UDISE Plus Dropbox Dropout Out of School Students Information Update

UDISE PLUS Dropbox Students Information Update

UDISE PLUS Pranali Drop out Out of School Students information update

image 2

UDISE Plus Dropbox Dropout Out of School Students Information Update

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व किडा विभाग

निपुण भारत

समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

जा.क्र.मप्राशिप/संगणक/UDISE/२०२३-२४/ 716

दि. 28 FEB 2024

प्रति,

१) विभागीय उपसंचालक, मुंबई विभाग, मुंबई

२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद (सर्व)

३) शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी, महानगरपालिका, मुंबई.

विषय : सन २०२३-२४ U-DISE प्रणाली मध्ये Dropbox मधील विदयार्थ्यांची माहिती अद्यावत करणेबाबत.

महोदय,

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, सन २०२३-२४ U-DISE + प्रणाली मध्ये Dropbox मधील विदयार्थ्यांची माहिती अद्यावत करण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

दि २८/२/२०२४ रोजीच्या U-DISE+ प्रणाली मधील Drop box अहवालानुसार राज्यामध्ये एकूण १२,४०,६५१ एवढे विदयार्थी Dropbox मध्ये दिसून येत आहेत, म्हणजेच एकूण विदयार्थ्यांच्या तुलनेमध्ये ५.८४% विदयार्थी Dropbox मध्ये आहेत. यामधील बरेच विदयार्थी पोलिटेक्निक, व्यवसायिक शिक्षण, आयटीआय, डिपलोमा प्रवेश घेलेले आहेत, दुबार नोंदणी झालेली आहे त्यामुळे ते Dropbox मध्ये असल्याबाबत शाळांकडून सांगण्यात आले आहे. Dropbox मधील विदयार्थ्यांचा शोध घेऊन माहिती U-DISE+ प्रणाली मध्ये अपटेड करण्यासाठी शाळा, तालुका, जिल्हास्तरावर सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सोबत दिलेल्या तक्त्यानुसार सर्व विदयार्थ्यांचा शोध घेऊन माहिती अपडेट करण्यासाठी VC घेवून सुचना देण्यात याव्यात. जेणे करुन जिल्हयातील एक ही विदयार्थी Dropbox/Drop out/Out of School राहणार नाही याची नोंद घेण्यात यावी. याबाबत आपल्या स्तरावरुन शाळांना Drop box मधील माहिती तात्काळ अपटेड करण्यात यावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास ई-मेल द्वारे पाठविण्यात यावा.

Also read –

सन २०२३-२४ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमधील दि. १५/०२/२०२४ रोजीच्या अहवालानुसार आधार नंबर उपलब्ध न करून दिलेल्या विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करणेबाबत.

सोबत :- जिल्हयानिहाय व वर्ग निहाय विदयार्थ्यांची संख्या.

(संजय डोर्लीकर)

उप संचालक (प्रकल्प/प्रशा.) म.प्रा.शि.प., मुंबई.

प्रत: माहितीस्तव सविनय सादर,

१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.

२) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व.

प्रत : उचित कार्यवाहीस्तव,

१) मा. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.

२) मा. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.

३) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.

Leave a Comment

error: Content is protected !!