इयत्ता १ ली ते १२ वी विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरण करणेबाबत कार्यवाही Aadhaar Registration Updating Of Students Class 1st To 12th

Aadhaar Registration Updating Of Students Class 1st To 12th

Aadhaar Registration Updating Of Students Class 1st To 12th

Action taken regarding Aadhaar registration and updating of students from class 1 to 12

Aadhar Enrollment Kit MPSP GUIDELINES

जा.क्र. प्राशिसं/आधार/२०२५/०3767

दिनांक ०४/०९/२०२५. 04 SEP 2025

विषयः राज्यातील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरण बाबतची कार्यवाही करणेबाबत.

राज्यातील १ ली ते १२ मधील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणाचे काम करण्यासाठी गटसाधन केंद्र (CHC) ०२ प्रमाणे एकूण ८१६ आधार नोंदणी संच (Aadhar Enrollment Kit) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत (MPSP) गटसाधन केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येऊन सदरचे कामकाज सुरु करण्यात आले होते. गटस्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या आधार नोंदणी संच (Aadhar Enrollment Kit) द्वारे विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरण कामकाज पूर्ण करुन घेण्यात यावे.

UDISE PLUS 2025 MBU UPDATE करणे म्हणजे काय ? कोणी करावे ? कुठे करावे ? का गरजेचे आहे ? संपूर्ण प्रक्रिया

राज्यामध्ये अद्यापही अनेक विद्यार्थी आधार नोंदणीकृत नसल्याचे निदर्शनास येत आहे तसेच सरल प्रणालीमध्ये आधार नोंदीमध्ये त्रुटी असल्यामुळे मिसमैच होत आहेत तसेच अनेक विद्यार्थी Draft Box मध्ये असल्याचे आढळूनयेत आहे. राज्यातील प्रत्येक गटस्तरावर प्रत्येकी दोन आधार नोंदणी संच (Aadhar Enrollment Kit) उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत त्यापैकी नादुरुस्त संच वगळता उर्वरित कार्यरत संचाचा उपयोग करून आधार विषयक सर्व प्रलंबित कामकाज होणे आवश्यक आहे. उक्त आधार नोंदणी संच (Aadhar Enrollment Kit) यांचा उचित उपयोग करणेकरीता खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१. शाळानिहाय आधारबाबतची संख्यात्मक माहिती प्राप्त करून घेणेत यावीत उदा. आधार नोदंणी न झालेली विद्यार्थी संख्या, आधार मध्ये दुरुस्ती करावयाची विद्यार्थी संख्या इत्यादी प्रकारची माहिती प्राप्त झाल्यानंतर कामाच्या व्याप्तीनुसार आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे केंद्र निश्चित करण्यात यावे.

२. सदर केंद्र निवडतेवेळी पुढील बाबी विचारात घेण्यात याव्यात, भौतीक सुविधा, सदर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना येण्याकरीता पक्का रस्ता, शाळेच्या परिसरामध्ये इंटरनेटचे नेटवर्क असणे इत्यादी बाबी विचारात घेऊन शाळेची निवड करण्यात यावी,

३. तसेच सदर केंद्रावर नजीकच्या कोण कोणत्या शाळेमधील विद्यार्थी आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाच्या कामकाजासाठी येणार आहेत अशा शाला निश्चित करणे आवश्यक आहे.

४. शासनाच्या विद्यार्थी लाभाच्या योजनांचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे, आधार बाबतची कार्यवाही प्रलंबित राहिल्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षण विभागाकडील योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याकरीता उक्त मुद्दा

क्रमांक १ ते ३ मध्ये नमूद केलेनुसार उचित कार्यवाही करुन त्वरीत आधार विषयक सर्व प्रलंबित आणि दुरुस्तीविषयक कामकाज पूर्ण करुन घेण्यात यावे.

५. संचमान्यता आधार व्हॅलिड विद्यार्थी संखेच्या आधारावर होणार असल्यामुळे प्रत्येक शाळेने आपल्या शाळेतील mis-match, invalid आणि आधार नसलेल्या विद्यार्थ्यांच्या आधार बाबतची कार्यवाही त्वरीत पूर्ण करुन घेणे आवश्यक आहे.

६. गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्यातील आधार प्रलंबित शाळांचा आढावा घेऊन तालुक्यास उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आधार नोंदणी संचाच्या कामकाजाचे अचूक नियोजन करावयाचे आहे. नियोजन करतांना केंद्रनिहाय करण्यात यावे तसेच एखाद्या शाळेत जास्त विद्यार्थी प्रलंबित असल्यास आधार नोंदणी संच (युनिट) सदरहू शाळेस प्रलंबित कामाकरीता उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करावे.

७. गटशिक्षणाधिकारी यांनी दररोज तालुक्यात कार्यरत आधार नोंदणी संच ऑपरेटर यांचेकडून शाळांकडील आधार नोंदणी व अपडेशन यांचा आढावा घ्यावा व आवश्यकतेनुसार संबंधित ऑपरेटर यांचेकडून सर्व कामकाज पूर्ण करुन घेण्यात यावे.

८. तालुकास्तरावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आधार नोंदणी संच किरकोळ कारणांमुळे नांदुरुस्त झाले असल्यास, कार्यालयाकडे उपलब्ध निधीमधून दुरुस्ती करुन घेण्यात यावे व नादुरुस्त संब त्वरीत सुरु करुन घेण्यात यावेत.

