Viksit Maharashtra 2047 vision document

Viksit Maharashtra 2047 vision document

IMG 20250716 162113
Viksit Maharashtra 2047 vision document

Viksit Maharashtra 2047 vision document

Regarding the preparation of a vision document for a developed Maharashtra 2047

Viksit Maharashtra Vision 2047 – Draft V2.0

मंत्रालय (विस्तार), मुंबई

क्रमांकः संकीर्ण-२०२५/प्र.क्र.२३/संगणक

दिनांक. १० जुलै, २०२५

प्रति,
आयुक्त, (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे.

विषय : विकसित महाराष्ट्र २०४७ करीता व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याबाबत.

गहोदय,

व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी १५० दिवसांचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला असून सदर विहित कालावधीमध्ये व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याच्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रामधील तज्ञ, नामांकित शैक्षणिक संस्था, स्वंयसेवी संस्था यांच्याशी सल्लागसलत करून त्यांच्याकडून याबाबत सूचना/संकल्पना/अभिप्राय प्राप्त करुन घेण्याबाबत सूचना विभागास देण्यात आल्या आहेत.

२. त्या अनुषंगाने व्हिजन डॉक्युमेंटकरीता सूचना/संकल्पना/अभिप्राय सादर करण्याची विनंती स्वयंसेवी संस्थांना शासनस्तरावरुन करण्यात आली असून, त्याबाबतच्या सूचना दि. १४.०७.२०२५ पावेतो राज्य शासनास कळविण्याची विनंती करण्यात आली आहे.

३. शासनस्तरावरुन व्हिजन डॉक्युमेटचा मसुदा तयार करण्यात आला असून, सदर मसूदा सोबत जोडण्यात येत आहे. सदर मसूदा विभागाचे क्षेत्रिय अधिकारी म्हणजेच संचालक, सह संचालक, उपसंचालक यांगा पाठवून व्हिजन डॉक्युमेंटबाबतच्या सूचना/संकल्पना/अभिप्राय दि. १४.०७.२०२५ पावेतो प्राप्त करुन घेण्यात याव्यात. त्याचप्रमाणे व्हिजन डॉक्युमेंटचा मसूदा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे समिती, गाभा समितीचे सदस्य तसेच अन्य आवश्यक तज्ञांना देखील पाठवून त्यांच्या देखील सूचना दि. १४.०७.२०२५ पावेतो घेण्यात याव्यात. तसेच शिक्षक संघटनांना देखील व्हीजन डॉक्युमेंट तयार करण्याच्या अनुषंगाने त्यांच्या सूचना, अभिप्राय दि. १४/०७/२०२५ पावेतो सादर करण्याच्या सूचना देण्यात याव्या.

४. विभागाचे व्हिजन डॉक्युमेंट सर्वकक्ष व परिपूर्ण तसेच शालेय शिक्षणाशी निगडित विविध घटकांच्या आशा आकांक्षा प्रतिबिंब करणारे असणे आवश्यक आहे.

व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याकरीता विभागास उपलब्ध कालमर्यादा विचारात घेऊन संबंधितांच्या सूचना/संकल्पना/अभिप्राय दि. १४.०७.२०२५ पावेतो सादर करण्याची विनंती आपल्यास्तरावरुन सर्व संबंधितांना करण्यात याव्यात, अशी आपणांस विनंती करण्यात येत आहे

सोबत :- मसुदा जोडला आहे. या ओळीला स्पर्श करून पीडीएफ मध्ये प्राप्त करा

प्रत :-

(समीर सावंत)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

१. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२. संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, गहाराष्ट्र राज्य, पुणे
३. शिक्षण संचालक (सर्व), महाराष्ट्र राज्य.

IMG 20250716 162332
Viksit Maharashtra 2047 vision document

IMG 20250716 162608
Viksit Maharashtra 2047 vision document

Leave a Comment

error: Content is protected !!