Video Recording Allow In Police Station
Video Recording Allow In Police Station
You can Record the video in the police station
Video Recording In Police Station
पोलीस ठाण्यामध्ये व्हीडीओ रेकॉर्डीग करू शकता
महाराष्ट्र पोलीस
महाराष्ट्र शासन
पोलीस आयुक्त कार्यालय,नागपूर
क-पोउपआ/मुख्या/परिपत्रक/२०२३-79
दिनांक: १३/०६/२०२३
परिपत्रक
विषयः- पोलीस ठाण्यामध्ये व्हीडीओ रेकॉर्डीग संबंधाने
मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर येथे दाखल क्रिमीनल अॅपलीकेशन नं. ६१५/२०२९ मध्ये मा. न्यायालयाने दिनांक २६/०७/२०२२ रोजी आदेश पारीत केला आहे की, केंद सरकार द्वारे पारित अधिकृत गुपिते (ऑफिशियल सि*क्रेट्स) कायदा १९२३ चे कलम २ (८) मध्ये परिभाषित केल्यानुसार ‘निषिद्ध ठिकाण’ ची व्याख्या प्रासंगिक आहे. ही एक सर्व समावेशक व्याख्या आहे, ज्यात विशेषतः पोलीस ठाणेचा समावेश, ठिकाणे किंवा आस्थापनां पैकी एक म्हणून केला जात नाही.
त्याअनुषंगाने क. पोउपआ मुख्या/ परिपत्रक २०२२- २९१ दिनांक २८/१२/२०२२ रोजी अन्वये परिपत्रक काढण्यात आले होते. परंतु असे निदर्शनास आले आहे की, पोलीस ठाणे येथे आलेल्या व्यक्तिींनी व्हीडीओ रेकॉर्डीग करतांना दिसून आल्यास कर्तव्यावरील अधिकारी/अंमलदार त्यांचेशी वाद घालतात आणि गु*न्हा नोंद करतात ही अत्यंत खेदाची बाब आहे. पोलीस ठाणे हे सार्वजनिक स्थळ असून पोलीस ठाणे मध्ये येणारे व्यक्तिींनी व्हीडीओ रेकॉर्डीग केल्यास त्यास अडकविण्याचा प्रयत्न करू नये.
करीता पोलीस ठाणे मध्ये येणाऱ्या व्यक्तींनी व्हिडीओ रेकॉर्डीग केल्यास गु*न्हा नोंद करता येत नाही, असे मा. न्यायालयाने आदेशीत केलेले आहे तरी सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांनी मा. न्यायालयाचे आदेशाची प्रत सर्व पोलीस अधिकारी/अंमलदार यांना वितरीत करून सदरची बाबही त्यांच्या निदर्शनास आणुन द्यावी. तसेच अधिकृत गुपिते (ऑफिशियल सि*क्रेट्स) कायदा १९२३ अन्वये गु*न्हा नोंद करतांना मा. न्यायालयाचे आदेशाचे तंतोतंत पालन करावे.
(मा. पोलीस आयुक्त, यांचे आदेशान्वये )
👉 सदर परिपत्रक तुम्हाला पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा 👈
(डॉ. अश्विनी पाटील) पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), नागपूर शहर
प्रति,
सर्व वपोनि पोलीस ठाणे/शाखा,
नागपूर शहर.
प्रत माहितीस व आवश्यक कार्यवाहीस्तव :-
सर्व सहायक पोलीस आयुक्त, नागपूर शहर
प्रत सस्नेह अग्रषितः-
सर्व पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर.
प्रत सविनय सादर:-
मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर.
मा. सह पोलीस आयुक्त, नागपूर शहर.
मा. अपर पोलीस आयुक्त, गु*न्हे/उत्तर/दक्षिण प्रभाग नागपूर शहर,