TET CTET MCQs Quiz
TET CTET MCQs Quiz
Subject – Child Psychology and Pedagogy
TET – शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १ व पेपर २
विषय- बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र प्रश्न मंजुषा
उपघटक – अध्ययन–अध्यापनावर परिणाम करणारे घटक
Maha TET Psychology Adhyaya V Adhyayanavar Parinar Karnare Ghatak
अध्ययन-अध्यापन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक पुढील प्रमाणे सांगता येतील
विद्यार्थी, शिक्षक, वातावरण आणि अभ्यासक्रम यांसारखे अनेक घटक अध्ययन-अध्यापन प्रक्रियेवर परिणाम करतात. प्रभावी अध्यापनासाठी (शिकवण्यासाठी) शिक्षकाची योग्यता, विषयाचे ज्ञान, योग्य अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांची प्रेरणा, बौद्धिक क्षमता, आणि शाळेतील भौतिक सोयी-सुविधा (उदा. प्रकाश, हवा, शांतता) अत्यंत महत्त्वाच्या असतात हे घटक परस्परसंबंधित असून ते अध्ययनाची गुणवत्ता ठरवतात आणि वाढवतात.
अध्ययन-अध्यापनावर परिणाम करणारे मुख्य घटक
शिक्षका संबंधित घटक – शिक्षकाचे विषयाचे सखोल ज्ञान, अध्यापन पद्धती, स्पष्टीकरण कौशल्य, वर्गातील शिस्त, विद्यार्थ्यांशी संवाद, आणि शिक्षकाचा दृष्टिकोन हे घटक अध्यापन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक म्हणून सांगता येतील
विद्यार्थ्याच्या संबंधित घटक – विद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक आरोग्य, पूर्वज्ञान, शिकण्याची प्रेरणा (Motivation), बुद्धिमत्ता, वयानुसार परिपक्वता (Maturation), आणि एकाग्रता हे घटक अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक म्हणून सांगता येतील
वातावरणाच्या संबंधित घटक – वर्गातील भौतिक वातावरण (प्रकाश, हवा, बाकांची मांडणी), सामाजिक-भावनिक वातावरण, शाळेची संस्कृती आणि शांतता हे घटक अध्ययन-अध्यापन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक म्हणून सांगता येतील
अभ्यासक्रम व शैक्षणिक साधने – अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी, पाठ्यपुस्तके, आणि अध्यापनासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान (शैक्षणिक साधने), प्रयोगशाळा हे घटक अध्ययन-अध्यापन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक म्हणून सांगता येतील
संस्थात्मक घटक – शाळा व्यवस्थापन, शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर (Teacher-Student Ratio), शाळेतील सोयी-सुविधा आणि संसाधने हे घटक अध्ययन-अध्यापन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक म्हणून सांगता येतील
या सर्व घटकांच्या योग्य संयोजनातून प्रभावी अध्ययन-अध्यापन प्रक्रिया घडविली जाते
ईशाळा समूहाचा महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठीचा उपक्रम दररोज महत्वाच्या १० प्रश्नांचा सराव
शिक्षक सक्षम करण्यासाठी शिक्षकांनी शिक्षकांसाठी चालवलेल्या मोहिमेत आपणही सहभागी व्हाल
Child Psychology and Pedagogy Quiz
(बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र प्रश्न मंजुषा)
निर्मित – शरद दत्तराव देशमुख क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त (पूर्वीचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार) (हा महाराष्ट्र शासनाचा शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे)
प्रश्न निर्मितीसाह्य – सौ. भारती शरदराव देशमुख क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त (पूर्वीचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार) (हा महाराष्ट्र शासनाचा शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे)
तांत्रिकसाह्य – चि.पार्थ शरदराव देशमुख IIT-CSE