, राजकीय नेते
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन
१७६१ : बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे यांचे निधन. (जन्म : ८ डिसेंबर १७२१)
१९१४ : भारतीय गुरु आणि तत्वज्ञ भक्तिविनाडो ठाकूर यांचे निधन. (जन्म : २ सप्टेंबर १८३८)
१९३९ : आधुनिक बालशिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते गिजुभाई बधेका यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १८८५ – चितल, अमरेली, गुजराथ)
१९५३ : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे संस्थापक, अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ.
१९७५ : जनरल प्राणनाथ थापर, भारताचे भूसेनाप्रमुख. (जन्म : २३ मे १९०६)
१९८० : भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न व्ही. व्ही. गिरी यांचे निधन. (जन्म : १० ऑगस्ट १८९४)
१९८० : संजय गांधी, भारतीय राजकारणी. (जन्म: १४ डिसेंबर १९४६)
१९९४ : नाटककार, साहित्यिक वसंतशांताराम देसाई यांचे निधन.
१९९५ : पोलिओची लस शोधणारे शास्त्रज्ञ डॉ. जोनस सॉक यांचे निधन.
२००५ : साहित्यिक डॉ. हे. वि. इनामदार यांचे निधन.
देशभक्ती गीत
जय भारता..
जय भारता, जय भारता,
जय भारती जनदेवता…
जय लोकनायक थोर ते,
जय क्रांतिकारक वीर ते
जय भक्त ते, रणधीर ते,
जय आमुची स्वाधीनता
जय भारता, जय भारता १
तेजोनिधी हे भास्करा,
प्रिय पर्वता, प्रिय सागरा
तरूवृंद हो, हे अंबरा,
परते पहा परतंत्रता
जय भारता, जय भारता २
बलिदान जे रणि जाहले,
यज्ञात जे धन अर्पिले
शतकात जे हृदयी फुले
उदयाचली हो सांगता
जय भारता, जय भारता ३
ध्वज नीलमंडल हो उभा,
गतकाल हा वितरी प्रभा
भवितव्य हे उजळी नभा,
दलितांस हा नित् तारता
जय भारता, जय भारता ४
बोधकथा
सवयीचा गुलाम… पोपट
एका माणसाने त्याच्या घरी एक पोपट पाळला होता. पिंजऱ्यात ठेवलेल्या पोपटाला चांगले खायला प्यायला मिळत असे व पोपट बोलका असल्याने घरातील लोकांकडून त्याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्य दाटून येई. अखेर एके दिवशी पोपटाला संधी चालून आली. त्या माणसाने पोपटाला खाणे देण्यासाठी पिंजऱ्याचे दार उघडले होते व नंतर मात्र त्याच्या हातून दार उघडे राहिले होते. त्या माणसाला अचानक काही काम आल्याने तो पिंजऱ्याचे दार उघडे टाकून निघून गेला. दार उघडेच म्हणून पोपट पिंजऱ्याच्या बाहेर निघून गेला.
पण लहानपणापासूनच पिंजऱ्यात राहिला असल्याने त्याला फारसे नीट उडताच येत नव्हते. एका झाडावर गेला असता त्याला इतर पोपटांशी बोलता येईना, कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्याने त्याला पोपटांची भाषा येत नव्हती म्हणून इतर पोपटही त्याला सहकारी मानत नव्हते. पिंजऱ्यात आयते खायची सवय असल्याने त्याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले. पोपटाला ऊनवारा पाऊस यांची कधीच सवय नसल्याने तो आजारी पडला व मरून गेला.
तात्पर्य : जास्त काळ पारतंत्र्यात (गुलामगिरीत) राहिल्याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते.
सामान्य ज्ञान
१) भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे ?
उत्तर : हिंदी
२) भारताची राष्ट्रलिपी कोणती ?
उत्तर : देवनागरी
३) भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ?
उत्तर : आंबा
४) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
उत्तर : हॉकी
थोरव्यक्ती परिचय
राजेंद्र नाथ लाहिरी
भारतीय क्रांतिकारक
[२९ जून १८९२ – १७ डिसेंबर १९२७]
राजेंद्र नाथ लाहिरी यांना फक्त राजेंद्र लाहिरी म्हणून ओळखले जाते, ते एक भारतीय क्रांतिकारक होते, जे काकोरी कट आणि दक्षिणेश्वर बॉम्बस्फोटामागील सूत्रधार होते. ते हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे सक्रिय सदस्य होते ज्याच्या उद्देशाने ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावले होते.
