UAT of WhatsApp based features for online service ऑनलाईन सेवा प्रदानासाठी व्हॉट्सअॅप आधारित सुविधांची युजर अॅक्सेप्टन्स टेस्टिंग करण्याबाबत.

UAT of WhatsApp based features for online service

UAT of WhatsApp based features for online service

Regarding User Acceptance Testing (UAT) of WhatsApp based features for online service provision

ऑनलाईन सेवा प्रदानासाठी व्हॉट्सअॅप आधारित सुविधांची युजर अॅक्सेप्टन्स टेस्टिंग (UAT) करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग (माहिती तंत्रज्ञान) शासन निर्णय क्र. संकीर्ण-१७२५/प्र.क्र.१६५ मंत्रालय, मुंबई

दिनांक :- १४ जुलै २०२५

प्रस्तावना -:

माहिती तंत्रज्ञान संचालनालय व व्हॉट्सअॅप इंडिया यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनातील विविध विभागांच्या ऑनलाईन सेवा नागरीकांसाठी व्हॉट्सअॅप प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

      शासन निर्णय

ऑनलाईन सेवांचा लाभ नागरीक जेथे असतील त्या ठिकाणावरुन व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यासाठी, माहिती तंत्रज्ञान संचालनालय व व्हॉट्सअॅप इंडिया यांनी एक नवीन व्हॉट्सअॅप-आधारित सेवा विकसित केली आहे. या सेवा नागरीकांना वापरासाठी उपलब्ध करून देण्यापूर्वी, त्या सेवा कार्यक्षम, नागरीकाभिमुख आणि अचूकपणे चालतात की नाही, याची खातरजमा करण्यासाठी युजर अॅक्सेप्टन्स टेस्टिंग (User Acceptance Testing – UAT) करणे आवश्यक आहे.

याकरीता खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे.

१) प्रधान सचिव (सहकार), सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.

अध्यक्ष

२) संचालक, माहिती तंत्रज्ञान संचालनालय, मुंबई

सदस्य

३) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई.

सदस्य

४) उपसचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.

सदस्य

५) उपसचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.

सदस्य

६) व्हॉट्सअॅप इंडिया चे प्रतिनिधी (तांत्रिक अधिकारी)

सदस्य

७) श्री. विजय पाटील, माहिती तंत्रज्ञान संचालनालय (DIT)

सदस्य सचिव

३. नागरीकांना ज्या ऑनलाईन सेवा व्हाट्सअॅप द्वारे पुरविण्यात येणार आहेत त्या विनाव्यत्यय चालतात कि नाही याची खात्री समितीने करावी.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा सांकेतांक २०२५०७१४१७०३५२३८०७ असा आहे. हा शासन निर्णय डीजीटल स्वाक्षरीने सांक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासन निर्णय / परिपत्रक पीडीएफ मध्ये हव्या असल्यासारखी या ओळीला स्पर्श करा

( प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन

IMG 20250714 213424
UAT of WhatsApp based features for online service

Leave a Comment

error: Content is protected !!