९. सोबत तालुकानिहाय आधार ऑपरेटर यांची यादी व संपर्क क्रमांकाची माहिती उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यानुसार सद्यस्थितीमध्ये कार्यरत आधार ऑपरेटर यांना आधार प्रलंबित आणि दुरुस्तीचे काम असणाऱ्या शाळांचे पुढील १५ दिवसांचे अचूक नियोजन करुन देण्यात यावे तसेच याबाबत संबंधित शाळा आणि पालकांना देखील अवगत करणेबाबत सर्व गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात यावेत,

१०, दि. ३० सप्टेंबर, २०२५ पूर्वी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या आधार विषयक नोदी अद्यावत करुन सर्व विद्यार्थी सरल प्रणालीमध्ये नोंदणीकृत असल्याची खात्री मुख्याध्यापकांची करणे आवश्यक आहे. याबाबत सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा प्रमुखांना लेखी निर्देश निर्गमित करण्यात यावेत.

११. विद्यार्थ्याचे आधार नोंदणी व अद्यावतीकरणाबाबत संचालनालय स्तरावरुन वेळोवेळी मार्गदर्शक सुचना व आदेश निर्गमित केले जातील, त्याप्रमाणे कार्यवाही करणे सर्व क्षेत्रीय अधिका-यांवर बंधनकारक आहे.

ब. सरल ड्रॉपबॉक्स बाबत कार्यवाही करणे :-

१. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरीता Drop Box मध्ये दिसणारे तसेच शाळास्तरावर अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत attach (प्रवेशित) करणे आवश्यक आहे.

२. सरल प्रणाली अंतर्गत कार्यरत स्कूल पोर्टलवरील (School Portal) मधील Drop Box माध्ये अद्यापही १३.८४ लक्ष विद्यार्थी प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. सोबत जिल्हानिहाय विवरण तक्ता जोडण्यात आलेला आहे त्यानुसार जिल्ह्यांनी कार्यवाही करावी. ४. शाळा लॉगिनवरील Drop Box मध्ये दिसणारे सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणेकरीता त्यांची Drop Box मधील नोंद कमी होऊन शाळेत attach आवश्यक आहे.

५. प्रस्तुत बाबत शिक्षणाधिकारी यांनी तालुकानिहाय आढावा घेऊन प्रलंबित शाळा व तालुक्यांना आवश्यक ते निर्देश द्यावेत तसेच याबाबत नियमितपणे आढावा घेऊन Drop Box मध्ये दिसणारे सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येतील याकरीता आवश्यक ती कार्यवाही करावी.

६. Drop Box मध्ये दिसणारे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी यांना इन केलेनंतरच सदर विद्यार्थ्यांची नोंद SARAL प्रणालीमध्ये कायमस्वरूपी संग्रहित होते तसेच शाळेला कोणत्या विद्यार्थ्यांची नोंद प्रलंबित आहे हे स्पष्टपणे दिसते, त्यामुळे आवश्यक असल्यास follow-up करुन पुढील कार्यवाही पूर्ण करुन ध्यावी.

७. तसेच वरिष्ठ कार्यालयास विद्यार्थ्यांच्या हस्तांतरण प्रक्रियेत, Drop Box च्या माध्यमातून मागील शाळेने विद्यार्थ्यांची नोंद सोडली आहे की नाही आणि नवीन शाळेने प्रवेश मंजूर केला आहे की नाही याचा आढावा घेता येतो.

क. अपार आयडी (APAAR-Automated Permanent Academic Account Registry) बाबत कार्यवाही करणे

१. केंद्रशासन निर्देशानुसार शाळांमध्ये प्रवेशित सर्व इयत्ता १ ली ते १२ वी मधील विद्यार्थ्यांना U-DISE+ प्रणालीचा वापर करून APAAR ID (१२ अंकी एकमेव ओळख क्रमांक) उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिलेले आहेत.

२. APAAR ID मार्फत सर्व शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये एकाच विद्यार्थ्यासाठी कायमस्वरूपी एकच ओळख क्रमांक उपलब करुन देण्यात येतो तसेच अपार आयडी मुळे विद्यार्थ्यांच्या सर्व शैक्षणिक नोंदी, प्रमाणपत्रे व इतर माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहणार आहे, तसेच विद्यार्थ्याने शैक्षणिक संस्थांमध्ये बदल केल्यास पूर्व माहिती आपोआप नवीन संस्थेस हस्तांतरित होणार आहे.

३. APAAR ID हा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एकमेव युनिक आयडी असल्यामुळे विद्यार्थ्यांची पुनरावृत्ती (Duplication) बाबतच्या नोंदी टाळता येतात. APAAR ID मुळे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या व शासन योजनांसाठी पात्रतेची सोपी पडताळणी करता येऊ शकते,

४. राज्यातील विद्यार्थ्यांच्या APAAR ID जनरेशन बाबतचा आढावा घेण्यात आला असता अद्यापही २० टक्के विद्यार्थ्यांचे APAAR ID तयार करण्यात आले नसल्याचे निदर्शनास येत आहे. APAAR ID विद्यार्थ्यांच्या भविष्याकरीता महत्वाचा क्रमांक असल्यामुळे सदर बाबीस शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि (माध्यमिक) यांनी सदर कामास प्राधान्य देण्यात येऊन प्रलंबित विद्यार्थ्यांचे APAAR ID दि. ३० सप्टेंबर, २०२५ पर्यंत पूर्ण करुन घेण्यात यावे.

वरील सर्व कामकाज विहित मुदतीत पूर्ण करावयाचे असल्याने सर्व शिक्षणाधिकारी यांनी योग्य ते नियोजन करुन आवश्यक ती कार्यवाही करावी.

परिपत्रक पीडीएफ लिंक

(महेश पालकर)

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे

महाराष्ट्र शासन

प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

IMG 20250904 205045
Aadhaar Registration Updating Of Students Class 1st To 12th

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व

२. शिक्षण अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई

३. शिक्षण निरिक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई

४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद सर्व

Student Aadhaar registration and updating process

Leave a Comment

error: Content is protected !!