राजेंद्र नाथ लाहिरी यांचा जन्म १८९२ मध्ये बंगालमधील पबना जिल्ह्यातील मोहनपूर गावात झाला. ते उत्तर प्रदेशातील वाराणसीचे रहिवासी होते, ते श्री क्षितीश मोहन लाहिरी यांचे पुत्र होते. तो एका मोठ्या इस्टेटीचा मालक होता. त्यांनी ब्रिटीश राजवटीविरुद्ध राष्ट्रवादी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेचे ते सदस्य होते. दक्षिणेश्वर बॉम्ब प्रकरणी त्यांना अटक करून तुरुंगवासाची शिक्षा झाली. ९ ऑगस्ट १९२५ रोजी काकोरी मेल डकैतीमध्ये आणि शेरगंज, बिचपुरी आणि मैनपुरी इत्यादी ठिकाणी क्रांतिकारकांच्या छाप्यांमध्ये त्यांनी भाग घेतला आणि त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली. १७ डिसेंबर १९२७ रोजी गोंडा कारागृहात त्यांचा फाशीवर मृत्यू झाला.
संकलन
शरद दत्तराव देशमुख
महाराष्ट्र शासन राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक
Also Read 👇
१४/११/२४ गुरूवारचा परीपाठ
आजचे पंचाग
मास : कार्तिक, पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : त्रयोदशी, नक्षत्र : अश्विनी
अयन : दक्षिणायन, ऋतू : शरदऋतू
सूर्योदय : सकाळी ०६.४१
सूर्यास्त : सायंकाळी ०५.५२
सुविचार
निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते.
म्हण व अर्थ
म्हण : नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने.
अर्थ : दोषयुक्त काम करणाऱ्यांच्या मार्गातच अनेक अडचणी येतात.
१४ नोव्हेंबर दिनविशेष
भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू जयंती
१४ नोव्हेंबर – बाल दिन
हा वर्षातील ३१९ वा दिवस आहे.
महत्त्वाच्या घटना
१६८१ : आजच्याच दिवशी ईस्ट कंपनीने बंगाल ला वेगळे प्रांत बनविण्याची घोषणा केली होती.
१७७० : जेम्स ब्रूस यांनी नाईल नदीचा स्रोत शोधला.
१९६९ : जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना.
१९७१ : मरीनर ९ या अंतराळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.
१९९१ : जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची १९९० च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
२०१३ : सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा (२००वा) कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट ईंडीजविरुद्ध हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात आला.
जन्मदिवस / जयंती
१८८९ : भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म – भारताचे पहिले पंतप्रधान. (मृत्यू : २७ मे १९६४)
१८९१ : बिरबल सहानी – पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष. (मृत्यू : १० एप्रिल १९४९)
१९०७ : हिंदी भाषेचे प्रसिध्द भारतीय साहित्यकार हरिवंशराय बच्चन यांचा जन्म.
१९१८ : रघुवीर मूळगावकर – चित्रकार. (मृत्यू : ३० मार्च १९७६)
१९१९ : अनंत काशिनाथ भालेराव – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक ’मराठवाडा’ चे संपादक, हैदराबाद मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग. (मृत्यू : २६ आक्टोबर १९९१)
१९२४ : रोहिणी भाटे – कथ्थक नर्तिका. (मृत्यू : १० आक्टोबर २००८)
१९७४ : हृषिकेश कानिटकर – भारतीय क्रिकेटपटू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन
१९६७ : सी. के. नायडू – भारतीय क्रिकेटपटू. (जन्म : ३१ आक्टोबर १८९५)
१९७१ : नारायण हरी आपटे – कादंबरीकार, चित्रपट कथालेखक. (जन्म : ११ जुलै १८८९)
१९७७ : अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद – हरेकृष्ण पंथाचे संस्थापक. (जन्म : १ सप्टेंबर १८९६)
१९९३ : डॉ. मणिभाई भीमभाई देसाई – स्वातंत्र्यसैनिक, महात्मा गांधींचे सच्चे अनुयायी, ग्रामीण विकासाचा पाया घालणारे सामाजिक कार्यकर्ते, दुधाचा महापूर योजनेचे एक शिल्पकार. (जन्म : २७ एप्रिल १९२०)
२००० : प्रा. योगेश्वर अभ्यंकर – गीतकार व सर्जनशील कवी. (जन्म : ५ नोव्हेंबर १९२९)
२०१० : भारताचे प्रसिध्द अर्थशास्त्री लक्ष्मीचंद जैन यांचे आजच्याच दिवशी निधन झाले होते.
