Various Committees At School Level Merge In School Management Committee
Various Committees At School Level Merge In School Management Committee
Various committees at the school level are included in school management committee
Directed by the government to strengthen the various committees at the school level by including them in the school management committee
महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, पुणे
क्रमांक: प्राशिसं ८०२/समिती/२०२५/868
दिनांक-१९.०२.२०२५
विषय : शाळा स्तरावरील विविध समित्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये समाविष्ट करण्यासाठी बैठक दिनांक २०.०२.२०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता
शासनाने शाळास्तरावरील विविध समित्या हया शाळा व्यवस्थापन समितीमध्ये समाविष्ट करुन बळकटीकरण करण्याचे निर्देश दिलेले आहेत. यासाठी मुख्याध्यापक/शिक्षक आणि क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी विचारविमर्श करुन विविध समित्यांचे शाळा व्यवस्थापन समितीमध्ये समाविष्ठ करण्याच्या दृष्टीने प्रारुप तयार करण्यात आलेले आहे.
विविध समित्या हया शाळा समितीमध्ये समाविष्ट करावयाच्या दृष्टीने या कार्यालयाने प्रारुप तयार केले असल्याने याबाबत अंतिम स्वरुप देण्यासाठी दिनांक २०.०२.२०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता प्रस्तुत कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर प्रारुप अंतिम करण्यासाठी या बैठकीस सोबत असलेल्या कर्मचारी/अधिकारी यांनी उपस्थित रहाणे आवश्यक आहे.
तरी आपल्या कार्यक्षेत्रातील संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांना सदर बैठकीस उपस्थित रहाण्यासाठी कार्यमुक्त करावे. जेणेकरुन प्रारुप अंतिम करण्यात येऊन शासनास सत्वर सादर करणे शक्य होईल.
(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत- मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर