ZP PS General Elections 2025
ZP PS General Elections 2025
प्रसिद्धिपत्रक
दि. १ ऑक्टोबर २०२५
जि. प. आणि पं. स. निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत
मुंबई, दि. १ (रानिआ): राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या ३३६ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.
संबंधित जिल्हाधिकारी १० ऑक्टोबर २०२५ रोजी वृत्तपत्रांत आरक्षण सोडतीसंदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यावर १४ ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून ३ नोव्हेंबर २०२५ रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाईल.
राज्य निवडणूक आयोग
महाराष्ट्र
राज्य निवडणूक जायोग
१ ला माळा, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई- ४०० ०३२.
Also Read 👇
ZP PS General Elections 2025
Zilla Parishad Panchayat Samiti General Elections 2025
Program to determine the geographical boundaries of the Zilla Parishad and Panchayat Samiti wards for the general elections-2025
मंत्रालयीन सेवा
महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन, मुंबई
क्रमांक: जिपनि-२०२५/प्र.क्र.३६/पं.रा.-२
दिनांक : १२ जून, २०२५
विषय:- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२५ प्रभागाच्या भौगोलिक सिमा निश्चित करण्याचा कार्यक्रम.
संदर्भ:- शासन आदेश क्र. जिपनि-२०२५/प्र.क्र.३६/पं.रा.२, दिनांक-१२/०६/२०२५.
महोदय/महोदया,
मा. सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका क्रमांक १९७५६/२०२१ मध्ये दिनांक ०६.०५.२०२५ रोजी पारित केलेल्या आदेशानुसार कार्यकाळ संपुष्टात आलेल्या राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका चार महिन्यांच्या विहीत कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याकरीता खालीलप्रमाणे आदेश सोबत पाठविण्यात येत आहे.
१. ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूका सदस्य संख्या व प्रभाग रचना आदेश.
२. जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गण सदस्य संख्या निश्चिती अधिसूचना.
३. प्रभाग रचना अधिकारांचे प्रत्यायोजन आदेश.
४. प्रभाग रचना कार्यक्रम / वेळापत्रक.
उपरोक्त आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक कार्यवाही विहीत मुदतीत करण्यात यावी.
सर्व परिपत्रके व शासन निर्णय या ओळीला स्पर्श करून पीडीएफ मध्ये प्राप्त करा
सह सचिव, महाराष्ट्र शासन
प्रति,
सर्व जिल्हाधिकारी (मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा व गोंदिया वगळून)
प्रत :- उपायुक्त, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांना माहितीसाठी अग्रेषितः
प्रतः कार्यासन पंचायत राज-२, संग्रहार्थ.