२०१३ : प्रसिध्द बाल साहित्यकार व संपादक हरिकृष्ण देवसरे यांचा आजच्याच दिवशी मृत्यू झाला होता.
२०१५ : भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक के.ए. गोपालकृष्णन यांचे निधन.
देशभक्ती गीत
जयोस्तुते…
जयोस्तुते श्रीमहन्मंगले। शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती। त्वामहं यशोयुतां वंदे…
राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू, नीति संपदांची स्वतंत्रते भगवती । श्रीमती राज्ञी तू त्यांची परवशतेच्या नभांत तूंची आकाशी होशी स्वतंत्रते भगवती । चांदणी चमचम लखलखशी वंदे त्वामहं यशोयुतां वंदे १
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती । तूच जी विलसतसे लाली तू सूर्याच तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची स्वतंत्रते भगवती । अन्यथा ग्रहण नष्ट तेची वंदे त्वामहं यशोयुतां वंदे २
मोक्ष-मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती स्वतंत्रते भगवती । योगिजन परब्रह्म वदती जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें स्वतंत्रते भगवती । सर्व तव सहचारी होते वंदे त्वामहं यशोयुतां वंदे ३
हे अधम रक्तरंजिते । सुजन पूजिते । श्री स्वतंत्रते तुजसाठि मरण तें जनन तुजविण जनन ते मरण तुज सकल चराचर शरण, चराचर शरण, श्री स्वतंत्रते वंदे त्वामहं यशोयुतां वंदे ४
बोधकथा
लांडगा आला रे आला
एका गावात एक मेंढपाळाचा खोडकर मुलगा होता. तो नेहमी काही तरी खोड्या करत असे आणि लोकांना त्रास देत असे. लोक त्याची अनेकदा तक्रार करत, त्याला रोज आपल्या मेंढ्यांना चरायला नेऊन आणण्याचे काम असे. मेंढ्यांचे चरणे होईपर्यंत त्याला फार कंटाळा येत असे. एक दिवस त्याला कंटाळा घालवण्यासाठी एक विचित्र गंमतीची कल्पना सुचली.
त्याने आरडाओरडा सुरु केला. “लांडगा आला रे आला. वाचवा. माझ्या मेंद्यांना लांडगा खाईल. पळा पळा. लांडगा आला रे आला.” गावातले लोक हातातले काम सोडुन त्याला मदत करायला पळत आले.
तो एका झाडावर बसुन हसत होता. “कसं उल्लु बनवलं. हाहाहा.” त्याची हि नवीन खोडी पाहुन लोक वैतागुन निघुन गेले. काही दिवसांनी त्याने परत तीच गंमत केली. यावेळी तरी खरं असेल असं समजुन पुन्हा लोक पळत आले. पुन्हा तो त्यांची मजा बघत हसत होता. लोक अजुन चिडले आणि चरफडत परत निघुन गेले. काही दिवसांनी तो मेंढ्यांना घेऊन कुरणात गेलेला असताना मात्र खरंच लांडगा आला.
लांडग्याने मेंढ्यांवर हल्ला केला. आता मुलगा जिवाच्या आकांताने ओरडायला लागला. त्याच्या एकट्याकडून लांडग्याला हाकलने शक्य नव्हते. कोणीही त्याच्या मदतीला आले नाही. आता लोकांचा त्याच्यावर अजिबात विश्वास नव्हता. लोक आपल्या जागेवरून हललेसुद्धा नाहीत. त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. आणि शेवटी मुलाच्या गंमतीसाठी मेंढ्यांचा जीव गेला.
