Weather Forecast Warning
Weather Forecast Warning
राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता
राज्यातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवू शकतो. 18 ते 20 मार्च दरम्यान परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजित करावीत आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
India Meteorological Department
weatherupdate
Weather Forecast Warning
Weather Forecast Warning
PRESS RELEASE
Weather Forecast Warning
हवामान विभागाकडून प्राप्त सुचनेनुसार तालुका व मंडळ स्तरावरील यंत्रणा यांनी दक्षता घेणे बाबत…
संदर्भ:- हवामान विभागाकडील प्राप्त संदेश दिनांक २५/१२/२०२६
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, हवामान विभागाकडून दिनांक २६ डिसेंबर, २०२४ रोजी पासुन ते २८ डिसेंबर, २०२४ रोजी पर्यंत नाशिक व पुणे विभागात. रेड अलर्ट दर्शवण्यात आला असुन धुळे जिल्हयात गडगडाटी वादळ वारे व पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याअनुषंगाने आपल्या स्तरावरून आपल्या कार्य क्षेत्रातील सर्व नागरीकांना सर्वांनी सजग रहावे व दक्षता घ्यावी अशा व इतर अनुषंगीक सुचना प्रसारीत कराव्यात.
तसेच तालुका व मंडळस्तरावरील सर्व यंत्रणा यांनी कालावधीत कार्यरत व तत्पर रहावे व मुख्यालय सोडू नये. तसेच कोणतीही नैसर्गीक आपत्ती अथवा घटना घडल्यास जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना भ्रमण ध्वनीवर तात्काळ कळवावे. या बाबत सर्व संबंधीतांना कळविण्यात यावे. या कालावधीत तलाठी, मंडळ अधिकारी यांचे मार्फत गाव पातळीवरून अहवाल प्राप्त करुन घेउन वेळोवेळी प्राथमिक अहवाल सादर करावा,
उक्त प्रमाणे तातडीने कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आज रोजी सांय, ०५ वाजता न चुकता सादर कराबा.

For More Details Visit US
Issued By:
Regional Weather Forecasting Centre Regional Meteorological Centre India Meteorological Department, Nagpur
CIRCULAR PDF COPY LINK
