TET Not Mandatory For Teachers of Art Work Experience Physical Education Music
TET Not Mandatory For Teachers of Art Work Experience Physical Education Music
It will not be mandatory for teachers of art, work experience, physical education and music to pass the TET exam.
It will not be mandatory for teachers with diplomas and degrees in the subjects of art, work experience, physical education and music to pass the TET exam
“शिक्षक पात्रता परीक्षा” ची कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता (इ.१ ली ते ८ वी सर्व व्यवस्थापन, सर्व मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांसाठी) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन शुध्दीपत्र क्र.- टिईटी-२०१४/प्र.क्र.२९४/टीएनटी-१,
मुंबई
दिनांक : ३ डिसेंबर, २०१४
वाचा
१. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक आरटीई-२०१३/प्र.क्र.९१/प्राशि-१, दिनांक २३ ऑगस्ट, २०१३.
२. शासन शुध्दीपत्र शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. आरटीई-२०१३/प्र.क्र.९१/प्राशि-१, दिनांक ९ सप्टेंबर, २०१४.
शासन शुध्दीपत्रक
शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक आरटीई-२०१३/प्र.क्र.९१/प्राशि-१, दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ मधील अ.क्र. (४) मधील “शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मध्ये कनिष्ठ प्राथमिक (इयत्ता १ ली ते ५ वी) व वरिष्ठ प्राथमिक (इयत्ता ६ वी ते ८ वी) या दोन गटातील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहतील. दोन्ही गटासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास दोन्ही प्रश्नपत्रिका सोडविणे आवश्यक राहील”
या ऐवजी
“शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मध्ये कनिष्ठ प्राथमिक (इयत्ता १ ली ते ५ वी) व वरिष्ठ प्राथमिक (इयत्ता ६ वी ते ८ वी) या दोन गटातील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहील. इ. ६वी ते ८ वी या गटासाठीची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारास इयत्ता १ ली ते ५ वी गटासाठीची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार नाही तसेच कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व संगीत या विषयांच्या पदविका व पदवीधारक शिक्षकांना TET परीक्षा उतीर्ण होणे अनिवार्य राहणार नाही.” असे वाचण्यात यावे.
सदर शासन शुध्दीपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१४१२०३१२४४१५०९२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने
परिपत्रक पीडीएफ लिंक
उप सचिव, महाराष्ट्र शासन