तात्पर्य : आपली गंमत कधी कधी इतरांच्या जीवावर उठू शकते हे लक्षात ठेवावे.
सामान्य ज्ञान
१)भारताचे राष्ट्रगीत कोणते ?
उत्तर : जन-गण-मन
२) भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे ?
उत्तर : कमळ
३) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?
उत्तर : मोर
४) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
उत्तर : वाघ
थोरव्यक्ती परिचय
पंडित जवाहरलाल नेहरू
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान
[१४ नोव्हेंबर १८८९ – २७ मे १९६४]
पंडित जवाहरलाल नेहरू हे नाव प्रत्येक भारतीयाला माहीत आहे. जवाहरलाल मुलांमध्ये खूप प्रसिद्ध होते. त्यामुळे मुले त्यांना ‘चाचा नेहरू’ म्हणत. त्यांचे मुलांवर खूप प्रेम असल्याने सरकारने त्यांचा वाढदिवस ‘ बालदिन ‘ म्हणून साजरा केला जातो. जवाहरलाल नेहरू हे महान नेते होते. ते देशावर नितांत प्रेम करणारे व्यक्ती होते.
जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद (आता प्रयागराज) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू होते जे उत्तम वकील होते. त्यांचे वडील खूप श्रीमंत होते त्यामुळे नेहरूंना उत्तम शिक्षण मिळाले.
लहान वयातच त्यांना शिक्षणासाठी परदेशात पाठवण्यात आले. इंग्लंडमधील हॅरो आणि केंब्रिज या दोन विद्यापीठांमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. १९१० मध्ये त्यांनी पदवी पूर्ण केली.
नेहरू त्यांच्या अभ्यासात सरासरी माणूस असल्याने त्यांना कायद्यात फारसा रस नव्हता. त्यांना राजकारणात रस होता. जरी ते नंतर वकील झाले आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात कायद्याचा अभ्यास केला. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांचा श्रीमती सोबत विवाह झाला. कमला देवी. त्यांना इंदिरा नावाची मुलगी झाली.
सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. तो महान दृष्टीचा माणूस होता. ते नेते, राजकारणी आणि लेखकही होते. भारत हा एक यशस्वी देश होण्यासाठी त्यांनी नेहमीच देशाच्या भल्यासाठी अहोरात्र काम केले. जवाहरलाल नेहरू हे महान द्रष्टे होते. मुख्य म्हणजे त्यांनी ‘आराम हराम है’चा नारा दिला.
जवाहरलाल नेहरू हे शांतताप्रिय होते पण ब्रिटिशांनी भारतीयांना कसे वागवले हे त्यांनी पाहिले. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यांचे देशावर प्रेम होते त्यामुळे त्यांनी महात्मा गांधी (बापू) यांच्याशी हस्तांदोलन केले. परिणामी ते महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत सामील झाले. स्वातंत्र्यलढ्यात त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. ते अनेकवेळा तुरुंगातही गेले. मात्र, त्यांचे देशावरील प्रेम काही कमी झाले नाही. त्यांनी एक मोठा लढा दिला ज्याचा परिणाम स्वातंत्र्यात झाला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. जवाहरलाल नेहरूंच्या प्रयत्नांमुळे ते भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून निवडले गेले.
नेहरू आधुनिक विचारसरणीचे होते. भारताला अधिक आधुनिक आणि सुसंस्कृत देश बनवायचे होते. गांधी आणि नेहरू यांच्या विचारसरणीत फरक होता. गांधी आणि नेहरूंचा सभ्यतेबद्दलचा दृष्टिकोन वेगळा होता. गांधींना प्राचीन भारत हवा होता, तर नेहरू आधुनिक भारताचे होते. भारताने पुढे जावे अशी त्यांची नेहमीच इच्छा होती.
२७ मे १९६४ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे मानले जाते.
आज १४ नोव्हेंबर दिनविशेष प्रश्न मंजुषा
भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू जयंती बाल दिनावर आधारित माहितीपूर्ण लेख व प्रश्न मंजुषा नक्की सोडवा खालील ओळीला स्पर्श करून